मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काॅफी पिऊन आले...

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ऐकावयास गेले, बोलून काय आले? बोलावलेस तू, मी काॅफी पिऊन आले.. ना थेंब पावसाचा ओली.. भिजून आले. भांबावल्या दुपारी काॅफी पिऊन आले.. होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे काॅफी पिऊन आले? पेले जरी रिकामे डोळे भरून आले.. वाहू मुळी न देता काॅफी पिऊन आले.

वाचने 41976 वाचनखूण प्रतिक्रिया 40

माहितगार Fri, 06/28/2019 - 10:26
कविता आमच्या पर्यंत पोहोचली ( जिकडे पोहोचायला हवी होती तिकडे तुम्ही पोहोचवली का पोहचवल्यावर पोहोचली का ते माहित नाही, माहित असण्याची गरजही नाही म्हणा:)) )

राघव Fri, 06/28/2019 - 11:59
सुरेख. आवडले. बाकी नक्की काय झालं असावं हा जो धूसर भाग आहे ना, त्यामुळे आणिक मझा येतोय वाचतांना! ;-)

In reply to by कंजूस

माहितगार Mon, 07/01/2019 - 12:22
किंवा 'शिल्लक असलेले हळुवार भावबंध' असे जरासे सकारात्मक करून वाचणे शक्य होईल का? 'प्राची अश्विनींच्या मागिल लेखनाच्या लयीतील एक आणखी वेगळं काव्यपुष्प' असे म्हणता येईल का?

टर्मीनेटर Mon, 07/01/2019 - 11:19
अनेकांना विडंबनासाठी प्रेरणा देणारी कविता आवडली _/\_

In reply to by गणपा

गवि Mon, 07/01/2019 - 13:53
हो ना. त्यांचे ते स्टारबक्सादि हँगौट्स आपल्याला परवडत नाहीत. प्रशांतचं काय, टपरीवरही केसरी उकाळा वगैरेवर भागवता येईल.

कर्नलतपस्वी Wed, 12/27/2023 - 19:03
28966 टिचक्या कवितेच्या धाग्यावर बघून डोळे भरून आले. आजकाल अनुक्रमे 28,89,66,96 टिचक्या जरी आल्या तरी मन सुखावते.