(आज)
क्रांतीताईंची 'आज' ही सुंदर कविता वाचली आणि मग "त्याचे उत्तर माहीत असूनही दिले नाहीस तर डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील" ह्या वेताळाच्या धमकीप्रमाणे, "तुझ्या धर्माला जागला नाहीस तर ह्या ओळी रात्री छळू लागतील" ह्या भीतीने मला हे लिहिणे भाग पडले! ;)
नक्कीच काहीतरी चुकतय आज
कशानं अंग माझं दुखतय आज?
निरोप तिचा होता दोनच ओळी
पिंगा घातला मी भलत्याच वेळी
अनावर रात्री चुकलिच खेळी
थोबाड का असं सुजलय आज?
कालची ती मिशी ओठांवर नाही
डोईवर मुळीच केसही न राही
उजाड माळाची का वाट मी पाही?
पोटात भलतंच गुर्गुरतय आज!
नवीन पत्त्यांची पिसतोय पानं
दारूत बर्फाचं वितळून जाणं
षौकाचं दुखणं जुनं-पुराणं
उफाळून पुन्हा का सलतय आज?
चतुरंग
वाचन
2987
प्रतिक्रिया
0