मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काॅफी पिऊन आले...

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ऐकावयास गेले, बोलून काय आले? बोलावलेस तू, मी काॅफी पिऊन आले.. ना थेंब पावसाचा ओली.. भिजून आले. भांबावल्या दुपारी काॅफी पिऊन आले.. होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे काॅफी पिऊन आले? पेले जरी रिकामे डोळे भरून आले.. वाहू मुळी न देता काॅफी पिऊन आले.

वाचने 41980 वाचनखूण प्रतिक्रिया 40

माहितगार 28/06/2019 - 10:26
कविता आमच्या पर्यंत पोहोचली ( जिकडे पोहोचायला हवी होती तिकडे तुम्ही पोहोचवली का पोहचवल्यावर पोहोचली का ते माहित नाही, माहित असण्याची गरजही नाही म्हणा:)) )

चलत मुसाफिर 28/06/2019 - 11:34
कॉफीसोबत सँडविच, केक किंवा कुकीज नसतील तर आमचेही डोळे असेच भरून येतात.

राघव 28/06/2019 - 11:59
सुरेख. आवडले. बाकी नक्की काय झालं असावं हा जो धूसर भाग आहे ना, त्यामुळे आणिक मझा येतोय वाचतांना! ;-)

ज्ञानोबाचे पैजार 28/06/2019 - 12:35
फारच आवडली रच्याकने :- या कवितेला "कीस बाई कीस दोडका कीस," ची चाल फीट बसते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अभ्या.. 28/06/2019 - 12:48
"अपना टाईम आयेगा"ची चाल पण परफेक्ट बसते बाकी कॉफी आवडली. ;)

जालिम लोशन 28/06/2019 - 18:14
+1

In reply to by कंजूस

माहितगार 01/07/2019 - 12:22
किंवा 'शिल्लक असलेले हळुवार भावबंध' असे जरासे सकारात्मक करून वाचणे शक्य होईल का? 'प्राची अश्विनींच्या मागिल लेखनाच्या लयीतील एक आणखी वेगळं काव्यपुष्प' असे म्हणता येईल का?

टर्मीनेटर 01/07/2019 - 11:19
अनेकांना विडंबनासाठी प्रेरणा देणारी कविता आवडली _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 01/07/2019 - 12:46
आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by गणपा

गवि 01/07/2019 - 13:53
हो ना. त्यांचे ते स्टारबक्सादि हँगौट्स आपल्याला परवडत नाहीत. प्रशांतचं काय, टपरीवरही केसरी उकाळा वगैरेवर भागवता येईल.

रानरेडा 05/07/2019 - 23:44
आले आमच्या कडे चहात टाकतात. कॉफीत कसे लागते?

डॉ सुहास म्हात्रे 08/07/2019 - 15:25
ही पण छान आहे !

कर्नलतपस्वी 27/12/2023 - 19:03
28966 टिचक्या कवितेच्या धाग्यावर बघून डोळे भरून आले. आजकाल अनुक्रमे 28,89,66,96 टिचक्या जरी आल्या तरी मन सुखावते.