Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२२

श्रीगणेश लेखमाला २०२३ - हळूहळू सवय होईल - रिलोडेड

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 20/09/2023 13:15 या दिवशी प्रकाशित केले.

तंत्रज्ञानाने जग इतकं छोटं झालंय की अंतर्देशीय व तार यंत्राच्या जमान्यातला मी स्काइप आणि कायप्पावर मुलीला प्रत्यक्ष बघताना अचंबित झालो होतो. अर्थात याचीही हळूहळू सवय होत गेली. आता सकाळ-संध्याकाळ मोबाइलवर बोलणं दररोजचा दिनक्रम झाला. आता तिचं नसणं आंगवळणी पडलं. पुढे शिक्षण झालं, मनासारखा साथीदार मिळाला. आता एफडीवरचं व्याज मिळण्याची वेळ आली आणि आमची परदेशी जाण्याची बारी आली.पहिलटकरणीसारखी मन:स्थिती, काय होईल कसं होईल.. पण मुलांनी सूत्रं हाती घेतली आणी दे मेड इट पॉसिबल.... (अम्रीकेत जायचं म्हणजे थोडी प्रॅक्टिस नको!)