कणेकरसाहेब.... तुमनेच हमको बिघडव्या !
वो क्या है.... हमारे लहानपणी... जर वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका... वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका. ऐसा. लेकिन... मगर (येस्स्स्स.. दोन्हीही).. उन दिवसोंमें पुस्तकोंमे जरा वरण भात जैसा लिखाण होता था.
वो क्या है.... हमारे लहानपणी... जर वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका... वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका. ऐसा. लेकिन... मगर (येस्स्स्स.. दोन्हीही).. उन दिवसोंमें पुस्तकोंमे जरा वरण भात जैसा लिखाण होता था.
काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या!
काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या!
वेंकटने तीन हजार रियाल खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनवर पाहिले. सिगरेट क्रश केली. उठला. पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला, असं उद्या बॉसला दमात घेऊन सांगायचं, असा विचार करून तो पार्किंगकडे वळला.
सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम आता मिपाला नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मिपाकरांनीही गेल्या वर्षी भरभरून साथ दिली. समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.
प्रिय मायमराठी,
तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी.
तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात.
यापूर्वी २२ जून २०१४ रोजी मी प्रथमच मिपा कट्ट्याला उपस्थित राहिलो. त्या कट्ट्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत.
त्या कट्ट्याचा धागा अन वृत्तांत.
पुन्हा एकदा तसाच धमाल कट्टा अनुभवण्यासाठी नव्या कट्ट्याचा बेत आखला आहे.
भेटीचे स्थळ: शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरचे प्रांगण
तारीख व वेळ: शनिवार २७ जानेवारी, दुपारी ४ वाजता
अधिकाधिक मिपाकरांनी, मिपावाचकांनी या कट्ट्याला आवर्जून यावे ही विनंती.
प्रिय राहुल,
४५ व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! वन ब्रिक अॅट अ टाईम मध्ये तुझ्या कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता... आज जरा पुढे जाऊन मन मोकळं करावं म्हणतो.
दिनांक २४रोजी माझ्या धाकट्या भावाचे वय वर्ष २१ दुःखद निधन झाले. माझ्या प्रिय बाळाच्या आत्म्याला शांती लाभावी ह्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी हि विनंती . फार फार गुणी आहे आमच लेकरु त्याला शांती लाभावी ह्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या प्रार्थनेची त्याला गरज आहे.
(ताल = सरोवर)
प्रिय कमलताल,
मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते.
कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ.
'सिद्धार्थ' आणि शशी कपूर
(आपला आवडता अभिनेता दिवंगत झाला कि च त्याच्या आठवणीत काही लिहावे हे वाईट आहे! पण तसं होतंय खरं. )
मला त्याचा आवडून गेलेला चित्रपट म्हणजे 'सिद्धार्थ'.
नोबेल परितोषिक विजेत्या Hermann Hesse या जर्मन लेखकाच्या 'Siddhartha' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा Conrad Rooks ने निर्माण केला.
तरुण सिद्धार्थ आत्मशोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो.... आणि मग त्याला येत गेलेले अनुभव, आणि शेवटी त्याला उमगलेले सत्य, असा सगळा प्रवास या चित्रपटात टिपला आहे.