सोनियाच्या सुता तुला खानदानी वरदान....
लेखनविषय:
दादा कोंडकेंची माफी मागून
मूळ गीत - अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
सोनियाच्या सुता, तुला खानदानी वरदान....
एकमुखाने चमचे, गाती राहुल आख्यान || ध ||
माता किरीस्ताव तुझी, पिता पारशी बावा...
जानवेधारी ब्राह्मण म्हणूनी, कैसा तू खपावा?
पन्नाशीला आला, बुद्धी बालकासमान.... || १ ||
चहुकडे ऐसे ज्ञान, पाजळशी राया...
सकाळच्या रात्री उठीसी, ऐसी तुझी माया...
खुळावले शिंदे, झाले मनमोहन हैराण... || २ ||
देशद्रोह्यांसाठी घेतलीस, विद्यापीठी धाव....
करा देशाचे तुकडे, हम आए तुम्हें बचाव...
चाचा दिग्वीजय, कन्हैया बंधूसमान... || ३ ||
जमत नाही म्हणूनी आली, बहिण धावून...
जिजाजींनी भरल्या तुंबड्य, जमिनी लाटून...
झाली चौकशी तर, धोक्यात संविधान... || ४ ||
स्वप्न मोहनदासाचे होवो, विसर्जित पक्ष...
नाही जमले कोणा परी, तुझे तेच लक्ष्य...
जामिनावर सुटूनी, म्हणसी चोर पंतप्रधान... || ५ ||
- यतिन भट
वाचने
16496
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मजा आली वाचून ! मीटरमध्ये पण भारी वाटते...
लै म्हणजे लै म्हणजे लैच जबरा लिहीली आहे.
आजकाल पप्पु त्याच्या चाळ्यांमुळे फारच डोक्यात जायला लागला आहे.
पैजारबुवा,
एक नंबर.
कोल्हापुरी मोड ON.
जबराट.. एकदम नाद खुळा.... !!!
वांड.. भावा झिकलस.... !!!
कोल्हापूर मोड OFF
In reply to कोल्हापुरी मोड ON. by बाप्पू
बाललीला सध्या राउतांच्या चालू आहेत त्यावर ये ऊ द्या काही!!
एकदम भारी!
छान
मस्त! मोदीवर सुद्धा एक विडंबनात्मक कविता लिहून उपकृत कराल अशी आशा आहे! टॉम मोर्वोलो रिडल यांच्या तुकारामांवरील कवितेची आठवण झाली!इथे तो विषय नाही पण सर्वांनी एकदा वाचावीत अशी सुंदर कविता:
नाही वैकुंठाला गेला.......
नाही वैकुंठाला गेला ।
तुका मारूनी टाकला ।
डाव्या हाताचा कलंक ।
उजव्या हाताने झाकला ॥१॥
ऐसे बोलीले बयान । आले नेण्यासी विमान ।
त्यात बैसुनिया तुका ।
गेला निघुनी गुमानं ॥२॥
खरे काय , काय खोटे । सत्य
जाणूनी घेवावे ।
मीही सांगितले म्हणुनी । नाही विश्वासी रहावे ॥३॥
गीतेवरी भाष्य ग्रंथ ।
तुका लिही मंत्रगीता । त्याने
भडकला तेंव्हा । वेदाभिमान्यांचा
माथा ॥४॥
वर्णव्यवस्था तयाने । सारी येईल धोक्यात ।
वेदाविरोधाचे ज्ञान । कैसे भरले
तुक्यात ? ॥५॥
रामेश्वर भटा सांगे । सांगे
मंबाजी चुगली ।
मन कर्मठांची मने । तुका रोषाने फ़ुगली ॥६॥
रामेश्वराच्या दिवाणी । न्याय
मागूनी घेतला ।
तुकोबांचा ग्रंथसाठा । इंद्रायणीत
फ़ेकला ॥७॥
होते तुकाचे अभंग । बहु लोकायच्या तोंडी ।
पुन्हा आले जनलोकी । कैसी होणार
गा कोंडी ॥८॥
रामेश्वर मंबाजीने । मारियले तुकोबास ।
आणि सांगिले जगाला ।
तुका गेला वैकुंठास ॥९॥
-टॉम मोर्वोलो रिडल
In reply to मस्त! by व्ही. डी. सी.
प्रायोजक
बळचकर आणि ढकलकर कंपनी
शिल्लक सोना बटाट्याचे आणि बोबडकांद्याचे ठोक व्यापारी
In reply to मस्त! by व्ही. डी. सी.
अनिता पाटील विचार मंच ब्लॉग का?
तिथे सापडली. आवडली.
नाही! संजय सोनावनी यांचा ब्लॉग!
In reply to यशोधरा by व्ही. डी. सी.
ओके, एकच ते सगळे म्हणा.
रिडलचा वॉल्डमॉट नाही झाला म्हणजे मिळवली.
In reply to ओके, एकच ते सगळे म्हणा. by यशोधरा
म्हणजे काय????
स्पष्ट काय ते लिहा!!!
भौतिक शास्त्रानुसार मान्य केले की तुकोबाराय सदेह स्वर्गाला नाही गेले, परंतु त्यांचा खून झाला आणि तो अमुक व्यक्तीनेच केला हे तुम्हास कसे कळले?
In reply to भौतिक शास्त्रानुसार मान्य by जानु
सर्व प्रतिक्रिया वाचा:
https://sanjaysonawani.blogspot.com/2014/04/blog-post_4.html
डॉ. सुदाम सावरकर लिखित 'वैकुण्ठगमन की खून' हे पुस्तक वाचावे. पुस्तक बुकगंगा.कॉम वरती सुद्धा उपलब्ध असू शकेल:
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4758228737214917033?BookName=Vaikunthgamn-kee-khun
+1
आवडली..
http://www.misalpav.com/node/44082
अजून एक
क्या बात...!
एकच नंबर
जबरदस्त !! ओरीजीनल ते ओरीजीनलच !!
सोनसुताची बिनपाण्याची करून टाकलीय राव ..जबर्या लिवलंय ...
सोनियाच्या भूता
लैच भारी राव....