मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(आज)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
क्रांतीताईंची 'आज' ही सुंदर कविता वाचली आणि मग "त्याचे उत्तर माहीत असूनही दिले नाहीस तर डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील" ह्या वेताळाच्या धमकीप्रमाणे, "तुझ्या धर्माला जागला नाहीस तर ह्या ओळी रात्री छळू लागतील" ह्या भीतीने मला हे लिहिणे भाग पडले! ;) नक्कीच काहीतरी चुकतय आज कशानं अंग माझं दुखतय आज? निरोप तिचा होता दोनच ओळी पिंगा घातला मी भलत्याच वेळी अनावर रात्री चुकलिच खेळी थोबाड का असं सुजलय आज? कालची ती मिशी ओठांवर नाही डोईवर मुळीच केसही न राही उजाड माळाची का वाट मी पाही? पोटात भलतंच गुर्गुरतय आज! नवीन पत्त्यांची पिसतोय पानं दारूत बर्फाचं वितळून जाणं षौकाचं दुखणं जुनं-पुराणं उफाळून पुन्हा का सलतय आज? चतुरंग

वाचने 2987 वाचनखूण प्रतिक्रिया 14

बाई बाई बाई... शोभतं का हे असलं वागणं? निरोप तिचा होता दोनच ओळी पिंगा घातला मी भलत्याच वेळी अनावर रात्री चुकलिच खेळी थोबाड का असं सुजलय आज? =)) १ लंबर.... बिपिन कार्यकर्ते

अवलिया 13/03/2009 - 09:22
वा! रंगाशेठ ! सकाळ मस्तच रंगली! षौक संभाळा हो!! :) --अवलिया

मराठमोळा 13/03/2009 - 09:24
हा हा हा हसुन हसुन बेजार झालो... कोणाला काय सुचेल त्याचा नेम नाही..विशेषतः विडंबनकारांना.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

सुंदर विडंबन :) सुजलेल्या थोबाडाची गोष्ट मस्त.. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

राघव 13/03/2009 - 12:15
काय लिहिलंय.. क्लास!! सुंदर कवितेला साजेसंच सुंदर विडंबन! :) राघव

क्रान्ति 13/03/2009 - 21:41
काऊन भौ थोबाड सुजवून घेत्ल? आता जरा इडंबनाची दवा-दारू करा आन गुमान मिसळ्पाव खाऊन पडा! तुमि थोबाड सुजवून घेत्ल आनि हासू हासू आमाला बी बेजार केल की बापा! चालू द्या चालू द्या! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}