थोरांची ओळख ... महान साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी'
( तेथेही त्यांना एका अमेरिकन कंपनीकडून दक्षिण ध्रुवावर तेल शोधायला आलेल्या एका गोर्या लोकांच्या चमूनेच वाचवले हे विशेष..)
बुरुंडीत भरलेल्या पहिल्या जागतिक अतिविद्रोही साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.पण संयोजन समितीत प्रचंड मतभेद होतेच.बुरुंडी आणि र्वांडा इथली मराठी मंडळे सिएरा-लिओन,घाना,बोट्स्वाना इथल्या मंडळांवर अन्याय करताहेत ही भावना दृढ होत चाललेली होती.त्यातून " आता संमेलनच बरखास्त करा" अशा आरोळ्या उठल्या. दक्षिण ध्रुव प्रकल्पाबद्दल त्यांनी घेतलेल्या अमेरिकन कंपनीच्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित झाले. जालिंदरजींवर "अमेरिकेचे बगलबच्चे" असा अत्यंत उद्वेगजनक आरोप झाला.पण मी हे सारे मराठी साहित्याच्या उद्धारासाठी केले असे त्यांनी सांगून पाहिले. पण विरोधकांचा आवाज प्रचंड होता. ही सारी बंडाळी उद्घाटनप्रसंगी उघड झाली. शक्तीप्रदर्शन झाले,घोषणाबाजी ,पत्रकबाजी झाली. जालिंदरजींनी नाक घासून माफ़ी मागावी अशी मागणी केली गेली. जालिंदरजींनी उद्वेगाने म्हटले, " अरे ही काय लोकसभा आहे का?" झाले, आधीच चिडलेल्या बंडखोरांची तळपायाची आग मस्तकाला गेली.
तलवारी उपसल्या गेल्या,प्रत्युत्तर म्हणून बंदुका दाखवल्या गेल्या.तरीही संमेलनाची सुरुवात झालीच. जालिंदरजींनी भाषणासाठी माईक हातात घेताच "कुठेतरी भोसकाभोसकी झाली ..." अशी आरोळी उठली. हवेत गोळीबार झाला. संमेलनाचे व्यासपीठ सोडून सर्व पाहुणे पळाले. एकच गोंधळ माजला.तलवारींची पाती सपासप फ़िरू लागली.. गोळीबाराने आसमंत दुमदुमला. पण तरीही एका हातात माईक ठेवून दुसर्या हाताने स्वसंरक्षणार्थ गोळीबार करत विविध ठिकाणी दडी मारत मारत जालिंदरजींनी आपले ३८ मिनिटांचे भाषण पूर्ण केले. त्यांना कव्हर फ़ायर देणारे त्यांचे अनुयायी आजही त्या प्रसंगाचे चित्तथरारक वर्णन करतात.
जालिंदरजींचे समर्थक
संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच जालिंदरजींची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली..पण ते बेमालूम वेषांतर करण्यात इतके तरबेज होते की ते स्वत:च वेषांतर करून या अंत्ययात्रेत सामील झाले आणि स्वत:च्या तिरडीला खांदा दिला आणि प्रतिमादहनाचे महत्त्वाचे नियमही सर्वांना समजावून सांगितले..
पण एक शल्य त्यांना बोचत होते की त्यांचे संमेलनाध्यक्ष या नात्याने केलेले महत्त्वाचे भाषण जनसामान्यांपर्यंत पोचलेले नाही.म्हणून त्यांनी बुरुंडी, र्वांडा, सिएरा लिओन ,घाना इथल्या विविध वाड्या वस्त्यांवरती जाऊन प्रत्येक माणसाला एका भाकरीच्या बदल्यात स्वत:चे भाषण वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या या युक्तीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.मात्र तेथे एका टोळीकडून दुसर्या भाकरीसाठी त्यांच्यावरती दबाव आणायचा प्रयत्न झाला, नंतर त्यांच्यावर दुसरी भाकरी मिळवण्यासाठी हल्ला झाला. तरीही "एकावेळी एकच भाकरी " या त्यांच्या पवित्र्यापासून ते तसूभरही मागे हटले नाहीत....स्वत:चा जीव धोक्यात घालून मराठी साहित्याचा अफ़्रिकन आदिवासी टोळ्यांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचे हे दैवी कार्य करण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा आज इतर कोठे दिसेल काय ? स्वत:च्या भाषेप्रती केवढी ही अव्याभिचारी निष्ठा !!! एका वेळी एकच भाकरी ही त्यांची गर्जना पुढली शतकानुशतके साहित्यिकांना प्रेरणा देत राहील.
या थोर साहित्यिकाला प्रस्थापितांनी कायमच उपेक्षित ठेवले. त्यांच्यावर पुष्कळ आरोप केले गेले. साहित्यजगतात ते उर्मट , उन्मत्त म्हणून प्रसिद्ध होते. ."अमेरिकेचा बगलबच्चा" हा मात्र सर्वात हृदय विद्ध करणारा आरोप असं त्यांना वाटतं. मायमराठीनेच आपल्याला सार्या आरोपातून तरून जायची शक्ती दिली, असे ते मानतात. हल्ली अगदी कोणालाही ( अगदी उथळ नटनट्यांना,गाणं-बजावण्यातल्यांनासुद्धा) पद्म पुरस्कार दिले जातात, पण इतक्या धाडसी, गुणी आणि लोकोत्तर साहित्यिकाला दुर्लक्षित करणे हेच जणू इथल्या अभिजनवर्गाचे नेहमीचे काम झाले आहे. मी ही खंत त्यांच्यापुढे व्यक्त केली तरी ते फ़क्त हसतात...आयुष्याच्या शेवटी जालिंदरजी समाधानी आहेत. खूप काही करायचं राहून गेलं हे शल्य मात्र त्यांना कधीकधी बोचतं ...
सध्या ते ८८ वर्षांचे आहेत .. निवृत्त आयुष्य सुखाने जगत आहेत... विविध व्याधी मागे आहेत, औषधे गोळ्या यांचा मारा चालू आहे पण मन तेवढेच उत्फ़ुल्ल आहे...
कधी घरी गेलो तर ओळखतात, पडल्या पडल्या स्माईल करतात आणि गप्पा मारायला सुरुवात होते .
हळूच चावट जोक सांगणं असो किंवा ल्यापटॊपवर लिहिलेली नवीन कविता असो,जगणं आनंदात चालू आहे...
परवा म्हणाले, " पंतप्रधानांच्या अर्थविषयक प्रबंधाला चाल लावता येइल का रे? मला आता गावंस वाटतंय"... पण मी म्हटलं," अर्थविषयक गाणंच का?" तर मला डोळे मारत म्हणाले," एखादी पद्मश्री मी ही मिळवेन म्हणतो".....काय हा विनोदी स्वभाव !!!
बिछान्यावर पडल्यापडल्या ते दोरीवरच्या मल्लखांबातल्या काही ट्रिक्स करून दाखवतात तेव्हा मन थक्क होते. आताच ही स्थिती तर हा माणूस तरूणपणी काय असेल !!! "मी जन्म मानत असतो तर पुढल्या जन्मी मल्लखांबपटू झालो असतो" असं म्हणत ते एक जुना पिवळा पडलेला फोटो दाखवतात, मी विचारतो, हे कोणते झाड आहे? त्यांनी सांगितलं," हा मल्लखांब करताना काढलेला माझा फोटो आहे.".. मी त्या फोटोचा फोटो काढला. तो फोटो माझ्याकडे जपून ठेवलेला आहे.हाच तो फोटो...
क्षणभंगुर सिंगूर हे त्यांचे महाकाव्य ते सध्या पूर्ण करत आहेत. जगाने कितीही दुर्लक्ष केले तरी जालिंदरजींची निदान आंतरजाल तरी दखल घेईल अशी आशा आहे...
In reply to मास्तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
जगाने कितीही दुर्लक्ष केले तरी जालिंदरजींची निदान आंतरजाल तरी दखल घेईल अशी आशा आहे...चलो जालिंदर मास्तर आया है| अब जितना चाहे मिसलपाव खाओ! मास्तर अवो जंता लई ईसरभोळी अस्तिया आपन नस्ती वळख करुन दिली तर मान्स यवढ्या मोठ्य अतिईद्रोही भगिंदर ला ईसारली अस्ती. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to मास्तुरे! मास्तुरे!! by चतुरंग
In reply to मास्तुरे! मास्तुरे!! by चतुरंग
In reply to चतुरंगजी, by भडकमकर मास्तर
In reply to ठ्ठो! by धनंजय
In reply to ठ्ठो-ठ्ठो-ठ्ठो by भडकमकर मास्तर
In reply to ठ्ठो-ठ्ठो-ठ्ठो by भडकमकर मास्तर
In reply to र्वांडा-बुरुंडी मंडळातील अंदाधुंद कारभार by धनंजय
In reply to र्वांडा-बुरुंडी मंडळातील अंदाधुंद कारभार by धनंजय
In reply to डब्बावाला by भडकमकर मास्तर
In reply to दंडवत by नंदन

In reply to अती हुच्च by दशानन
In reply to वा वा by टिउ
In reply to अरे by रेवती
In reply to धन्य आहात मास्तर ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धन्य आहात मास्तर ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'क्षणभंगुर सिंगूर' या त्यांच्या काव्याला आमची प्रस्तावना आहे, हे सांगतांना खूप आनंद होत आहे.सिंगुरला क्षणभंगूर म्हटल्याने सिंगूरवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्याला साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष वगैरे व्हायचे असेल तर निवडणूकी आधीच ते प्रकरण निपटा बॉ :) -- लिखाळ.
In reply to मास्तरांप by विसोबा खेचर
In reply to फार by शरदिनी
In reply to सहमत आहे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to +१ by दशानन
In reply to सहमत आहे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to फार by शरदिनी
मास्तर