कविता माझी

निशब्द

हरिदास's picture
हरिदास in जे न देखे रवी...
7 Mar 2016 - 1:21 pm

शब्दांनी आज बंड केले
होते नव्हते सर्व नेले
उरावे हाती असे जमवलेच नाही
क्षणभंगुर लालसेने षंड केले

वाटते वाचा पांगुळ झाली
निराशा आशेस वांझ झाली
ओहोटीने भरतीस दिला नकार
नकळे कोणती ही भूल झाली

प्रकाशाने रविसंगे घात केला
वसंताला ग्रिष्माने आघात केला
डोळ्यांनीच काळजाची वाट पुसली
लेखणीचा प्राण का गर्भात गेला

शायराच्या शायरीतून भाव गेला
काटयांनीच गुलाबाशी घाव केला
दिव्यास पतंगाने का बदनाम केले
शब्दांनी भावनांशी लपंडाव केला

कविता माझीकविता

जगण शिकतोय मी आता.......!

एकप्रवासी's picture
एकप्रवासी in जे न देखे रवी...
6 Mar 2016 - 4:48 pm

जगण शिकतोय मी आता जुनी कात टाकून,
अंकुरापरी मातीतून पुन्हा उगवून

काही नवीन तारा जोडून
जगण्याची नवीन धून बनवून,
जुन्याच शब्दांना जराशी
वेगळी चाल देवून, जगण शिकतोय मी आता….

सुखानं सुखाशी थोड गुणून
दुखांना दुखाशी घेतलं भागून,
बाकी काही उरेल ना उरेल
आयुष्याच गणित पाहतोय पुन्हा सोडवून, जगण शिकतोय मी आता….

स्वप्नांना जरा पुन्हा जाग करून
तुटलेल्या वाटां सांकवाना जोडून,
निशब्द नात्यांना हळुवारपणे
पुन्हा पुन्हा हसवून, जगण शिकतोय मी आता….

कविता माझीकविता

५. दुष्काळ झळा ... रानातली वाट..

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
5 Mar 2016 - 4:09 pm

बर्‍याच दिवसानी पुन्हा थोडे कवितेत लिहावे म्हणतोय .. आवडले तर सांगा...

चोचभर दाण्यासाठी
वेशी बाहेर पाखरं
टीचभर पोटासाठी
घर उंबर्याशी वैर ||

पाणी आटलं डोळ्यात
शेत जळलं रानात
पोर धाडलं शरात
गाव दुष्काळ पिडित ||

कविता माझीकविता

सुख

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
4 Mar 2016 - 3:00 pm

हरवलेले ते सापडले
सापडले हरवल्यानंतर
हरवले सापडण्याआधी
     कळाले सापडल्यानंतर!

तेच होते ते जरी
ते न राहिले तसे तरी
हवे होते ते तसेच तेव्हा
     कळाले सापडल्यानंतर!

भाव पुसा बाजाराला
दाम जरी ना लाविला
अनमोल ते आहे खरे
     कळाले सापडल्यानंतर!

शब्दांचा ना लागे ठाव
जरी दोन अक्षरांचा गाव
'सुख' म्हणती सारे त्याला
     कळाले सापडल्यानंतर!

- संदीप चांदणे

कविता माझीमुक्त कविताशांतरसकलाकवितामुक्तकसाहित्यिक

नवोदित कवी

हरिदास's picture
हरिदास in जे न देखे रवी...
4 Mar 2016 - 12:07 pm

नकोत मजला टाळ्या चुटक्या
वाहवाही अन मान बढाई
कोऱ्या पाट्या तुमच्या आमच्या
रसिक आपुली बाप नि आई

कुणी कल्पतो आकाशगंगा
कुणी वर्णीतो प्रीत पतंगा
नाद कुणासी विठू रायाचा
रंगून जातो भलत्या रंगा

अलंकारे सजवी कुणी कविता
कुणाची वाहे दुःख सरिता
भलत्या भलत्या कल्पना स्फुर्ती
शब्द निराळे भाव पेरिता

नवकवी मीही धडपड करतो
फाटके तुटके शेले विणतो
तुमच्या दारी हात जोडुनी
कृपाप्रसादा निशिदिनी झुरतो

कविता माझीकविता

टाकटोकावली

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
3 Mar 2016 - 10:06 am

अगतगडमतर्रर्रमताशा ढोलबडवीभाऊबत्ताशास्वारीमर्जीखाशा
वाटास्त्वर्खिरापती बेल्भंडारासूचक्मौन पोकळवासाभीकडोहाळे
भाळीफुपाटी रेखीजाण्यतेराखीचिल्लरगौण नवनीतीशिंकाळे
सल्लजाकुचंबीतनिसर्गबंधीत चिंताभीषण्कळीकांची
हायखाउदेनिसर्गकुंठा दूरांदाजीकचराकोंडीजलपर्णी
शांत्पहाराखुशीतगाजर नजरर्घड्याळीहितवरकर्णी

निवडणुकीचा ‘संकल्प’

कविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभूछत्रीभयानकहास्यकवितामुक्तकसमाजजीवनमान

एकांत

मीनादि's picture
मीनादि in जे न देखे रवी...
29 Feb 2016 - 5:30 pm

हवा मज एकांत
बेबंध धुंद, आणि शांत

स्व:ताचीच ओळख नव्याने करण्यास,
भूतकाळच्या जखमेवर खपली धरण्यास .

जगापासून अलिप्त होण्यास,
स्वताच्याच कोशात लुप्त होण्यास.

अंतर्मुख झालेल्या मनाला टोचणी घडलेल्या चुकांची,
समजुतीची झालर फाटक्या दु:खाची.

करून टाकावा निचरा कोरड्या मनाने,
पुन्हा नवीन भवितव्यासाठी.

कविता माझीकविता

पाटी

मीनादि's picture
मीनादि in जे न देखे रवी...
27 Feb 2016 - 12:16 pm

असावी एक चुका पुसणारी पाटी
ठरेल ती उ:शाप प्रत्येकासाठी

खदखदणारे दु:ख घडलेल्या चुकांचे
ओघळले डोळ्यातून अश्रू पश्यातापाचे

नकळत घडलेल्या चुका करतात आपुलाच घात
मानाने मनावर केलेली खोटी मात

वेळ निघून गेल्यावर सार काही कळत
पण उपयोग नसतो त्याचा हेच दु:ख छळत

खाडाखोड होत नाही घडलेल्या भूतकाळाची
पण जगन तर सुटत नाही ओढ असते भविष्याची

पुसाव्यात ह्या चुका आणि स्वच्छ करावी पाटी
कारण चुकतो तो माणूस हेच कारण जगण्यासाठी.

कविता माझीकविता

बालपण

मीनादि's picture
मीनादि in जे न देखे रवी...
26 Feb 2016 - 12:25 pm

रम्य ते बालपण , रम्य ते सोहळे
रम्य तो काळ अन दिवस ते कोवळे

नवी भरारी नव आकाश
अज्ञानाचे डोह अन मोहाचे पाश

सावरावे किती अन कसे जीवाला,
लागते ओढ ही किती मनाला.

वास्तवाची झळ नसे पुसटशी.
इवलाश्या त्या बालमनाला

अखंड असावे हे दिवस निरंतर,
प्रत्येकाच्या नशिबाला

कविता माझीकविता