मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोनियाच्या सुता तुला खानदानी वरदान....

स्पार्टाकस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
दादा कोंडकेंची माफी मागून मूळ गीत - अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान सोनियाच्या सुता, तुला खानदानी वरदान.... एकमुखाने चमचे, गाती राहुल आख्यान || ध || माता किरीस्ताव तुझी, पिता पारशी बावा... जानवेधारी ब्राह्मण म्हणूनी, कैसा तू खपावा? पन्नाशीला आला, बुद्धी बालकासमान.... || १ || चहुकडे ऐसे ज्ञान, पाजळशी राया... सकाळच्या रात्री उठीसी, ऐसी तुझी माया... खुळावले शिंदे, झाले मनमोहन हैराण... || २ || देशद्रोह्यांसाठी घेतलीस, विद्यापीठी धाव.... करा देशाचे तुकडे, हम आए तुम्हें बचाव... चाचा दिग्वीजय, कन्हैया बंधूसमान... || ३ || जमत नाही म्हणूनी आली, बहिण धावून... जिजाजींनी भरल्या तुंबड्य, जमिनी लाटून... झाली चौकशी तर, धोक्यात संविधान... || ४ || स्वप्न मोहनदासाचे होवो, विसर्जित पक्ष... नाही जमले कोणा परी, तुझे तेच लक्ष्य... जामिनावर सुटूनी, म्हणसी चोर पंतप्रधान... || ५ || - यतिन भट

वाचन 16492 प्रतिक्रिया 0