काॅफी पिऊन आले...
ऐकावयास गेले,
बोलून काय आले?
बोलावलेस तू, मी
काॅफी पिऊन आले..
ना थेंब पावसाचा
ओली.. भिजून आले.
भांबावल्या दुपारी
काॅफी पिऊन आले..
होते कुणी न कोणी
नव्हतोच एकटे ना?
लोकां कसे पटावे
काॅफी पिऊन आले?
पेले जरी रिकामे
डोळे भरून आले..
वाहू मुळी न देता
काॅफी पिऊन आले.
वाचने
41980
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
प्रतिक्रिया
कविता आमच्या पर्यंत पोहोचली
( जिकडे पोहोचायला हवी होती तिकडे तुम्ही पोहोचवली का पोहचवल्यावर पोहोचली का ते माहित नाही, माहित असण्याची गरजही नाही म्हणा:)) )
In reply to कविता आमच्या पर्यंत पोहोचली by माहितगार
:)):)):))
कॉफीसोबत सँडविच, केक किंवा कुकीज नसतील तर आमचेही डोळे असेच भरून येतात.
आवडली.
सुरेख. आवडले.
बाकी नक्की काय झालं असावं हा जो धूसर भाग आहे ना, त्यामुळे आणिक मझा येतोय वाचतांना! ;-)
फारच आवडली
रच्याकने :- या कवितेला "कीस बाई कीस दोडका कीस," ची चाल फीट बसते.
पैजारबुवा,
In reply to कविता आवडली by ज्ञानोबाचे पैजार
"अपना टाईम आयेगा"ची चाल पण परफेक्ट बसते
बाकी कॉफी आवडली. ;)
In reply to कविता आवडली by ज्ञानोबाचे पैजार
हे राष्ट्र देवतांचे.. का?
:)
कॉफी मस्त, सुगंधित आहे ना? बाकी सब को मारो गोली!

धन्यवाद सगळ्यांना!
+1
पण ग्लास छोटा होता की काय असा प्रश्न निर्माण झाला ...
काही तरी रूपक आहे पण विचार खरतोय.
---------
तुटत आलेले नाते?
In reply to काही तरी रूपक आहे पण विचार by कंजूस
किंवा 'शिल्लक असलेले हळुवार भावबंध' असे जरासे सकारात्मक करून वाचणे शक्य होईल का?
'प्राची अश्विनींच्या मागिल लेखनाच्या लयीतील एक आणखी वेगळं काव्यपुष्प' असे म्हणता येईल का?
In reply to किंवा 'शिल्लक असलेले हळुवार by माहितगार
__/\__
विचार करतोय.
तुटत आलेले नाते?
अनेकांना विडंबनासाठी प्रेरणा देणारी कविता आवडली _/\_
आवडली कविता. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
कॉफी आवडली
In reply to कॉफी आवडली by प्रशांत
अच्छा, प्रशांतही होता तेथे कॉफी प्यायला !!? =))
In reply to अच्छा, प्रशांतही होता तेथे by डॉ सुहास म्हात्रे
आता प्रशांतला काहीतरी प्यायला नेऊन अर्थ समजून घेणे आले.
In reply to आता प्रशांतला काहीतरी प्यायला by गवि
बिल तुम्हिच देणार
In reply to अगदि by प्रशांत
गवि बिल देणार असले तर मीही सोबत येईन.
In reply to गवि बिल देणार असले तर मीही by प्रचेतस
गांव बसा नही और...
In reply to . by गवि
तुम्ही बिल देणार ही संधी कशी सोडू? आधीच बुक केलेलं उत्तम.
In reply to . by गवि
गवि जपून बर्का, वल्ली एकटा येत नाही म्हणे. तो आला की मागुन मुलींची रांग असते.
In reply to गवि जपून बर्का, वल्ली एकटा by गणपा
काहीतरीच हं तुझं.
In reply to गवि जपून बर्का, वल्ली एकटा by गणपा
हो ना. त्यांचे ते स्टारबक्सादि हँगौट्स आपल्याला परवडत नाहीत. प्रशांतचं काय, टपरीवरही केसरी उकाळा वगैरेवर भागवता येईल.
In reply to हो ना. त्यांचे ते by गवि
आपल्यालाही टपरी चहाच प्रिय.
In reply to गवि जपून बर्का, वल्ली एकटा by गणपा
तो आला की मागुन मुलींची (?) रांग असते
धन्यवाद सगळ्यांना!
फक्कड!
आले आमच्या कडे चहात टाकतात. कॉफीत कसे लागते?
कॉफीत"सुके आले " म्हणजे सुंठ टाकतात

ही पण छान आहे !


28966 टिचक्या कवितेच्या धाग्यावर बघून डोळे भरून आले.
आजकाल अनुक्रमे 28,89,66,96 टिचक्या जरी आल्या तरी मन सुखावते.
कविता आमच्या पर्यंत पोहोचली