लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ
जगभरात लॉकडाऊन हा वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येच्या तयारीसाठी वापरला जात असताना आपल्या देशात मात्र हाच एकमेव रामबाण उपाय म्हणून वापरला गेला. कोणतेही प्लॅनिंग ना करता जाहीर केलेला लॉकडाऊन 1,2,3 असा मनमानेल तसा वाढवत नेला. त्यादरम्यान गरीब लोकांना अन्न पुरवण्याची , आपापल्या घरी पोचवण्याची कोणतीही सप्लाय चेन तयार केली नाही, 8 वाजता यायचा , राणा भीमदेवी थाटात घोषणा करायच्या आणि लोकांना त्यांच्या नशीबावर सोडून द्यायचे, बाकी कोणाचाही विरोध मोडायला मीडिया आणि सोशल आर्मी तयार असतेच.
या काळात एकविसाव्या शतकात कित्येकांनी शेकडो किलोमीटर मुलाबाळांसहीत प्रवास केला , कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बुडाले, कर्जबाजारी झाले , कित्येक जण प्रवासात मेले , आत्महत्या केल्या.
जेव्हा सरकारला याचा फटका बसला, इन्कम बंद झाले तेव्हा त्यांना कळले अनलोक प्रक्रिया सुरू करायला हवी, मग तेच मीडिया आणि सोशल ट्रोल्स अनलोक कसे गरजेचे आहे हे सांगू लागले, पहिल्या दिवशी कोरोना होता तसाच आतापण आहे, मग एवढ्या प्रदीर्घ 90 दिवसाच्या लॉकडाऊनचे आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारी कोणाची ?
लॉकडाऊनपूर्वी जसा कोरोना होता तसाच आताही आहे, लॉकडाऊन मध्ये ना त्याचा कर्व्ह फ्लॅट झालाय ना इतर काही तयारी झाली आहे.
सगळ्या गाईडलाईन्स केंद्र सरकार ठरवणार , सगळया किट्स (चायना इम्पोर्ट ) कंपल्सरी केंद्राकडून घ्यायच्या . त्याचा सप्लाय केंद्र करेल तसाच होईल.
झेपेना झालाय तेव्हा केंद्र सरकारने अनलोक करून राज्यांवर जबाबदारी ढकलून दिली आहे.
राज्य सरकार मध्येही सगळा शिमगाच आहे, वरतून आलेला दट्ट्या साहेब कारकूनावर टाकतो तसा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थावर टाकला आहे. मग प्रत्येक नगरपालिका , पंचायत एवढेच काय को ऑप सोसायटी सुद्धा मन मानेल ते नियम करून बेबंदपणे वागत आहेत.
सर्वसामान्य मात्र बाहेर पडले तर कोरोनाची भीती आणि घरात बसले तर उपाशी मरायची अवस्था अशा कात्रीत आहेत.
परीक्षांचा बट्ट्याबोळ
जेव्हा कोरोना साथ प्राथमिक स्टेज मध्ये होती , गावोगावी संसर्ग नव्हता , देशातला आकडा काहीशे मध्ये होता, तेव्हा परीक्षा घेणे धोकादायक आहे म्हणून लॉक डाऊन मध्ये परीक्षा घेतली नाही, आता मात्र सामूहिक संसर्गजन्य स्थितीत असताना केंद्र आणि बाहुले राज्यपाल परीक्षेचा आग्रह धरत आहेत.
कित्येक शाळा , कॉलेज कोविड सेंटर किंवा क्वारंटाइन सेंटर मध्ये परावर्तित केले आहेत, किती पालक आपल्या मुलांना अशा ठिकाणी परीक्षा द्यायला पाठवतील ? याबद्दल राज्य निर्णय घेतेय तर राज्यपाल खोडा घालत आहेत आणि केंद्र अळीमिळी गुपचीळी धरून आहे.
अभ्यास करावा की नोकरी शोधावी असा प्रश्न पडला आहे, सध्याचे केंद्रातले शिक्षण मंत्री मात्र बहुधा झोपा काढत आहेत.
वाचने
35009
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्या मताशी काही प्रमाणात
थोडं विस्कळीत वाटलं
मुस्लिम धारावीत ..
In reply to लेखाच्या आशयाशी सहमत. by mrcoolguynice
.
In reply to मुस्लिम धारावीत .. by विटेकर
काय कल्पना नै बुवा !
In reply to . by Gk
लॉकडाऊन
खरे सांगू का? लॉकडॉउन होणार
In reply to लॉकडाऊन by शा वि कु
हे सगळे असे करायला हवे म्हणून
In reply to खरे सांगू का? लॉकडॉउन होणार by आनन्दा
हम्म.
In reply to खरे सांगू का? लॉकडॉउन होणार by आनन्दा
सर्वसामान्यपणे परिस्थिती अशीच
In reply to हम्म. by शा वि कु
वरती बसलेल्या माणसाला
In reply to सर्वसामान्यपणे परिस्थिती अशीच by आनन्दा
हा हा..
In reply to वरती बसलेल्या माणसाला by mrcoolguynice
मागच्या ६ वर्षात सैन्य
In reply to हा हा.. by आनन्दा
व्हाट अबाउटरी करायची असेल तर
In reply to मागच्या ६ वर्षात सैन्य by mrcoolguynice
व्हाट अबाउटरी करायची असेल तर
In reply to व्हाट अबाउटरी करायची असेल तर by आनन्दा
व्हॉट अबौटरी?
In reply to व्हाट अबाउटरी करायची असेल तर by mrcoolguynice
खरंच वाट लागली
जालावर अनेक लोक आपले अमूल्य
मी मस्त 100 सूचना देईन हो
In reply to जालावर अनेक लोक आपले अमूल्य by सुबोध खरे
टीका करणे सोपे आहे.
नक्की काय करायला हवे होते हे सांगता येईल का?
In reply to टीका करणे सोपे आहे. by सुबोध खरे
तिक
In reply to नक्की काय करायला हवे होते हे सांगता येईल का? by कपिलमुनी
सगळं मीच सांगायचे तर ?
In reply to तिक by रात्रीचे चांदणे
सगळं कशाला
In reply to सगळं मीच सांगायचे तर ? by कपिलमुनी
ज्यनी इचारल त्यांना संगितल
In reply to सगळं कशाला by रात्रीचे चांदणे
केवळ गरळ ओकायची म्हणून
In reply to ज्यनी इचारल त्यांना संगितल by कपिलमुनी
पातळीचा प्रश्न नाही
In reply to तुमचा शेठ गू खातो तर आमचा by सुबोध खरे
RT-PCR चे किट जानेवारीत
In reply to पातळीचा प्रश्न नाही by कपिलमुनी
राज्यसरकार दिवसेंदिवस विनोदी
भक्त..
अर्रर्र... धागा वाचलाच नव्हता.
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. -दिलीप बिरुटे
लॉकडाऊन
In reply to अर्रर्र... धागा वाचलाच नव्हता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काम करायचं तर बंद करायला पाहिजे होतं का हे सर्व ?
In reply to लॉकडाऊन by रात्रीचे चांदणे
पहील्या घोषणे नंतर खरेच खुप
In reply to काम करायचं तर बंद करायला पाहिजे होतं का हे सर्व ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर आताचा पुणे-पिंपरी चिंचवडचा
In reply to काम करायचं तर बंद करायला पाहिजे होतं का हे सर्व ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं मान्य करु...
In reply to सर आताचा पुणे-पिंपरी चिंचवडचा by माहितगार
लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच
In reply to बरं मान्य करु... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच by सुबोध खरे
अविश्वासाचे दुष्ट चक्र ?
In reply to बरं मान्य करु... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा
In reply to अर्रर्र... धागा वाचलाच नव्हता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.
In reply to लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा by सुबोध खरे
आपला पूर्वग्रह फार पूर्वीच
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार.
In reply to आपला पूर्वग्रह फार पूर्वीच by सुबोध खरे
मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे,
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
.
तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा.
In reply to . by Gk
एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर
In reply to तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा. by माहितगार
News
In reply to तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा. by माहितगार
मला वाटते या वृत्तातील दावे
In reply to News by Gk
पंख
सहमत आहे.
1 लाख एक बार ......
1. मोठी सरकारी हॉस्पिटल व
मागे अमित शाहंचं एक इंटरव्यू
* मी /(तुम्ही) / (आपण).. ..