✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"दूरून साजरे" असे पोलाद कारखाने

स
सुधीर काळे यांनी
Tue, 09/08/2009 - 21:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13125 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

मी कांहीं व्हीडियो चित्रणही केले आहे

सुधीर काळे
Tue, 09/08/2009 - 22:02 नवीन
मी कांहीं व्हीडियो चित्रणही केले आहे (एम्पी४) पण ते कसे "चढवायचे" ते माहीत नसल्यामुळे वापरले नाहीं. हा माझा उपक्रम सर्वांना आवडेल अशी आशा आहे. खास गोष्ट अशी कीं आजच मी माझ्या व्यावसायिक आयुष्याची ४५ वर्षे पूर्ण केली! एक तर्‍हेने हा माझा "प्रोफेशनल वाढदिवस"च!! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

तुम्ही यु

संतोष सतवे
Fri, 09/11/2009 - 22:54 नवीन
तुम्ही यु ट्युब या वेबसाइटवर व्हीडीओ अपलोड करु शकता. चांगला उपक्रम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

फार

लिखाळ
Tue, 09/08/2009 - 22:09 नवीन
फार छान..एकदम आवडले. दुसर्‍या चित्रात उजवीकडे माणूस दिसल्यावर एकंदर प्र्करणाचे आकारमान लक्षात आले. भारीच आहे सगळे :) पुढे वाचण्यास उत्सुक. -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
  • Log in or register to post comments

वा!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 09/08/2009 - 22:11 नवीन
काळेसाहेब, चांगला उपक्रम. काही अशाच प्रकारच्या कारखान्यांमधून बघितलेले आठवले. या फर्नेसमधे काही लीकेज आहे का हे बघायला काही थर्मल इमेजिंग असते असे काहीसे आठवते आहे. बरोबर का? त्याचे फोटो बघितल्याचे आठवते आहे. बरोबर असले तर ते फोटो बघायला आवडेल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

थर्मल

सुधीर काळे
Tue, 09/08/2009 - 22:20 नवीन
थर्मल इमेजिंग अनेक उपयोग आहेत. साधारणपणे पोलाद कारखान्यांत भट्टीच्या, डाबूच्या विटांचे उरलेले आयुष्य "वसूल" करण्यासाठी ते वापरतात. तसेच एकादे विजेचे कनेक्शन ढिले झाले असल्यासही ते दुरून तपासण्यासाठीही वापरतात. १५०,००० व्होल्ट, ३३,००० व्होल्ट, ११,००० व्होल्ट, ३,३०० व्होल्ट अशा उच्च व्होल्टेजसाठी ते खूप उपयोगी आहे. पण ते उपकरण खूपच महाग आहे. म्हणून आम्ही इथल्या PLN कडून हे उपकरण भाड्याने घेऊन आमचे काम करून घेतो. (PLN in Indonesia = MSEB in Maharashtra) मेकॅनिकल बिघाड predict करण्यासाठीही हे उपकरण खूप उपयुक्त आहे. पण महाग असल्यामुळे बहुदा कुणाहीकडे नसते. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

"कार्टून" पाहिल्यासारखीच ही "चित्तरकथा" (वाचण्याऐवजी) पहावी

सुधीर काळे
Tue, 09/08/2009 - 22:31 नवीन
स्टीलमेकिंगची "साठाउत्तरीची कहाणी पाचाउत्तरी" संपविली आहे. सर्व थरातील लोकांना समजावी म्हणून चित्रकथेच्या स्वरूपात पेश केली आहे. "कार्टून" पाहिल्यासारखीच ही "चित्तरकथा" (वाचण्याऐवजी) पहावी असे मी सुचवेन! प्रश्नांचे स्वागत आहे. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

छान सहल घडली

धनंजय
Tue, 09/08/2009 - 22:35 नवीन
धन्यवाद, काळेसाहेब.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

निमीत्त मात्र
Tue, 09/08/2009 - 23:10 नवीन
मस्त सफर घडवलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

छान सहल !!!

sujay
Tue, 09/08/2009 - 22:57 नवीन
काका छान माहीती आणि फोटो. येउ द्या अजुन. खास गोष्ट अशी कीं आजच मी माझ्या व्यावसायिक आयुष्याची ४५ वर्षे पूर्ण केली! एक तर्‍हेने हा माझा "प्रोफेशनल वाढदिवस"च!! <:P <:P <:P ईथे अमेरीकेत ६५-७० वर्षच्या वयस्कर लोकाना धडाडीने काम करताना बघुन भारावून जायचो, पण आपल्यातही असे तरूण आहेत हे वाचुन लई भारी वाटल !! तुमच्या पुढच्या वाटचाली करता शुभेच्छा !! ह्या ४५ वर्षाच्या प्रवासा बद्दल वाचण्यास देखिल उत्सुक आहे. सुजय
  • Log in or register to post comments

+१

बाळ्कोबा
गुरुवार, 09/10/2009 - 13:24 नवीन
वाटचाल वाटचाल वाटचाल......!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sujay

माहीतीबद्

रेवती
Tue, 09/08/2009 - 23:13 नवीन
माहीतीबद्दल धन्यवाद! फोटोंमुळे एकंदर प्लांटच्या अवाढव्यपणाचा अंदाज येतो. मला सगळे समजले असे म्हणता येणार नाही पण काहीच कल्पना नव्हती त्या मानाने आता हा प्रकार काय असतो त्याची झलक मिळाली. रेवती
  • Log in or register to post comments

सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचे प्रयोजन आहे

सुधीर काळे
Tue, 09/08/2009 - 23:19 नवीन
कांहीं इंटरेस्ट असल्यास जरूर विचार! सर्व प्रश्नांचे शक्यतो सोप्या शब्दात (layman's language मध्ये) उत्तर देण्याचे प्रयोजन आहे. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

छानच माहिती आहे!

चतुरंग
Tue, 09/08/2009 - 23:20 नवीन
कित्येक वर्षांपूर्वी दूर्गापूर स्टील प्लँटला दिलेली भेट आठवली. सगळ्यात सुरुवातीला थेट मालगाडीच प्लँटमधे नेली जाऊन कित्येक टन कोळसा फर्नेससाठी जाळायला पाठवलेला आठवतोय. कित्येक फूट उभे असे फर्नेस असलेले आठवताहेत. सगळ्यात शेवटच्या स्टेजला चपट्या पट्ट्यांच्या स्वरुपात स्टिलचा पत्रा यंत्रातून बाहेर येत होता आणी त्याची गोल गुंडाळी बनत होती ते आठवते आहे.आता तंत्रज्ञानात अमूलाग्र बदल झालेला असणार आहे. सुधीरराव अजूनही असेच सचित्र लेखन येऊदे. 'भंगाररथ' हा शब्द फारच आवडला! ;) (रथारूढ)चतुरंग
  • Log in or register to post comments

काळेसाहेब

नितिन थत्ते
Wed, 09/09/2009 - 20:43 नवीन
काळेसाहेबांची प्लॅण्ट बहुतेक स्क्रॅपपासून स्टील बनवते. त्यामुळे तेथे कोळसा लागत नाही. दुर्गापूर, टिस्को-जमशेदपूर वगैरे मध्ये तसेच आर्सेलर्-मित्तलच्या काही प्लॅण्टमध्ये लोहखनिजापासून स्टील बनवले जाते तेथे लोहखनिजाच्या क्षपणासाठी (Reduction) कोक वापरतात त्यासाठी कोळसा लागतो. (अशा प्लॅण्टना इण्टिग्रेटेड स्टील प्लॅण्ट म्हणतात) नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

थत्तेसाहेब, एकदम बरोबर!

सुधीर काळे
Fri, 09/11/2009 - 07:33 नवीन
थत्तेसाहेब, एकदम बरोबर! पण कोळसा म्हणजे कोल (coal) नव्हे तर 'मेटॅलर्गिकल कोक' (Metallurgical cocke) लागतो. साधारणपणे एक टन लोखंडाला (पोलाद नव्हे) ५००-६०० किलो. पण आज अनेक नव्या सुधारणा झालेल्या आहेत उदा: ब्लास्ट ऑक्सिजन एनरिचमेंट, पल्व्हराइज्ड कोल इंजेक्शन (Blast Oxygen Enrichment, pulvarised coal injection)वगैर. लोखंडापासून पोलाद बनविण्यासाठी आज BOF (बेसिक ऑक्सिजन फर्नेस) वापरतात. (यालाच LD Converter असेही नाव आहे) सुधीर ----------------------- छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सही फोटो

पाषाणभेद
Wed, 09/09/2009 - 03:03 नवीन
सही फोटो आलेले आहेत. माहितीही आम्हासारख्या अडाणींसाठी उपयूक्त. आपण या पोलाद कारखान्याला "दूरून साजरे" का म्हणतात? वाढदिवसाच्या शुभेच्छा! (फक्त काळेप्रणाली दिसत नाही कोठे. :-)) ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

दूरून साजरे का?

सुधीर काळे
Wed, 09/09/2009 - 11:55 नवीन
पोलादाच्या कारखान्यातील धूळ, गरमी व कानठळ्या बसविणार्‍या "विजांच्या (अक्षरश:) कडकडाट"चा सतत आवज (आर्किंग नॉईज ज्यासाठी कानांना प्रोटेक्टिव्ह साधने-कर्णरक्षके-वावरावी लागतात ) यामुळे तसे हे काम जरा "भारी"च असते व फक्त दूरूनच भव्य दिसते म्हणून मी तसे म्हणालो. ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

छान

चित्रा
Wed, 09/09/2009 - 04:19 नवीन
चित्रमय लेख. "तिखट मीठ" आवडले.
  • Log in or register to post comments

सुरेख

एकलव्य
Wed, 09/09/2009 - 08:10 नवीन
सुरेख दर्शन! धन्यवाद!! एक प्रश्न : आपला उद्योग डिमांड पुल वर अवलंबून की सप्लाय पुशवर? सहज कुतुहल इतकेच...
  • Log in or register to post comments

इमारती बांधण्याच्या उद्योगाच्या मागणीवर अवलंबून

सुधीर काळे
Wed, 09/09/2009 - 10:50 नवीन
साधारणपणे आमचा उद्योग इमारती बांधण्याच्या उद्योगाच्या मागणीवर फार अवलंबून असतो. सप्लाय पुश विषेष उपयुक्त नसते कारण त्याने फक्त भाव खाली "पाडण्या"चे सत्कार्य होते. पण डेस्परेट परिस्थितीत काही कंपन्या ते करतात. मग कट-थ्रोट परिस्थिती निर्माण होते. ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य

धन्यवाद!

एकलव्य
गुरुवार, 09/10/2009 - 11:46 नवीन
उत्तराबद्दल धन्यवाद... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

चांगली माहिती

क्रान्ति
Wed, 09/09/2009 - 08:49 नवीन
फोटो पाहून या व्यवसायाच्या भव्यतेचा थोडासा अंदाज आला. खास गोष्ट अशी कीं आजच मी माझ्या व्यावसायिक आयुष्याची ४५ वर्षे पूर्ण केली! एक तर्‍हेने हा माझा "प्रोफेशनल वाढदिवस"च!! हार्दिक अभिनंदन! :) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सहज
Wed, 09/09/2009 - 08:53 नवीन
सुरेख चित्रकथा! व आपल्या प्रोफेशनल वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! "एस एम एस" डिपार्टमेंटचा विजय असो! अजुन येउ दे.
  • Log in or register to post comments

छान सफर

ऋषिकेश
Wed, 09/09/2009 - 10:09 नवीन
छान सफर आता, चित्रे तर बघितली, आता या क्षेत्रातील ४५ वर्षांच्या विविध अनुभवांवर -अर्थकारणावरहि वाचायला आवडेल लेखातील लोड सेल वगैरे ट्रांसड्युसर्सची नावं वाचून थोडा नॉस्टॅल्जिक झालो :) एकूणच गोष्टींचे आकारमान बघता तुम्ही पिझोएलेक्ट्रीक लोड सेल्स वापरत असाल असं (उगाच) वाटलं ऋषिकेश ------------------ कारखान्यातील गोंगाटात-स्फोटांच्या/मशींन्सच्या आवाजात रेडीयोचा आवाज ऐकू येत नाहि
  • Log in or register to post comments

अवांतर

अमोल केळकर
Wed, 09/09/2009 - 11:54 नवीन
अवांतर प्रतिसाद, वा ! ऋषिकेश साहेब. आपल्या समयोचित रेडिओ प्रतिक्रिया आवडतात. आपल्या प्रतिसादातील सर्व गाण्यांची ( वेळेसकट ) नोंद ठेवली आहे. कारखान्यातील गोंगाटात आम्ही कानात वायरी घालून गाणी ऐकतो. तेव्हा वाजवाच रेडिओ. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

चित्रसफर

स्वाती दिनेश
Wed, 09/09/2009 - 12:34 नवीन
छान सफर आता, चित्रे तर बघितली, आता या क्षेत्रातील ४५ वर्षांच्या विविध अनुभवांवर -अर्थकारणावरहि वाचायला आवडेल. ऋषिकेशसारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

पोलादी वर्णन...

प्रभाकर पेठकर
Wed, 09/09/2009 - 11:46 नवीन
आपल्या व्यवसायाचे पोलादी, सचित्र-वर्णन कुतुहूलजनक आहे. वाचताना विषयातील रस वाढत गेला आणि छायाचित्रांमधून अंगावर येणारी (यंत्रसामुग्रीची) भव्यता मन दडपवून टाकणारी आहे. ह्या विषयाची बहुअंगी माहिती आपल्या पुढील लेखनातुन मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद आणि अभिनंदन. व्यावसायिक वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments

काळे

अमोल केळकर
Wed, 09/09/2009 - 12:04 नवीन
काळे साहेब, इथे कुठल्या प्रकारचे स्टील बनवले जात ? ( कार्बन, अलॉय, स्टेनलेस स्टील ). फायनल प्रॉडक्ट काय अहे ? वायर रॉड , ब्राईट बार का कॉईल . गॅल्व्हनाइजड प्रॉडक्ट बनतात का ? अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

री-बार

सुधीर काळे
Wed, 09/09/2009 - 13:18 नवीन
ज्याला "रीइन्फोर्समेंट बार" उर्फ री-बार"('शिमिट'मध्ये घालायच्या सळ्या) म्हणतात ते आम्ही बनवतो. जकार्तातल्या प्रत्येक गगनचुंबी इमारतीत आमचं पोलादच घेतलं जातं. याचं कारण आमच्या पोलादाची प्रत (quality) व डिलिव्हरीची हमी. खरंच आमचं उत्तम प्रतीचं पोलाद आमच्या रोलिंग मिलच्या मर्यादित कुवतीमुळे या कमी किमतीच्या उत्पादनात खितपत पडलंय्. नाही तर हेच पोलाद वापरून कितीतरी जास्त किमती उत्पादनं बाजारात आणता येतील. खरं तर सध्या मी या रोलिंग मिलच्या मर्यादाच घालवायचे काम करीत आहे. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

साक्षात

JAGOMOHANPYARE
Wed, 09/09/2009 - 12:16 नवीन
साक्षात पोलादी पुरुषाचा वारसा पहायला मिळाला. धन्यवाद... .............. सरदार पटेल तुमच्यावर खुष असतील... :)
  • Log in or register to post comments

सुधीरदादा म्हटलं तर चालेल का?

पारंबीचा भापू
Wed, 09/09/2009 - 13:08 नवीन
दादा, एकदम जालिम लेख लिहिला तुम्ही! पोलादातले रो-का-ठो न कळणार्‍या मलाही खूप आवडला व या क्षेत्राबद्दल एक नवी जिज्ञासा निर्माण झाली! आंदे और ऐसेच लेख! भापू
  • Log in or register to post comments

अजुन एक

सहज
Wed, 09/09/2009 - 13:15 नवीन
>या क्षेत्राबद्दल एक नवी जिज्ञासा निर्माण झाली! आयटी पेक्षा भारी पगार मिळतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारंबीचा भापू

:)

नंदन
Wed, 09/09/2009 - 13:17 नवीन
शिवाय पोलादाच्या सान्निध्यात असल्याने हळवेपणा इ. जाणवणार नाही हा फायदाही आहेच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

नवा सिद्धांत

सुधीर काळे
Sun, 09/13/2009 - 14:04 नवीन
नंदनसाहेब, <<शिवाय पोलादाच्या सान्निध्यात असल्याने हळवेपणा इ. जाणवणार नाही हा फायदाही आहेच. नंदन>> पण पोलादाच्या सांनिद्ध्याने मेंदू गंजतो असा सोयिस्कर आणि गोड गैरसमज "स्वगौरवित विद्वान" लोकात प्रसृत आहे! खरं तर पोलाद जवळ असेल तर त्याची affinity for oxygen organic अवयवांपेक्षा जास्त असल्याने मेंदू गंजण्यापासून सुरक्षित रहातो. तरी हळवेपणापासून आणि मेंदू गंजण्यापासून सुरक्षितता असे दोन फायदे या धंद्यात काम करणार्‍याना होतात. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

छा ! काही

अमोल केळकर
Wed, 09/09/2009 - 13:39 नवीन
छा ! काही तरीच तुमचे ( स्टील कंपनीत खितपत पडलेला ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

दुर्दैवाने हे खरे नाही

सुधीर काळे
Fri, 09/11/2009 - 07:45 नवीन
दुर्दैवाने हे खरे नाही. पण हल्ली भारतात पोलादनिर्मितीत वाढ करण्याची लाट आली आहे त्यामुळे जरा बरे दिवस आले आहेत. पण छत्तीसगड, ओरिसा वगैरेसारख्या ठिकाणी जावे लागते. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

उत्तम

नंदन
Wed, 09/09/2009 - 13:23 नवीन
लेख. सचित्र माहितीमुळे संग्राह्य झाला आहे. तुम्ही चित्रित केलेले व्हिडिओजही पहायला आवडतील. दहा मिनिटांहून कमी कालावधीचे असल्यास यूट्यूबवर अपलोड करता यावेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

अपलोड करायला टाकलेत सकाळधरनं.....!

सुधीर काळे
Wed, 09/09/2009 - 15:24 नवीन
व्हीडियोचे सात छोटे-छोटे तुकडे आहेत. पण आज नेट फार स्लो आहे. चढले की पाठवतो. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

जरुर. लेख

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/11/2009 - 17:40 नवीन
जरुर. लेख आवडला. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

लेख आवडला

अर्चिस
Wed, 09/09/2009 - 13:48 नवीन
आपल्या ४५ वर्ष्याच्या अनुभवाबद्दल वाचायला आवडेल अर्चिस
  • Log in or register to post comments

आधी रोलिंगचा "धडा" लिहून काढतो

सुधीर काळे
Wed, 09/09/2009 - 20:25 नवीन
काय आणि किती लिहायचे ते कळत नाहीये. जास्त लिहिले तर जास्त होईल म्हणून व कमी लिहिले तर कमी लिहिले म्हणून भ्या वाटतय. चतुरंगजी, बिपिनजींना विचारून ठरवतो. बघू या. त्या आधी रोलिंगचा "धडा" लिहून काढतो. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्चिस

वा, सुधीरभाऊ

तेन्नालीराम
Wed, 09/09/2009 - 20:20 नवीन
वा, सुधीरभाऊ! तुमचा लेख लई आवडला. आमच्यासारख्या उष्ण्प्रवृत्तीच्या लोकांना नाही झेपणार हे काम! अहो, सारखे आपले अंगावर घामोळे! नायसिलवाल्यांची धन करायची!! आता व्हिडिओ शॉटची वाट पहात आहे! ते. रा.
  • Log in or register to post comments

एक गोष्ट कुणाच्या लक्षात आली का?

सुधीर काळे
गुरुवार, 09/10/2009 - 21:57 नवीन
मी माझ्या पोलाद कारखान्याची बरीच छायाचित्रे इथे 'पेश' केली. कांहीं व्हीडियो क्लिप्सही चढविल्या जात आहेत. त्यात आपल्याला क्वचितच माणूस दिसला असेल. सगळी छायाचित्रे यंत्रांची आहेत. त्यात "द्विपादयंत्र" औषधालाच दिसते. हे खरेच आहे. आज जवळ-जवळ संपूर्ण प्रक्रिया आमचे पर्यवेक्षक (supervisors) व कामगार कंट्रोल रूममधून मॅनिप्युलेटर्सच्या सहाय्याने घडवून आणतात. भट्टीची मरम्मत करणे (fettling), इलेक्ट्रोड जोडणे, सँपल काढणे, तपमान मोजण्याची लान्स (lance) पोलादरसात घुसवणे, कास्टिंगची सुरुवात करणे, डाबू व टंडिश बनविणे (विटा लावणे) अशी मोजकीच कामे जवळ जाऊन करावी लागतात. (पण जर का काही बिनसलं तर 'मातोश्रीं'ची आठवण येते व घामेघूम व्हायला होते) आजची ही परिस्थिती पोलाद बनविणारे धातुशास्त्रज्ञ व ऑटोमेशन इंजिनियर्स यांच्यामधील निकटच्या सहकार्याचे प्रतीक आहे. म्हणूनच दरवर्षी पाच लाख टन बनविण्याची क्षमता असलेल्या आमच्या कारखान्यात मेल्टिंग, रोलिंग, मेंटेनन्स, क्वलिटी कंट्रोल व "सफेत कॉलरवाले" (खरेदी, विक्री, इन्स्पेक्शन, गुदाम, पर्सोनेल, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, सिक्यूरिटी) असे सगळे धरून फक्त ६०० लोक कामाला आहेत.) सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

एकंदर आमच्या आवाक्याबाहेरचं प्रकरण

संदीप चित्रे
Fri, 09/11/2009 - 00:34 नवीन
फोटोंमधे मशीन्सची भव्यता बघूनही दडपायला होतंय सुधीरकाका. प्रोफेशनल आयुष्याची ४५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन (जन्मापासूनच्या आयुष्याची ४० वर्षेही अजून पूर्ण न केलेला) संदीप
  • Log in or register to post comments

दुरून

नितिन थत्ते
Fri, 09/11/2009 - 08:43 नवीन
दुरून साजरे म्हणण्याचा काळे साहेबांचा उद्देश असा की हा फार धोकादायक प्रकार आहे. (पूर्वी एका छोट्या खाजगी स्टील कंपनीत प्रॉजेक्ट केले होते. तेथे काळेसाहेब म्हणतात तसे ऑटोमेशन वगैरे काही नव्हते. स्टीलच्या रसाने ओतप्रोत भरून हिंदकळणार्‍या इकडून तिकडे क्रेनने नेल्या जाणार्‍या लॅडलच्या- पातेल्याच्या आसपास माणसे वावरत असल्याचे आणि त्या हिंदकळणार्‍या लॅडलमधून थोडाथोडा रस सांडत असल्याचे चित्र डोळ्यासमोर आणून पहावे. मला आठवून अजून काटा येतो.) नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

अगदी लहन १० टनी भट्टीला नसेल.....

सुधीर काळे
Fri, 09/11/2009 - 17:29 नवीन
थत्ते-जी, माझ्या आजवरच्या व्यवहारिक आयुष्यात एकूण २ जीवघेणे अपघात झाले आहेत पण ते अपघात कुठेही झाले असते! (म्हणजे त्याचा आणि पोलाद कारखान्याचा संबंध नव्हता). जे लोक पोलाद कारखान्यात काम करतात त्यांना केंव्हा व कुठे पळायचे हे माहीत असते. त्यामुळे बारिक-सारिक भाजल्याचे अपघात (चुकून गरम असलेली सळी पकडणे वगैरे) सोडून मोठे अपघात क्वचितच होतात. ३०-४० टनापेक्षा मोठ्या भट्ट्या बर्‍यापैकी स्वयंचलित असतात. त्याहून लहान भट्ट्या आज अपवादात्मकच चालू असतील. अर्थात आय. टी. क्षेत्रापेक्षा नक्कीच जास्त धोका असतो. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

फोटो आणि

स्वाती२
Fri, 09/11/2009 - 23:03 नवीन
फोटो आणि लेख दोन्ही आवडले. माझा नवरा foundry सांभाळतो- sand casting. व्यावसायीक जीवनाची ४५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. तुमचे अनुभव वाचायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सुधीर काळे
Sat, 09/12/2009 - 12:43 नवीन
आपले मिस्टर आमच्यासारख्या व्यवसायात असल्यामुळे त्यांना जास्त अपील झाले असेल. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! आपण कुठे असता? सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

छान लेख

आनंद घारे
Sun, 09/13/2009 - 20:48 नवीन
आणि त्याहून चांगले 'विटी' प्रतिसाद वाचायला मजा आली. मी कॉलेजला असतांना भद्रावतीचा कारखाना पाहिला होता. त्यानंतर लहान सहान रोलिंग मिल्ल्स आणि फाउंडरी पाहिल्या होत्या त्यामुळे समजायला अडचण आली नाही. चाळीस वर्षानंतर मिपावर भेटण्याने खूप आनंद झाला. आपला गाववाला आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सुधीर काळे
Mon, 09/14/2009 - 21:26 नवीन
धन्यवाद. गाववाला (जमखंडीकर) भेटल्याचा खूप आनंद झाला. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा