Skip to main content

आई, तुला काही कळत नाही

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 17/08/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यापूर्वी एका कामासाठी लेकाला शेजारच्या गावाला जावे लागले. ड्रायवर नेहमीप्रमाणे मी. ४०-५० मिनीटांची ड्राइव्ह. वेळ घालवायला काय काडी टाकावी याचा विचार करत होते तेवढ्यात पाठच्या सीटवरून लेक ओरडला. "तू मला आठवण नाय केली. Now I am in trouble" "तुझ सेलफोन, आयडी,पाकीट वगैरे तू लक्षात ठेवायचस. आज काय विसरलायस? का फाईलच विसरलास?" माझं सुरू झालं. "सगळं घेतलय मी." "मग?" "जे. टी. ला परवा birthday च text करायच राहीलं. देवा! " लेकाने धावा सुरु केला. चिरंजिवांच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता आणि स्वारी कॅलेंडर वर खुण करुनही birthday wish करायला विसरली होती. "त्यात काय आता कर की belated" माझे दोन पैसे. "येस! अब आयेगा मझा." मी आनंदाने गाणं गुणगुणायला सुरुवात केली. "आता निदान गाऊ तरी नकोस. मला जरा विचार करु दे" लेकाने विनवले. पाच एक मिनिटांनी सेलफोन काढून त्याने अंगठे नाचवायला सुरुवात केली. पाच मिनिटांनी परत बीप. "We are cool" लेकाने सुटकेचा निश्वास टाकला. मी उडालेच. चक्क भांडण तंटा नाही म्हणजे काहीतरी घोळ होता. "J.T. is such a good friend," मी पुटका टाकला. "डोंबलाची good," लेक खवळलाच. "मी text काय केलं माहितेय? मी सांगितल की सेल ची बॅटरी मेली म्हणून text नाय करता आला. बॅटरी टाकल्याबरोबर लगेच करतोय." "अरे तुझी मैत्रिण ना ती. मग असं खोट..." माझं बोलणं तोडत लेक सुरू झाला. "मग काय सांगायच? कामाच्या गडबडीत दिवसभरात वेळ नाही झाला आणि संध्याकाळपर्यंत इतका दमलो होतो की विसरून गेलो? पुढल्या birthday पर्यंत ऐकवल असतं मला. सालं काढली असती माझी." "काहिही काय. थोडिशी रुसली असती. पण तू नीट सांगितल असतस तर पटलं असतं," माझा उपदेश. "Mom, you don't know anything about girls" माझा कानावर विश्वास बसत नव्हता. आता मी देवाचा धावा सुरू केला. "हॅलो. मी पण मुलगीच आहे." "No. You are a Mom" लेकाने ऐकवलं. "तुला माहीत नाय Mom. सी. आर. चिडतो का खेळायला वेळ नाही म्हटलं तर? but these girls. लगेच चिडचिड. मग सांगाव लागतं खोटं "आईने ग्राउंड केलेय "म्हणून. मला काय हौस आलेय खोटं बोलायची? आम्ही मित्र ठेवतो एकमेकांचे birthday लक्षात? पार्टी दिली, नाही दिली ठेवतो हिशोब? पण these girls. आधी birthday लक्षात ठेवणार. मग locker सजवणार. मग आमच्या कडून अपेक्षा. विसरलं की वर्षभर ऐकवणार. ती सी.एस. , मधेच आठ-दहा दिवस बोलणच बंद करते. मी विचारलं "what I did wrong" तर म्हणे "Nothing". पण आदळआपट चालू. मग एक दिवस परत काही झालच नाही अस बोलायला सुरुवात. मी तर आता विचारणच सोडून दिलय. You don't know anything mom." लेकाने समारोप केला. कसतरी हसू आवरत मी लेकाला कामाच्या ठिकाणी सोडलं. रात्री जेवताना नवर्‍याला किस्सा सांगितला. जेवण संपवून उठत नवर्‍याने ऐकवलं, " जागा असेल तर सांगतो त्याला "Welcome to the club".
लेखनविषय:

वाचने 6852
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

=)) जबरदस्तच आहे.... ! Welcome to the club :D कधी कधी वाटतं ह्या लहान मुलांना आपल्यापेक्षा नक्कीच जास्त कळतं की काय =)) * माझंच बालपण दिसत आहे मला... असा भास झाला =)) लहानपणी वाढदिवसाचा खुप क्रेझ होता... त्याची आठवण झाली ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

लई भारी!! =)) =))
जेवण संपवून उठत नवर्‍याने ऐकवलं, " जागा असेल तर सांगतो त्याला "Welcome to the club".
+१ ;) ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ४७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "हम भी अगर बच्चे होते...."

In reply to by मदनबाण

=)) --अवलिया

In reply to by अवलिया

जागा असेल तर सांगतो त्याला "Welcome to the club". =)) =)) सह्ही........... बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

=)) =)) =)) =)) =)) उच्च किस्सा आहे. तुमच्या लेकाला माझा पण निरोप सांगा... "वेलकम टू द क्लब" ;) बिपिन कार्यकर्ते

वेलकम टू द क्लब हे मुलाला आहेच. पण तुमच्यासाठीही काही लिहिलं पाहिजे. इतक्या मोकळेपणानं हे सगळं लिहिल्याबद्दल. हा असा उमदेपणा थोडा विरळा आहे ना!!! तुमचा एक क्लब व्हायला हरकत नाहीये. जरूर करा, आम्हाला कळवा. :)

In reply to by श्रावण मोडक

स्वातीताई, तुम्ही आता क्लब सुरू करा! :-) मस्त लिहिलं आहेत. अदिती

In reply to by श्रावण मोडक

वेलकम टू द क्लब हे मुलाला आहेच. पण तुमच्यासाठीही काही लिहिलं पाहिजे. इतक्या मोकळेपणानं हे सगळं लिहिल्याबद्दल. हा असा उमदेपणा थोडा विरळा आहे ना!!!
:) श्रामोंशी सहमत आहे. लेख आवडला :) -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

लिहिलेय. एव्हढेच म्हणतो Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

मस्त लिहिलय!

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

किस्स झकासच! ....चिरंजीवांचा वयोगट काय आहे? आपलाच, मनोबा

In reply to by मन

धन्यवाद. लेक १४ वर्षाचा आहे. नुकताच हायस्कुलला गेलाय.

अभिनंदन!! छोटयाचे! फार लवकरच जीवनाचे सत्य कळल्या बद्दल!! :) (आम्हाला या सत्याचा आविष्कार खुप उशीरा म्हणजे, लग्न झाल्यावरच झाला) :(

खि: खि: खि:!! मस्त लिहिलेत. :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

=)) जबराच आहेत चिरंजीव. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

भारीच!! मला पण असे बरेच अनुभव आले आहेत :)

"Welcome to the club" आवडले सही आहे

मस्त लिहिलं आहेस, स्वाती

आमच्या चौदा वर्षाच्या मित्राला वेलकम टु द क्लब.... सू हा स...