Skip to main content

फोटो ओळखा 2

लेखक खंडेराव यांनी गुरुवार, 14/03/2019 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ - Photo Olkha 1 नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

वाचने 126529
प्रतिक्रिया 263

प्रतिक्रिया

इतक्यांदा 'च च' बघून फोटोबद्दल कोणी चकार शब्द बोलले नाही असे म्हणायची सोय राहिली नाही :-) फोटो - नाहरगढ किल्ला जयपूर येथील पाणी साठवणुकीच्या तळ्याचाच आहे. मला तो पायऱ्यांचा पॅटर्न फार आवडला.

In reply to by प्रसाद_१९८२

फोटोला पब्लिक अ‍ॅक्सेस नाही. प्रथम पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन, मग त्याचा इमेज अ‍ॅड्रेस वापरून, तो इथे परत टाकला तर दिसू शकेल.

In reply to by प्रसाद_१९८२

बहुधा महाबलीपूरम (तामिळनाडू) येथील ओळक्कणेश्वरा हे शिवाचं मंदिर ? (हे महिषासूर मर्दिनी मंडप मंदिर असा सार्वत्रिक गैरसमज आहे) याच परिसारात महाबलीपूरमचं विख्यात असं दीपगृह आहे !

In reply to by चौथा कोनाडा

ज्या खडकात महिषासूर मर्दिनी मंडपाच्या गुफा आहेत अगदी त्यावरच ओळक्कानेश्वर मंदिर असल्याने असा गैरसमज होत असेल.

In reply to by चौथा कोनाडा

बरोबर ओळखलेय ! ---- याच परिसारात महाबलीपूरमचं विख्यात असं दीपगृह आहे ! -- या वरिल फोटोतील मंदिरातून घेतलेला दिपगृहाचा हा फोटो. -- -- 1

In reply to by तुषार काळभोर

अरे हा धागा का सुस्त ? रचनेवरून बंगाल / आसाम भागातील वाटते आहे. अशी मंदिरे मी हरिपूर (बंगाल) आणि शिवसागर (आसाम) मध्ये बघितली आहेत, पण हे नक्की कुठले ते सांगा आता पैलवान.

In reply to by तुषार काळभोर

पश्चिम बंगालमधील विष्णुपूर येथील टेराकोटा रचना व पंचरत्न शैलीतील "शामराई मंदिर " असावे. टेराकोटा -भाजलेली माती /वीटा पंचरत्न शैली - पाच शिखर असलेली

@ पैलवान, गोरगावलेकर म्हणतात तसे 'शामराई' मंदिरच आहे का ?

ओळखा हे भव्य शिल्प कोणत्या देवतेचे आहे , कुठे आहे आणि या ठिकाणची महती काय? (फोटो क्रॉप केला आहे. मुद्दामच पूर्ण फोटो दिलेला नाही )

In reply to by गोरगावलेकर

शिव - भैरव स्वरूपात. डाव्या हातात कपाल धारण केले आहे तर उजव्या हातात फूल वाटते आहे. कपालाच्या बाजूस शिवलिंग दिसते आहे. ठिकाण माहीत नाही पण उत्तर भारतीय नागर शैली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा ओरिसा.

निरीक्षण अचूक. तरीही मूर्ती कुठल्या देवतेची या बाबतीतला अंदाज करणे केवळ अशक्य. गुगलल्याशिवाय सांगणे कठीण किंवा प्रत्यक्ष जाऊन आलेले लोकच सांगू शकतील. उद्यापर्यंत वाट पाहून उत्तर देईन

शंकराचा या जागेशी निश्चित संबंध आहे पण हे शिवाचे रूप नाही

आधी हा पूर्ण फोटो  हे शिल्प देवी पार्वतीचे आहे. (मी स्वत: सहमत नाही. कारण कुठल्याच अंगाने हि स्त्रीची प्रतिमा वाटत नाही) ठिकाण: बैजनाथ, उत्तराखंड. अशी वंदता आहे की भगवान शंकर व पार्वतीचा विवाह येथेच म्हणजे गोमती व गरुडगंगा नदीच्या संगमावर संपन्न झाला होता. जालावर बऱ्याच ठिकाणी शिल्पाचा उल्लेख पार्वती असाच केला आहे . पार्वतीच्या शिल्पाविषयी येथे वाचायला मिळते पण फोटो नाही. आम्ही २०१५ ला या मंदिरास भेट दिली तेव्हा हे शिल्प पहिले आहे. पण माहिती देणारी कोणतीही जाणकार व्यक्ती बरोबर नव्हती . त्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे/संग्राहालयात ठेवायची असल्या कारणाने ही मूर्ती भांडारागृहात बंदिस्त करण्यात आली आहे. येथेही या मूर्तीचा पार्वती असाच संदर्भ आहे. बातमी फोटो ओळखण्यासाठी मी दिलेला असला तरी माझ्या उत्तरावर मीच ठाम नाही. प्रचतेस यांचेच म्हणणे बरोबर असावे.

In reply to by गोरगावलेकर

पार्वती शक्यच नाही. तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन पाहिले असता मूर्तीचा जवळून दिसणारा फोटो आहे. हातातील कपाल तर स्पष्टच आहे, शेजारी त्रिशुळ दिसत आहेत. शिवाय स्त्री मूर्ती ही नाहीच. भैरवच हा.

मी माझे शब्द मागे घेते. हे शिल्प भैरवाचेच असावे. गोंधळलेली गोरगावलेकर

In reply to by तुषार काळभोर

हत्ती हे वाहन फक्त इंद्राचे आहे ना?
नाही, इतर देवतांचेही आहे :) वज्र नाहीये, पण इतर लक्षणे आहेत. ही देवता इंद्र नाही.

In reply to by चांदणे संदीप

नाही. हा कुबेर आहे. कुबेर हा मुख्यतः नरवाहन, पण मध्ययुगात त्याला हत्ती हे वाहनही चिकटले. कुबेर ओळखायचे प्रमुख लक्षण म्हणजे त्याच्या खांद्यावर असलेली धनाची पिशवी. कुबेराच्या काही शिल्पांत ह्या पिशवीचे तोंड मुंगसासारखे पण असते.

In reply to by प्रचेतस

लोल! =)) मी तेच केल. आधी तुमचे धागे चाळले. अर्थात बरोबर म्हटल्यावरही सांगणारच होतो. पण हे बरोबर नाही. हाच प्रश्न हॉटसीटवर एक करोडसाठी वगैरे असता तर केवढा मोठ्ठा पोपट झाला असता. :प (तेवढं, धाग्यात बदलून घ्या) सं - दी - प

हुश्श! सापडले एकदाचे. क्रमांक ४३ आणि त्यावरचा सुधारित उल्लेख. लक्षणांहून मला नाही ओळखता येत. पण शोधाशोध करण्याच्या निमित्ताने काही नवीन माहिती मिळते त्यातच आनंद.

In reply to by गोरगावलेकर

हा फोटो पाहून तिकोन्यावरचा चपेटदान मारुती आठवला, वासोट्यावर पण असाच एक मारुती आहे. वरचा फोटो कुठला आहे ते माहिती नाही. पैजारबुवा,

३-४ दिवस झाले फोटो टाकून पण उत्तर आले नाही म्हणून मीच सांगते. @प्रचेतस . निश्चितच हा फोटो महाराष्ट्रातील नाही. @ ज्ञानोबाचे पैजार . तिकोना आणि वासोटा दोन्ही ठिकाणे पाहिलेली नाहीत. फोटोतील ठिकाण ओळखणे विशेष कठीण नव्हते. आपल्यापैकी बरेच जण येथे जाऊन आलेले असतील. मध्यप्रदेश व सातपुड्यातील हिल स्टेशन 'पंचमढी' येथील हा फोटो. येथील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ 'गुप्त महादेव'. भस्मासुराच्या भीतीने शंकर या गुंफेत लपले होते म्हणून हा गुप्त महादेव. साधारण ४० फुटाचा अतिशय चिंचोळा मार्ग असल्याने गुंफेत एका वेळी मोजकेच लोक जाऊ शकतात. याच गुंफेच्या बाहेर हा मारुती आहे. याची स्थापना कधी झाली वगैरे माहिती मला मिळू शकली नाही .