दोन आठवड्यापूर्वी एका कामासाठी लेकाला शेजारच्या गावाला जावे लागले. ड्रायवर नेहमीप्रमाणे मी. ४०-५० मिनीटांची ड्राइव्ह. वेळ घालवायला काय काडी टाकावी याचा विचार करत होते तेवढ्यात पाठच्या सीटवरून लेक ओरडला.
"तू मला आठवण नाय केली. Now I am in trouble"
"तुझ सेलफोन, आयडी,पाकीट वगैरे तू लक्षात ठेवायचस. आज काय विसरलायस? का फाईलच विसरलास?" माझं सुरू झालं.
"सगळं घेतलय मी."
"मग?"
"जे. टी. ला परवा birthday च text करायच राहीलं. देवा! " लेकाने धावा सुरु केला.
चिरंजिवांच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता आणि स्वारी कॅलेंडर वर खुण करुनही birthday wish करायला विसरली होती.
"त्यात काय आता कर की belated" माझे दोन पैसे.
"येस! अब आयेगा मझा." मी आनंदाने गाणं गुणगुणायला सुरुवात केली.
"आता निदान गाऊ तरी नकोस. मला जरा विचार करु दे" लेकाने विनवले.
पाच एक मिनिटांनी सेलफोन काढून त्याने अंगठे नाचवायला सुरुवात केली. पाच मिनिटांनी परत बीप.
"We are cool" लेकाने सुटकेचा निश्वास टाकला.
मी उडालेच. चक्क भांडण तंटा नाही म्हणजे काहीतरी घोळ होता.
"J.T. is such a good friend," मी पुटका टाकला.
"डोंबलाची good," लेक खवळलाच.
"मी text काय केलं माहितेय? मी सांगितल की सेल ची बॅटरी मेली म्हणून text नाय करता आला. बॅटरी टाकल्याबरोबर लगेच करतोय."
"अरे तुझी मैत्रिण ना ती. मग असं खोट..."
माझं बोलणं तोडत लेक सुरू झाला. "मग काय सांगायच? कामाच्या गडबडीत दिवसभरात वेळ नाही झाला आणि संध्याकाळपर्यंत इतका दमलो होतो की विसरून गेलो? पुढल्या birthday पर्यंत ऐकवल असतं मला. सालं काढली असती माझी."
"काहिही काय. थोडिशी रुसली असती. पण तू नीट सांगितल असतस तर पटलं असतं," माझा उपदेश.
"Mom, you don't know anything about girls"
माझा कानावर विश्वास बसत नव्हता. आता मी देवाचा धावा सुरू केला.
"हॅलो. मी पण मुलगीच आहे."
"No. You are a Mom" लेकाने ऐकवलं.
"तुला माहीत नाय Mom. सी. आर. चिडतो का खेळायला वेळ नाही म्हटलं तर? but these girls. लगेच चिडचिड. मग सांगाव लागतं खोटं "आईने ग्राउंड केलेय "म्हणून. मला काय हौस आलेय खोटं बोलायची? आम्ही मित्र ठेवतो एकमेकांचे birthday लक्षात? पार्टी दिली, नाही दिली ठेवतो हिशोब? पण these girls. आधी birthday लक्षात ठेवणार. मग locker सजवणार. मग आमच्या कडून अपेक्षा. विसरलं की वर्षभर ऐकवणार. ती सी.एस. , मधेच आठ-दहा दिवस बोलणच बंद करते. मी विचारलं "what I did wrong" तर म्हणे "Nothing". पण आदळआपट चालू. मग एक दिवस परत काही झालच नाही अस बोलायला सुरुवात. मी तर आता विचारणच सोडून दिलय. You don't know anything mom." लेकाने समारोप केला.
कसतरी हसू आवरत मी लेकाला कामाच्या ठिकाणी सोडलं. रात्री जेवताना नवर्याला किस्सा सांगितला. जेवण संपवून उठत नवर्याने ऐकवलं, " जागा असेल तर सांगतो त्याला "Welcome to the club".
मिसळपाव
जबरदस्तच
लई भारी!!
In reply to लई भारी!! by ऋषिकेश
+!
In reply to +! by मदनबाण
+२
In reply to +२ by अवलिया
+३
इन्डीड, वेल्कम टु दि क्लब!
In reply to इन्डीड, वेल्कम टु दि क्लब! by चतुरंग
+१
In reply to इन्डीड, वेल्कम टु दि क्लब! by चतुरंग
१+
महान!!!!!
वेल...
In reply to वेल... by श्रावण मोडक
+१
In reply to वेल... by श्रावण मोडक
वेलकम टू द
धमाल
(विषय दिलेला नाही)
आईग्ग! कसली
मस्त
मजेदार
अल्टी !!!!!!! --
हाहाहा... सह
धन्यवाद!
हा हा हा
भन्नाट!
In reply to भन्नाट! by मन
धन्यवाद.
अभिनंदन
खि: खि:
जबराच आहेत
वा!
चिरंजीव सुखी जीवनाचा मंत्र शिकताहेत
भारीच!! मला
"Welcome to the club"
मस्त..
आमच्या