Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुधीर काळे on Tue, 09/08/2009 - 21:55
  • Log in or register to post comments
  • 13125 views

प्रतिक्रिया

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Mon, 09/14/2009 - 22:11

Permalink

अभिनंदन!!

अभिनंदन!! मला मुळातच उद्योजकांबद्दल अन त्यातही मराठी उद्योजकांबद्दल प्रचंड आदर आहे. तुमचा हा कारखाना प्रत्यक्ष बघता येईल का? एक तांत्रिक प्रश्नः तुम्ही ३१६ एल हा मिश्र धातूसुद्धा बनविता का? (त्या ग्रेडचे स्टील सर्जरीत वापरले जाते म्हणून तोच थोडासा ठाऊक आहे)
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 09/14/2009 - 22:27

In reply to अभिनंदन!! by डॉ.प्रसाद दाढे

Permalink

मी मालक नाही!

मी या कारखान्याचा मालक वगैरे नसून तिथला एक डायरेक्टर आहे. तांत्रिक शाखेचा प्रमुख. ३१६-एल हे पोलाद मी मुकुंदमध्ये असताना बनविले आहे. ते मॉलिब्डेनमयुक्त स्टेनलेस स्टील आहे. एल म्हणजे एक्स्ट्रा-लो-कार्बन असलेले. हे पोलाद बनविणे सोपे नाही! ३०४-एल पण असते. त्यातही एलचा तोच अर्थ आहे. आमचा कारखाना जकार्ताला आहे. आपण जकार्तास्थित असाल तर जरूर या. आपले स्वागत आहे. धन्यवाद सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Tue, 09/15/2009 - 09:43

In reply to मी मालक नाही! by सुधीर काळे

Permalink

मी सध्या

मी सध्या इथेच ( मुकंद मध्ये )पडीक असतो. आणि ३१६ एल ला कोणी ग्राहक आहे का हे शोधत आहे. अधिक माहिती साठी संप्रर्क करु शकता अमोल मुकंद - एक्स्पोर्ट डिपार्टमेंड- कळवा -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Tue, 09/15/2009 - 09:44

In reply to मी मालक नाही! by सुधीर काळे

Permalink

मी सध्या

मी सध्या इथेच ( मुकंद मध्ये )पडीक असतो. आणि ३१६ एल ला कोणी ग्राहक आहे का हे शोधत आहे. अधिक माहिती साठी संप्रर्क करु शकता अमोल मुकंद - एक्स्पोर्ट डिपार्टमेंड- कळवा -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 09/15/2009 - 11:27

In reply to मी सध्या by अमोल केळकर

Permalink

अमोल!

प्रिय अमोल! WOW!! तू मुकुंदमध्ये 'पडीक' आहेस हे आताच लक्षात आले. किती वर्षे मुकुंदमध्ये पडीक आहेस? आधी कुठे होतास? आज-काल किती टन स्टेनलेस तिथे दरमहा बनते? (अरे-तुरे केल्याबद्दल रागावणार नाहीस अशी आशा आहे! 'मुकुंद'मधला म्हणून जरा जास्तच आपुलकी!!) खरंच! अगदी 'माहेरचं माणूस' भेटल्यावर स्त्रियांना कसं वाटत असेल त्याची कल्पना आली. मी मुकुंद कंपनीला साक्षात माझी आईच समजतो! इतके त्या कंपनीचे माझ्यावर उपकार आहेत. आम्ही तिला जरूर उर्जितावस्थेस आणले, पण जन्मदात्री ती जन्मदात्री! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 09/15/2009 - 11:33

In reply to मी सध्या by अमोल केळकर

Permalink

अमोल!

------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Tue, 09/15/2009 - 11:38

In reply to अमोल! by सुधीर काळे

Permalink

व्य. नी.

व्य. नी. पाठवला आहे -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by सोहम_व on Tue, 09/15/2009 - 14:00

Permalink

स्टिल क्षेत्राबद्द्ल आणखिन वाचायला आवडेल

प्रथम आपल्या प्रोफेशनल वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! सुन्दर लेख फोटोमुळे सर्वाना समजण्यास सोपे झाले. थोडे स्टिल क्षेत्राबद्द्ल वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on Tue, 09/15/2009 - 16:00

Permalink

कारकीर्दीचे वर्धापन साजरे करण्याची पद्धत अभिनव आणि स्तुत्य आहे!

सुधीर काळे साहेब, आपल्या ४५ वर्षांच्या दैदिप्यमान व्यावसायिक कारकीर्दीखातर आपले हार्दिक अभिनंदन. मराठी माणसांना दुष्प्राप्य तांत्रिक माहिती सोप्या भाषेत (प्रकाशचित्रांच्या) सांगून कारकीर्दीचे वर्धापन साजरे करण्याची आपली पद्धतही अभिनव आणि स्तुत्य आहे. अशा तांत्रिक माहित्यांचा खुला प्रसार आपल्या मराठी लोकांच्या सामान्यज्ञानात मोलाची भर घालेल यात तिळमात्रही संशय नाही. आपल्या व्यावसायिक अनुभवाचे भांडार आता इथे मायबोलीत, खुले करावेत अशी नम्र विनंती!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 09/15/2009 - 20:24

In reply to कारकीर्दीचे वर्धापन साजरे करण्याची पद्धत अभिनव आणि स्तुत्य आहे! by नरेंद्र गोळे

Permalink

असा मनसुबा नव्हता

खरं सांगायचं तर तो दिवस माझा व्यावसायिक वाढदिवस आहे हे तो लेख अपलोड करेपर्यंत माझ्या लक्षात नव्हते व तो अपलोड करतानाच माझ्या लक्षात आले. ७ सप्टेंबरला मी''भंगार रथ' व आणखी एक फोटो अपलोड केले होते. त्यावेळी सर्वांकडून मला याबद्दल जास्त विस्तारपूर्वक लिहायची विनंती येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण सभासदांनी जरा आग्रह केला म्हणून मी दुसर्‍या दिवशी फोटो काढणे, ते योग्य क्रमाने मांडणे, त्याखालची कॉमेंट्री लिहिणे या गोष्टी केल्या व ते सर्व करता-करता माझ्या लक्षात आलं की तो माझा व्यावसायिक वाढदिवस आहे. लक्षात आलं म्हणून आणि केवळ गंमत म्हणून मी त्या गोष्टीचा उल्लेख केला एवढेच. व्हीडियो चित्रण वगैरे नंतर केले ते लवकरच पहायला मिळेल. तेही आपणा सर्वांना आवडेल अशी आशा आहे! तरी यात प्री-प्लॅनिंग वगैरे कांहीं नव्हते, होता तो केवळ योगायोग! पण बर्‍याच लोकांना लेख आवडला असावा. त्यामुळे मला खूप आनंद वाटतो. यानंतर रोलिंग मिलचा एक असाच परिचय मी करून देणार आहे. ती प्रोसेस व्हीडियोत पहाण्याने जास्त समजेल. कारण रोलिंग मिलमध्ये गोष्टी खूप वेगाने घडतात व पहायला जास्त मजा येते. तरी आगामी तारखेकडे लक्ष ठेवा! (अगदी "येणार-येणार लौकरच रुपेरी पडद्यावर"च्या थाटात!) सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 09/15/2009 - 20:35

In reply to कारकीर्दीचे वर्धापन साजरे करण्याची पद्धत अभिनव आणि स्तुत्य आहे! by नरेंद्र गोळे

Permalink

कारकीर्द "दैदिप्यमान" वगैरे काही नाही, ४५ वर्षे पाट्या टाकल्या!

गोळेसाहेब, माझी कारकीर्द "दैदिप्यमान" वगैरे काही नाही, ४५ वर्षें ‍(वेगवेगळ्या पायर्‍यांवर उभे राहून) अक्षरशः पाट्या टाकल्या इतकेच! पण वाचन, लेखन, गायन, वादन वगैरेसारखी कलाक्षेत्रातली मुसाफिरी करत, वेळात वेळ काढून अनेक छंद जोपासत मी इमाने-इतबारे पाट्या टाकल्या हे मात्र नक्की. देवाच्या कृपेने थोडेफार व्यावसायिक यशही मिळाले. आज मागे वळून पहाताना समाधान वाटते हेही खरे. यात सगळे आले. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com