भाग्यश्री ,वर्षानुवर्षं आपण सगळे एका ठिकाणी स्थिरावल्यावर पोटापाण्यासाठी दुसर्या देशात जावे लागते तेव्हा मनात असं बरंच काही येतं हे अत्यंत सहज आहे.
आपल्या समाजाला स्थलांतराची सवय नव्हती म्हणून मनाची तयारी करायला वेळ मिळालाच नाही.
काही वर्षानी प्रत्येक कुटुंबातला एखादा तरी सदस्य मूळ गाव -शहर सोडून जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांना आपले गाव सोडून राहण्याची मानसीक तयारी करावीच लागेल.
मला असे वाटते की इतर राज्यातून येणार्यांना असेच काहीसे वाटत असेल.
मराठी माणसांना स्थलांतर करून पोट भरण्याची सवय उशीरा लागली.
निवासी आणि अनिवासी वादात मला भाग घ्यायचा नाही पण दुसर्या देशात जाउन रोजीरोटी मिळवणार्यांचे मला कौतुक वाटते हे खरे आहे.
वेस्टर्न सबर्ब मध्ये राहणारी मुलगी सेंट्रल सबर्ब मध्ये राहणार्या मुलाला या एकाच कारणासाठी लग्नाला नकार देते तेव्हा विशेषेकरून अनोळखी देशात कायम वास्तव्य करणार्या मुलींचे -मुलांचे मला फार कौतुक वाटते.
मराठी माणसांना स्थलांतर करून पोट भरण्याची सवय उशीरा लागली
सहमत.स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त औद्योगिकीकरण महाराश्ट्रात झाले हे त्याचे मुख्य कारण.त्यामुळे संधी मुबलक प्रमाणात होत्या.१९९० पर्यंत देशाबाहेर स्थालांतर मर्यादित स्वरुपातच होई.नंतर उदारीकरणानंतर संधी इतर देशात्/राज्यांमध्येही वाढल्या.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
तेव्हा विशेषेकरून अनोळखी देशात कायम वास्तव्य करणार्या मुलींचे -मुलांचे मला फार कौतुक वाटते.
नुस्तेच वास्तव्य नाहितर, तिक्दे नोक्र्या, व्यवसाय करतात, सोपे कहिच नस्ते :-d
चुचु
जेव्हा जेव्हा निवासी अनिवासी वाद होतो तेव्हा तेव्हा मी त्यात हिरिरिने सहभागी होतो. मला सरसकट सगळ्या अनिवासी भारतियांबद्दल राग नाहिये.
पण बरीच लोकं २-३ वर्ष परदेशी राहिली की इथली उणी-दुणी काढायला सुरुवात करता. भारतात हे नाही, ते नाही, भ्रष्टाचार आहे, घाण आहे वगरे बडबड सुरू होते. इथे रहाणार्यांना अक्कल शिकवायला सुरुवात करतात. अरे हे बदलण्यासाठी तुम्ही काही केलं का? (उलट इथे रहातात तेव्हा ह्या सगळ्याला हातभारच लावतात) तुम्ही देशाला एक चान्स तरी दिलात का? शिक्षण संपल्यावर शेपूट घालून गेलात ना पळून परदेशात पैशासाठी? मग देशाच्या प्रगतीला काडीचाही हातभार न लावता नुसतं नावं ठेवणे कितपत बरोबर आहे? माझ्या मते हा शूद्ध कृतग्नपणा आणि हलकटपणा आहे.
२५-२६ वर्ष राहिलात तो देश ३ वर्षात नकोसा कसा होऊ शकतो? आपला देश आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करतो, चांगले विद्यार्थी घडावेत म्हणून कितीतरी शिक्षक तुटपुंज्या पगारावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य कर्तव्य म्हणून करत असतात. असं असताना ह्या सगळ्याच्या जोरावर केवळ स्वत:चा स्वार्थ बघून परदेशी निघून जाणे कितपत योग्य आहे. (देशाला ROI कधी मिळणार?)
आय टी बूम च्या वेळी ह्या स्थलांतराला 'ब्रेन ड्रेन' असं संबोधलं गेलं हे किती योग्य आहे ते आता जाणवतं.
देशाची प्रगती होण्यासाठी काय लागतं? उत्तम तंत्रज्ञ, नव्या नव्या कल्पना प्रत्यक्षात साकारणारे धडाडीचे तरूण, अंगात धमक असलेले शास्त्रज्ञ, कलाकार, डॉक्टर्स, प्रोफेशनल्स. आपला देश हे सगळं काही तयार करतो. पण ते सगळं जातं कुठे? परदेशात. कसा जाणार आपला देश पुढे? हुशार लोकांच्या पिढ्याच्या पिढ्या परदेशी निघून गेल्यावर देश प्रगतीपथावर जाणार कसा? आणि नेणार कोण?
लोकं परदेशी जाऊन पैसा कमावतात म्हणजे काय करतात? तर त्या देशाच्या प्रगतीला अर्थव्यवस्थेला चालना देतात.
तुम्हाला देशाची आठवण येते. तशीच देशालाही तुमची आठवण येते. त्याचाही जीव तीळ तीळ तुटतो. माझी सगळी हुशार मुलं आज शेजार्याची चाकरी करून मलाच नावं ठेवतायत? अडचणीच्या वेळी मला सावरण्याऐवजी मला सोडून जातायत? देशालाही तुमची गरज आहे हे कधी जाणून घेणार आहात तुम्ही?
देशाबद्दल खूप काही वाटणं हे त्याच्या जागी ठीक आहे. पण हे वाटणं जोवर कॄतीत येत नाही तोवर त्याला काहिही अर्थ नाही. माझा देश माझा देश म्हणून गळे काढायचे, आणि वेगवेगळी कारणं देत रहायचं मात्र परदेशात हे कितपत योग्य आहे?
अवांतर: फ्री सीट / स्कॉलरशीप्स घेऊन अथवा सरकारी कॉलेजेस मधे शिकलेल्यांना किमान ५ वर्ष भारतातच नोकरी करायची सक्ती करणारा कायदा करायला हवा. नसेल करायची तर त्यांच्यावर झालेला खर्च सव्याज सरकारला परत करावा.
पण बरीच लोकं २-३ वर्ष परदेशी राहिली की इथली उणी-दुणी काढायला सुरुवात करता. भारतात हे नाही, ते नाही, भ्रष्टाचार आहे, घाण आहे वगरे बडबड सुरू होते. इथे रहाणार्यांना अक्कल शिकवायला सुरुवात करतात. अरे हे बदलण्यासाठी तुम्ही काही केलं का? (उलट इथे रहातात तेव्हा ह्या सगळ्याला हातभारच लावतात) तुम्ही देशाला एक चान्स तरी दिलात का? शिक्षण संपल्यावर शेपूट घालून गेलात ना पळून परदेशात पैशासाठी? मग देशाच्या प्रगतीला काडीचाही हातभार न लावता नुसतं नावं ठेवणे कितपत बरोबर आहे? माझ्या मते हा शूद्ध कृतग्नपणा आणि हलकटपणा आहे.
ज्या लोकांना भारताने चान्स दिला नाही त्यांचं काय? तरीही इथे येऊन दारिद्र्यात मेलेल्यांचं काय? उदाहरणही देते, डॉ. खानखोजे. या कृषकाला इंग्रजांनी वॉरंट काढलं नाही म्हणून स्वतंत्र भारतात व्हीजा मिळवायला किती त्रास झाला याची कल्पना आहे का? असे कितीतरी खानखोजे संधी मिळत नाही, भ्रष्टाचार आहे, त्याला एकटा माणूस काहीही करू शकत नाही याचा अनुभव घेऊन वैतागून देश सोडतात त्यांनाही तुम्ही असेच बोल लावणार का?
माझाच व्यक्तीगत अनुभव सांगते.
स्थळ साहेबाचा देश, विद्यार्थ्यांसाठी असलेलं विद्यापीठाचं घर:
एक तक्रार येते, गाद्या फार खराब आहेत, पाठदुखी होते. दोन आठवड्यांत नवीन गाद्या आल्या आणि शिवाय हळहळ व्यक्त झाली, तुम्ही आधी का सांगितलंत नाहीत.
स्थळ असंच एक विद्यार्थी, पोस्ट-डॉक्ससाठी असलेलं होस्टेल, देश आपलाच:
एक तक्रार, आम्हाला जेवण बनवायचं आहे, कँटीनच्या जेवणाचा त्रास होतो, गॅसचं कनेक्शन कसं घ्यावं आम्ही?
तुम्हाला काय करायचं आहे जेवण-बिवण बनवणं? गोंधळच घालाल जास्त! आणि तुम्ही कँटीनमधे नाही जेवलात तर कँटीन कसं चालणार? मग व्हिजीटर्सना काय आणि कसं जेवायला घालणार आम्ही? ते काही नाही, तुम्ही इथेच जेवायचं.
सगळ्यात शेवटी सार सांगण्याची पद्धत असते म्हणूनः 'सब घोडे बारा टके' यामुळे अनेकांवर अतोनात अन्याय होतो याची जाणीव असावी.
अदिती
'सब घोडे बारा टके' यामुळे अनेकांवर अतोनात अन्याय होतो याची जाणीव असावी
याबद्दल अदितीला लाख अनुमोदनं!
बाकी जास्त लिहीत नाही.. तुम्ही आरोप करा, आम्हीही करतो याने काही चर्चा होत नाही.. त्यामुळे एव्हढच बास.. :)
http://www.bhagyashree.co.cc/
तुमचा गोंधळ होतोय. मी आत्ता भारतात आदर्श परिस्थिती आहे असं म्हटलंच नाहिये. अनेकांवर अन्याय होतोय ही वस्तुस्थिती आहे. जरा विचार करा की ही परिस्थिती का आली?
पण बरीच लोकं २-३ वर्ष परदेशी राहिली की इथली उणी-दुणी काढायला सुरुवात करता. भारतात हे नाही, ते नाही, भ्रष्टाचार आहे, घाण आहे वगरे बडबड सुरू होते. इथे रहाणार्यांना अक्कल शिकवायला सुरुवात करतात. अरे हे बदलण्यासाठी तुम्ही काही केलं का? (उलट इथे रहातात तेव्हा ह्या सगळ्याला हातभारच लावतात) तुम्ही देशाला एक चान्स तरी दिलात का? शिक्षण संपल्यावर शेपूट घालून गेलात ना पळून परदेशात पैशासाठी? मग देशाच्या प्रगतीला काडीचाही हातभार न लावता नुसतं नावं ठेवणे कितपत बरोबर आहे? माझ्या मते हा शूद्ध कृतग्नपणा आणि हलकटपणा आहे.
अच्छा म्हणजे ते लोक उणी-दुणी काढतात म्हणुन राग आहे होय!
चुका शोधणे, त्या दाखविणे हा चुका दुरुस्त करणे ह्यातील पहीला टप्पा असतो. (त्या दाखविण्याची एखाद्याची (वा काही लोकांची) पद्धत जर चुकत असेल तर अक्ख्या अनिवासी भारतियांना शिव्या घालणं म्हणजे काय?)
मी तरी भारत(त्यातही माझं गाव, मी रहात असलेलं, पुर्वी राह्यलो होतो असं शहर) सोडुन (आणि राहता देश) इतर देशाला कश्याला शिव्या घालु? माझ्या देशात जे चुक आहे त्याबद्द्ल मला खेदच वाटतो. जे बरोबर आहे त्याबद्द्ल आनंद आणि अभिमानच वाटतो.
बर परदेशी येणारे सगळेच काय उच्च दर्जाचे विद्वानच असतात का? काही लोकांनी बेजबाबदार व्यक्तव्य केली तर त्यात काय नविन? भारतात भारताबाबत वाट्टेल ते बडबडणारी कमी आहेत की काय कि तुम्हाला याचा राग यावा? की भारतात असल्यावर अशी बेजबाबदार, तुमच्या भाषेत अक्कल शिकवणारी भाषा बोलायला नैतीक परवानगी मिळते?
अच्छा म्हणजे ते लोक उणी-दुणी काढतात म्हणुन राग आहे होय!
अजीबात नाही.
चुका शोधणे, त्या दाखविणे हा चुका दुरुस्त करणे ह्यातील पहीला टप्पा असतो.
१००% सहमती. राग ह्याचा आहे की जेव्हा शक्य असतं तेव्हा वैयक्तीक स्वार्थासाठी देश सोडून जायचा. स्वत: काहिही न करता टोमणे मारण्याचा राग आहे.
एक उदाहरण देतो: एका गिरणी कामगाराला २ मुलं असतात. मोठ्याचं शिक्षण झाल्यावर तो दुसरं घर घेऊन वेगळा रहायला लागतो. काही दिवसानी थोडा वेळ घरी आल्यावर म्हणतो, किती लहान घर आहे, टिव्ही नाही, वीज नाही. मी नाही राहू शकत इथे. बाप शांतपणे म्हणतो, तू सुद्धा ह्या घराचाच भाग होतास ना? इथेच शिकून मोठा झालास ना? ह्या गिरणी कामगाराच्या जिवावरच प्रगती झाली ना तुझी? मग स्वत: मोठं घर घेण्याआधी ह्या घराला किमान रहाण्याजोगं बनवण्याचा विचार नाही का आला मनात?
+१
चूका दाखवणे कायम सोपे आहे. बदलण्यासाठी काय करतात?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
ओके.. मला वाटतं मी काही गोष्टी क्लिअर केलेल्या बर्या!
हे जे प्रकटन लिहीले आहे ते काय विचाराने लिहीले आहे हे नमूद करते.
हा असा लेख लिहीला म्हणजे लगेच अपराधीपणाची भावना,रिकामं मन सैतानाचे घर टाईप कमेंट्स कशा लिहील्या जातात?
जागोमोहनप्यारे म्हणतात तसं होम सिकनेस वाटणे आहे हे.. ही एक फेज असते. आपण काही कामंधामं सोडून हे असे विचार नाही करत. असे विचार नेहेमीच येतात जातात.. कधी जास्त रेंगाळतात.. अशा त्या फेजला मला कॅप्चर करायचे होते... बस्स.. ते होम सिकनेस वाटणे, त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येणे! हा काही रोग किंवा प्रॉब्लेम नाहीये लोकहो! .. :) इट हॅपन्स, एव्हरीटाईम!! फक्त आपण आपल्या देशी,आपल्या माणसात असलो की त्यावर उपाय निघतात लगेच! तसे कधी कधी इथे राहून नाही निघत.. फॉर एग्झँपल, मला पाऊस फार्रच आवडतो, पण इथे कॅलिफॉर्नियात तसा मनासारखा नाही पडत.. आहे काही उपाय? त्या पावसासाठी मला पुण्यात येणं परवडणार आहे का! :)) असल्या चिडचिडीला मोकळं करण्याचे हे प्रकटन..
ते लिहीता लिहीता, शेवटचा मुद्दा डोक्यात आला, आणि तो मी मांडण्यापासून राहवू नाही शकले..
निवासी-अनिवासी हा मुद्दा मला प्रत्यक्शात कधीही अनुभवावा लागला नाहीये! कोणालाही मी सांगायला गेले नाहीये की परदेशात ना असं असतं इत्यादी, आणि कोणीही मला पर्सनली लेक्चर दिले नाहीये, तुम्ही अनिवासी वगैरे! ( थँक गॉड, तितका अविचाराने उगीचच झोडणारं पब्लिक नाहीये माझ्या संपर्कात!)
पण जेव्हा कुठेही कोणालाही असं जेव्हा बोलले जाते तेव्हा मी विचार करतेच. मला ते खटकतेच! त्यामुळे ते सगळं इथेही उतरलं..
प्रत्यक्षात मी बेसनलाडू म्हणातात त्या तत्वाने वागते. ( खरे तर मी कशी आणि का जगते हे सांगायचे कारणच नाहीये, पण काहीजणांनी बरेच सल्ले दिलेत व्हॉलेंटिअरी वर्क, रिकामं मन!, इत्यादी.. म्हणून लिहावे लागतेय. ) वर कोणीतरी म्हटलेय ( ऋषिकेश बहुतेक) ज्यांचे फिक्स काही ठरलेले असते त्यांना फारसा त्रास होत नाही. मला ते पटते. म्हणूनच ठराविक उद्दीष्टं समोर असली की त्रास होत नाही यावर माझा विश्वास आहे! असो.. पण मूळात तो मुद्दाच वेगळा आहे. मला याठिकाणी केवळ ती चिडचिड, होम सिकनेस मांडायचा आहे. बाकी काहीही नाही!
ह्म्म, आता असं म्हणू नका, कोणी सांगितलंय मग लांब राहायला होम सिकनेस होतो तर!! हेहे.. त्याला काही अर्थ नाहीये! इथे येणे, किती काळ राहणे हे सर्वस्वी पर्सनल डिसिजन्स असतात. त्यामुळे तसं जर कोणी म्हणणार असेल, तर मी दुर्ल़क्षच करणे पसंत करीन..
पण येस.. जो होम सिकनेस मला मांडायचा होता, तो बव्हंशी सर्वांपर्यंत पोचला काही अपवाद सोडून असं म्हणता येईल! वेल डन भाग्यश्री! हेहे..
http://www.bhagyashree.co.cc/
>>> जो होम सिकनेस मला मांडायचा होता, तो बव्हंशी सर्वांपर्यंत पोचला काही अपवाद सोडून असं म्हणता येईल! वेल डन भाग्यश्री!
- असेच म्हणतो :).
बाकी चालू द्या.
सही झालाय ग लेख भाग्यश्री. तुला अमेरिकेत बसून असं होतं, मला तर बेंगलोरमधेच असं होतंय... अशानं स्थलांतरंच बंद व्हायची. काय बरोबर नि काय चूक, काय माहीत.
रेवतीचा प्रतिसाद बाकी हहपुवा हहपुवा हहपुवा हहपुवा हहपुवा....
भाग्यश्री,
उत्तम प्रकटन. मनातले विचार बाहेर पडले ना? आता जरा मोकळं मोकळं वाटतंय ना? फिनिश :)
बाकी, मेघना म्हणते तसं मला दिल्ली आणि ग्वाल्हेरात झालं होतं..
दिल्लीमध्ये फार नाही फक्त खाण्याच्या सवयींमुळे आणी ग्वाल्हेरात तर विचारु नको, वेड लागायची वेळ आली होती....भयानक होमसिक झालो होतो. नोकरी सोडून परत आलो. आता, माझं घर बारामतीला, आई-वडील भाऊ सगळे तिकडंच. पण मी परत आलो ते पुण्यात. तरीही मला समाधान वाटायला लागलं...म्हणजे होमसिकनेस हा 'होम' बद्दल नव्हता तर 'होमलँड'बद्दल :) सेम थिंग देअर ऑन युअर एंड टू! राईट?
-(सध्या पुण्यातच होमसिक झालेला) ध.
>>ही ना अमेरिका भंगार..भंगार.. भंगारेस्ट आहे !!
अमेरिकेत राहून लोक भारताला शिव्या देतात त्याचा अनेकांना राग येतो म्हणून अमेरीकेत राहून अमेरिकेलाच शिव्या देण्याचा प्रयत्न आवडला :) (ह.घ्या.)
एकंदरीत लेख हा, "गादी खूपच मऊ आहे झोपच लागत नाही..सगळ्या सुखसोयी आहे पण सुख बोचतं आहे" अश्या छापाचा वाटला.
मनापासुन लिहिल आहेस. छान जमलाय. :)
एवढी तीव्रता नसली तरी काहिवेळा घरच्यांची आठवण येवुन म्हण किंवा कोल्हापुरच्या वेगवेगळ्या आठवणी येवुन म्हण पुण्यात सुद्धा सुरवातीला मला त्रास झालाच होता की.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
प्रतिक्रिया
भावपूर्ण मनोगत.
सहमत
तेव्हा
प्रकटन चांगलं आहे
चला वादावादी खेळू या! ;-)
'सब घोडे
ह्म्म्म्म
पण बरीच
.
एकदम चपखल
+१ चूका
तेच म्हणतो...
ओके.. मला
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो...
सही झालाय
+१ समहत, असेच म्हणतो...वगैरे वगैरे!!!
+१
मस्त !
>>ही ना
बरेच
मनापासुन
छान लिहिले आहे मनोगत
स्वदेश....
Pagination