Skip to main content

[लाज] - श श वि

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 12/02/2019 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात विज्जुभाउंची ही कथा दिवसभर मंत्रालया बाहेर बंदोबस्तासाठी उभे राहून वैतागलेला राणे हवालदाराचा घरी जाताना थोडीशी टाकून जाणे हा दिनक्रम होता. आजची रात्र काही वेगळीच होती. बेस्टच्या बसने सोडलेला धुर रस्त्यावर पसरला होता. त्यातून नाकासमोर हात हलवता चालताना राणेसाहेब ओसांडून वहाणाऱ्या कचराकुंडीपाशी जरासे रेंगाळले. कुंडीच्या मागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राणेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ". कुंडीमागे कोणीतरी होते. त्यांनी काठीने जरासे ढोसले आणि दचकून जोरात “हाड” असे ओरडले. एक कुत्रे अचानक कुंडी मागून झपकन बाहेर आले. शेपूट पायात ओढत तिकडून पळाले. आजूबाजूच्या हसणाऱ्या लोकांकडे काहीच झाले नाही अशा आविर्भावात पहात राणेसाहेब तेथून दूर गेले. त्यांना आपल्या वर्दीची लाज घालवायची नव्हती. पैजारबुवा,

वाचने 8425
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

=))

In reply to by विजुभाऊ

चाल:- इलू इलू कुंडीSSS कुंडी SSS कुंडी SSS कुंडी SSS ये कुंडी कुंडी क्या है? ये कुंडी कुंडी? जब टेरेस पे हो फुल खिलाना तो उसके लिये चाहिये कुंडी कुंडी कुंडी कुंडी जब घरका ताजा भोपळा हो खाना तो उसकोभी चाहिये कुंडी कुंडी..... कुंडी कुंडी जिसको घर के अंदर पेड हो उगाना तो बाजार से ले आना कुंडी कुंडी.... कुंडी कुंडी कुंडी का मतलब है गमला मिट्टीका गमला करना ना इसमे कोई जुमला पैजारबुवा,

पै बु काका , आम्हा सवंगड्यांमध्ये कुंडीचा अर्थ येगळाच होता . तो अर्थ घेऊनच श श वि वाचली , मस्त जुळतो .

शशवि आवडलं. कुंडीकाव्य पण आवड्या. पैजारबुवांच्या शीघ्रविडंबकवृत्तीस आमचा सलाम. मिपाची ओळख जपण्याला मोलाचा वाटा पैजारबुवा उचलतात हे या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवून खाली बसतो. जयहिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! Sandy