खूप मनापासून लिहिलंय. जाणवतंय लख्खपणे. त्रास करून घेऊ नकोस. नवीन आहेस. एकटी आहेस त्यामुळे होतंय असं. अर्थात जुनी झाल्यानंतर होणार नाही असं नाही. माणसामाणसातला फरक आहे हा. कोणाला आयुष्यभर वाटतं कोणाला एक दिवसही वाटत नाही. पण असं मुळापासून उपटून काढल्यासारखी भावना येते ना ती अगदी जीवघेणी असते. पण आपल्यासाठी, आपल्या आईवडिलांसाठी, लेकराबाळांसाठी करायचे म्हणून मन मारून करावे लागते. दॅट्स लाईफ. कान्ट डू मच अबाउट इट. बी हॅप्पी. :)
बाकी अनिभा वि. निभा हा एव्हरग्रीन विषय आहेच. मी भारतात राहून गोरे झालेले आणि भारताबाहेर राहूनही अजून काळेच असलेले असे सगळेच प्रकार बघितले आहेत त्यामुळे माझ्या दृष्टीने असे सरधोपट क्लासिफिकेशन होऊ शकत नसल्याने हा वादच मुळात गैरलागू आहे. असो. बाकी चालु द्या.
बिपिन कार्यकर्ते
बिपिनचा प्रतिसाद आवडला.
आपल्या मनोरंजनासाठी उपाय शोधत राहणे आणि एकाच उपायावर जास्त काळ अवलंबून न राहणे हा एक बरा उपाय असतो.
बाकी मराठीसंकेतस्थळांवर या पूर्वी निवासी-अनिवासी या विषयांवर इतके चर्वण झाले आहे की नवा प्रतिसाद टंकण्याऐवजी जुन्या चर्चांचे दुवे देणे जास्त बरे पडावे :)
-- लिखाळ.
जगी सर्वसूखी असा कोण आहे । विचारी मना तूची शोधूनी पाहे । -समर्थ.
तुझ्या प्रतिसादातलं प्रत्येक वाक्य पटलं.
भाग्यश्री --
अमेरिकेत आल्यापासून भारत दौरा घडला की नाही? कारण भारतातून परत येताना अर्ध्यावाटेतूनच परतावंसं वाटतं मग भले ती पहिली भारतभेट असो की दहावी !
अनिवसीवदी भारतीय : अगदी मनातले लीहिले आहेस.
निवसीवदी भारतीय : एवढी आठवण येते तर गेलातच का तिकडे. इकडे सहनुभुती मिळवयची आणि फुकट्चे सल्ले द्यायचे
;-) क्रुपया हसून घेणे.
लेख छान जमला आहे.
हेहे.. येस, वादासाठी तलवारी आणि वादानंतरसाठी चपला तैय्यार आहेत! :))
जोक्स अपार्ट, मला खरंच उगीचच वाद नकोय इथे.. म्हणूनच लिहून आठ दिवस नुसताच ठेवला होता.. आता पब्लिश केलं खरं, but I really wish to have a good discussion and not bombardment of arguments! :)
http://www.bhagyashree.co.cc/
अगदी माझ्या मनातलं लिहिल आहे अस वाटतयं.
खरचं, जेव्हा जेव्हा कारमध्ये हे गाणे लागते तेव्हा तेव्हा मन बंड करून उठते...
वाटतं, जर एक संशोधक नासातली नोकरी सोडून घरी (खेडेगाव ते पण घरच ...)
जाऊ शकतो केवळ देश प्रेमाखातर तर, आपण कोणत्या खोडाचे आहोत तसे न वाटायला...
पण त्याचवेळी हा विचार मनात येतो:
जेव्हा तो शाहरूख खान भारतात परत येण्याचे ठरवतो, तेव्हा त्याला त्याच्या भारतातल्या भविष्याची खात्री असते. तो ISRO त संशोधक म्हणून नक्कीच प्रगती करू शकत असतो.
जर आपण परत जायचे ठरवले तर मिळून मिळून काय मिळणार?
Infy, LnT, TATA, Mahindra मध्ये नोकरीच ना?
ती पण कसली? तर Software Engineer...
म्हणजे काय? इकडे असतो घोडा, तिकडे गाढव.... फक्त ओझीच वहायची ना... मग घोडा तर घोडा. सिंहाच्या जास्त जवळ! (म्हणजे माझी ही समजूत आहे हं.. लहानपणी जे काही इसापनिती, हतीमताई वाचले आहे, त्यामुळे जंगलात जे काही प्राणी राहत असतात त्यांच्यामध्ये असे वर्गीकरण असते.सगळ्यात खाली कोल्हा, लांडगा असे दुष्ट प्राणी आणि वरचढक्रमाने गाढव ,घोडा, हत्ती, ऊंट असे प्राणी आणि सगळ्यात वरती वाघ आणि सिंह)
जर IITian झालो नसलो तरी काय झाले? मिळवलेले कमी नाही पडू द्यायचे... अजून काम करू, पण आता मन नाही मारायचे... जे मिळाले ते प्राक्तन जे घडवू ते भाग्य!
आलोच आहोत ना इथे.. मग पोतं भरून घेऊन जाउ या परत... मागाहून वाटायला नको कमी पडले म्हणून...
आणि जरा आजूबाजूला पाहिले तर काय दिसते? १०० माणसे आधीपासून इथेच होती की? मग आपण काय पाप केले आहे जर इथे राहिलो तर? आपण पण मारवाड्या, पंजाब्यांसारखी आपली माणसे आणि गाववाले आणूया इथे... सगळे मिळून प्रगती करूया..
काही वेळा वाटतं की, बाकीचे जे मराठी माणसाबद्द्ल बोलतात ते खरंच आहे.
आपणच एकमेकाचे पाय ओढत बसतो. बाकीचे वर जात राहतात आणि शेवटी आपणच आपली एकट्याची पुंगी वाजवत बसतो... मी एकटा आणि माझे कुटुंब एकटे. झक मारली आणि इथे आलो...
पण हेच विसरून चालत नाही की, आपण बाहेर पडलो आणि जास्त स्वतंत्र झालो. जास्त मोकळा विचार करू शकलो. नातेवाईकांना जास्त मदत करू शकलो... जर घरी असतो तर हे सगळे जमले नसते...
बाकी बरच नंतर...
प्रमेय साहेब, देश सोडून दुसरीकडे येण्याचा निर्णय स्वतःचा होता मग त्यासाठी उगाच अपराध्यासारखं का वाटून घेता, आणि प्रतिसादात दिलेलं जस्टीफिकेशन कशासाठी? मुळात देश आणि परदेश अशी तुलनाच व्हायला नको. प्रगती म्हणाल तर कुठेही होते... आपल्यालाच सोपा मार्ग हवा असतो... त्याचा अवलंब करणे चुक नक्कीच नाही... पण मग उगाच जिथे होतो ते खराब पेक्षा तुलनात्मक कमी दर्जाचं आणि जिथे आहोत ते चांगलं असा युक्तिवाद करू नये.
-अनामिक
कोणत्या देशात, जातीत, प्रांतात इ. जन्माला यावे याची निवड आपली नाही; मात्र शिक्षण, रोजगार यांसाठी स्वकर्तृत्त्वावर जगाच्या पाठीवरील कोणत्या देशात, प्रांतात आणि मुख्यत्त्वे किती कालावधीसाठी जायचे ही निवड नक्कीच आपली आहे. ही निवड जितकी स्पष्ट नि ठाम असेल, त्या प्रमाणात लेखातील भावुकतेशी सामना करणे सोपे जाईल, असे वाटते. कारण मुळातच अनिवासी भारतीय वि. निवासी भारतीय या रटाळ वादाला भावनिकतेची पार्श्वभूमीच जास्त आहे, असे मला वाटत आले आहे.
व्यक्तिशः, ज्या उद्देशाने स्वदेश सोडला तो उद्देश कितपत सार्थ झाला किंवा नाही आणि कधी याचे फलित ध्यानात घेऊन स्वदेशी परतण्याचा किंवा न परतण्याचा निर्णय घेता येणे, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.
(अनिवासी)बेसनलाडू
>>>व्यक्तिशः, ज्या उद्देशाने स्वदेश सोडला तो उद्देश कितपत सार्थ झाला किंवा नाही आणि कधी याचे फलित ध्यानात घेऊन स्वदेशी परतण्याचा किंवा न परतण्याचा निर्णय घेता येणे, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे... <<<
यातच सर्व काही आले..
बाकी लेख तर चांगला लिहिला आहे.. लिहित रहा..
--- अनिवासी भारतीय टुकुल.
भाग्यश्री, लेख अगदी खणखणीत जमला आहे.
एकदम मनापासुन आणि बहुतेक आहे तसे लिहले असल्याने कॄत्रिमता आणि नाटकीपणा अज्जिबात जाणवत नाही व एक प्रामाणिक वर्णन वाटले, खुब भालो ....
बाकी तो निवासी आणि अनिवासी वाद निरंतर आहे, त्याचे काळजी नकोच करु ...
>>वादासाठी तलवारी आणि वादानंतरसाठी चपला तैय्यार आहेत! )
=)) =)) =))
हा हा हा, हे एक भारी केलेस, तयार असलेले बरे नाही का ?
असो, उत्तम लेखन, असेच अजुन येऊद्यात.
आणि हो, जरा फ्रिक्वेंसी वाढवा लिखाणाची मॅडम...
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
लेख चांगला आहे आणि भावना नक्कीच समजू शकतात...वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे हा निवासी-अनिवासी वाद हा कायमचा आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे न देणे हे आपल्याच ठरवावे लागते.
थोडे वेगळ्या निरीक्षणाने आणि अनुभवाने या वादासंदर्भात लिहीतो. असे वाद का घडतात यावर जास्त विचार केला तर मनात खोल दडलेला कुठल्यान कुठल्याप्रकारचा गंड (complex) असतो. तो सर्वत्र असतो मात्र सर्वात असतो असा याचा अर्थ नाही. फक्त कारण केवळ. "आमचा देश आहे.." असे आपल्याच कालपर्यंतच्या देशवासियास आणि संस्कृतीने आजही तसाच असलेल्या म्हणणार्या व्यक्तीचा असतो तसाच तो विविध पद्धतीने नावे ठेवणार्या अनिवासी भारतीयपण त्याला कारण असतात. काही गोष्टी नक्कीच अशा आहेत ज्या बाहेर गेल्याशिवाय समजत नाहीत. मात्र त्याचा अर्थ आपण कसेही बोलावे आणि तुच्छ लेखावे अशी काही स्थिती नाही. आणि तशी असली तर ती कुठेही कुठल्यान कुठल्या कारणासाठी असू शकते...
मात्र यात अजून एक प्रकार पाहीला आहे: कधी कधी येथे (अमेरिकेत) जर कोणी कायमचे भारतात जात आहे असे सांगितले तर थोडे offensive वाटते. मग ते लगेच यावर वाद घालणार की तेथे काय ठेवले आहे, चांगले नसते वगैरे...
मला वाटते कोणी कुठे रहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि जो पर्यंत त्याच्यावरून देखावा (show off) केला जात नाही - मनापासून, तो पर्यंत काही फरक पडायचे कारण नाही.
या व्यतिरीक एक कायम प्रश्न पडतो:अनिवासी भारतीय प्रकारात जर अमेरिकास्थित भारतीय हा प्रकार नसता, तर मग निवासी-अनिवासी भारतीय हा वाद कितपत झाला असता? ;)
विकासदादा ब्राव्हो..!
आम्ही दुसर्या देशात राहतो म्हणून आमचं आमच्या देशावर आमच्या मातीवर प्रेम नाही असा अर्थ नका रे काढू. तिथल्या शाळां -कॉलेजातून शिक्षण घेतलं आणि इथे येऊन पैसे कमवले... याचा अर्थ आम्ही भारतावर प्रेम करत नाही असा नक्कीच नाही. यातून फक्त तुमच्या मनात असलेला कॉप्लेक्स दिसतो असंच म्हणेन मी.
अनिवासी भारतीय प्रकारात जर अमेरिकास्थित भारतीय हा प्रकार नसता, तर मग निवासी-अनिवासी भारतीय हा वाद कितपत झाला असता?
१००% सहमत
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
जेंव्हा निवासी-अनिवासी असा (तुम्ही देशाबाहेर रहाता, आणि त्या संदर्भातील इमोशनल ब्लॅ़कमेलींग) तेंव्हा वाद हा अमेरिकेसंदर्भात होतानाच जाणवतो. कोणी ब्रिटनमधे आहे, जर्मनीत आहे, जपान मधे आहे, सौदी अरेबियात आहे अथवा सिंगापूर/हाँककाँग/चायना मधे आहे तर त्या संदर्भात विशेष बोलले जात नाही असे जाणवते.
आधी म्हणल्याप्रमाणे असे वाद घालायचे काही कारण नसते. पण तसे तरी वाद घातले जातात. कारण आधी दिले आहेच...
सुरवातीला सर्वचजण जातात यातून. पुढे नौकरी वगैरे करायला लागलात, स्वतःचे काही असे कामधाम असले, मित्र-मैत्रिणींचा ग्रुप असला की अमेरिका काय आणि भारत काय, सारे सारखेच. तोवर काही व्हॉलंटीयरींग, नॉन-प्रॉफिट सेक्टरमधे काम करता येइल. नाहीतर रिकामं मन, सैतानाच घर अशी अवस्था होइल. पण पुढे भारतातले संदर्भ निवत जातील, मुळ उखडत जातील. आता हेच घर, जितक्या लवकर हे समजताल, जवळ कराल, तेवढा मार्ग सुकर होइल. शुभेच्छा!
छान! भावपूर्ण मनोगत.
कोणी कुठे रहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न हे खरेच. स्वतःला त्रास होत असूनही रहावं का हे ही ज्याचं त्याने ठरवावं.
बेला म्हणतो तसे परदेशी जाण्याचा उद्देश मनाशी नक्की असला की अशी घालमेल कमी होते हे स्वानुभवावरून सांगतो. मी जेव्हा परदेशात होतो तेव्हा पर्यटन हा मुख्य उद्देश होता. (बहुदा यापुढेही कधी गेलो की हाच मुख्य उद्देश असेल). तसेच ठराविक काळाहून अधिक काळ सलग भारताबाहेर (एकाच शहरात :) )रहायचे नाहि असे ठरवूनच गेलो होतो. त्यामुळे तिथला वेळही मजेत गेला आणि अशी चिडचिड कमी झाली.
ज्याने कायमचं रहायचं ठरवलं आहे ते आणि ज्यांनी रहायचं नाहि हे नक्की केलंय ते असे दोघेही कमी चिडचिड करतात, मात्र कुंपणावरचे या घालमेलीतून जातात.. नाहि का?
(जाहिरातः कुंपणावरल्या मित्रांसाठी)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
सांस्कृतिक धक्का अर्थात कल्चर शॉक ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे आणि त्यात अनेक छटा+ पायर्या असतात.
प्रथम परदेशात गेल्यावर आपल्या देशातल्या ओळखीच्या गोष्टी/व्यक्तींशी पदोपदी तुलना होते (उदा जेवणाचे पदार्थ/वेळा, ऋतुमान , आपल्या इथली माणसे कित्ती मनमोकळी ह्या देशातली किती तुटक इ. इ.) ह्या फरकातून येणारा ताण सहाजिक असतो मग पर्यायाने एकटेपण/चिडचिड/नैराश्य येते. गड्या आपुला गाव बरा असे वाटू लागते :)).
काही काळाने परदेशातल्या गोष्टींची सवय होते आणि आपल्या देशात काही कमीपणा/विरोधाभास असेल तर तो जाणवू लागतो (उदा, पाश्चिमात्य देशांतील स्वच्छता, मोठे रस्ते, सुळक्कन धावणार्या मोटारी आणि भारतातली धूळ/ गर्दी /उन्हाळा इ.)
अजून वास्तव्य लांबले तर मग परदेशातल्या कुठल्याच गोष्टींचे नवल वाटेनासे होते, आपण तिथल्या राहणीमानास सरावतो.
ह्यानंतर मात्र आपल्या देशात परत आलो कि पुनर्धक्का बसतो आणि दोन्ही देशातला विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो पण झुकते माप ह्याखेपेस परदेशाला असते :) (उदा मुंबई/कलकत्ता एअरपोर्ट वरचा विशिष्ट "वास" !).
ह्या सर्व अनुभवात हौशे/नवशे/गौशा लोकांना वेगवेगळ्या छटा जाणवतात.
ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे दिलासा देणार्या गोष्टी आवर्जून कराव्यात (उदा बाहेर बर्फ पडत असताना मरणाच्या थंडीत, घरात बसून गुरगुटी भात+मेतकूट+ कुळीथाचे पिठले खाउन बघा- कम्फर्ट फूड) ताण हमखास कमी व्हायला मदत होते :)
आम्हालाही अभिमान वाटतो ना देशाचा, तिरंगा दिसला की ऊर भरून येतो
माझ्या ओफ्फिसच्या ड्राइवरची (पाकिस्तानि) कि-चेन म्हन्जे तिरंगा होता. मी पहिले आणी विचारले कुठुन आण्लिस वैग्रे.
तो म्हणाला ते जाउ दे हिच ह्या...मला मोह झाला पण तो मी आवरला.
चुचु
मनापासुन लिहलेला लेख खरच आवडला.
मी घरापासुन दुर राजस्थान मध्ये राहताना देखील माझी हिच अवस्था होते.
अजुनही ए.आरचे "ये जो देस है तेरा..." ऐकताना न चुकता पाणी येतं!!
मनातलं बोललातं
या लेखाबद्दल खरचं धन्यावाद
चेतन
देश सोडणे, गाव सोडणे हे प्रकार लोक इतक्या सिरीयसली का घेतात , मला समजलेले नाही..... माणूस हा माकडापासून तयार झालेला आहे, मग मी आणि हजारो वर्षापूर्वीचे ते माकड यान्च्यामधल्या सगळ्या पिढ्या एकाच गावात्/एकाच घरात घडून गेलेल्या असतात का ? काही ठराविक पिढ्यानन्तर स्थित्यन्तरे/ स्थानन्तरे ही अपरिहार्यपणे झालेली असतात... सगळीकडचे चान्गले एकत्र करून पुढच्या पिढीला देणे , एवढेच आपले काम....
हिन्दु धर्मामध्ये देशान्तर हे पाप कधीपासून मानले जाऊ लागले, याचा सन्दर्भ कुणी देऊ शकेल का ? कारण गम्मत म्हणजे रुग्वेदामध्ये एक रुचा आहे....
'हे मित्रावरूणानो आम्हाला दूरदेशी जाण्याची, ज्ञान आणि धन कमावण्याची सन्धी द्या. आपली कृपा आमच्या पुत्रपौत्रावरही असू द्या.'
याचा नेमका संदर्भ ( मन्डल्/रुचा क्रमान्क ) ही मी देईन...
रामाने लन्केला केलेले गमन , कृष्णाने गुजरातजवळ समुद्र ओलान्डून द्वारकेची केलेली स्थापना ही याचीच रूपे आहेत असे मला वाटते... ( आणि योगायोग ( ?) म्हणजे रामाने समुद्र ओलान्डण्यापूर्वी रामेश्वरला शिवलिन्गाची स्थापना केली तर कृष्णाने सोमनाथ मन्दिर निर्माण केले... एन आर आय लोकानी देखील प्रत्येक सुट्टीतून पुन्हा परदेशात येताना आधी शिव मन्दिरात जाण्याची प्रथा ठेवली तर ..? यातील धर्मशास्त्र कुणी उलगडले तर जास्ती बरे होईल..)
एवढा भक्कम इतिहास असताना आपण का भाण्डत आहोत ???
हिन्दु धर्मामध्ये देशान्तर हे पाप कधीपासून मानले जाऊ लागले, याचा सन्दर्भ कुणी देऊ शकेल का
माहित नाही पण देशापेक्षा महाराष्ट्रात असे मानण्याचे प्रमाण आतापर्यंत होते.उत्तरेत/तामिळ्/आंध्र्मध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण पुर्वीपासुन आहे. कॅलिफोर्नियात शीख लोक १९०५ मध्ये प्रथम आले होते. आफ्रिकन देशांत गुजराती/मारवाडी तर १०० वर्षापेक्षा जास्त काळ आहेत. खुद्द महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत जवळ्पास २० वर्षे होते.मॉरिशस्,सेशेल्स,फिजी सारख्या देशांत भारतिय अनेक वर्षापासुन आहेत.
अनिवासी भारतीय प्रकारात जर अमेरिकास्थित भारतीय हा प्रकार नसता, तर मग निवासी-अनिवासी भारतीय हा वाद कितपत झाला असता?
हा वादाचे मुळ बहुदा अमेरिकेचे प्रमाणाबाहेर केले जाणारे उदात्तीकरण असावे.हल्लीच हिलरी क्लिंटन भारत भेटीवर आल्या होत्या. मिडिया,सरकार ह्याना त्याना 'कुठे ठेवू कुठे नको' असे झाले होते.९ वर्षापुर्वी बिल क्लिंटन भारतात आले असता सही घेण्यासाठी भारतिय खासदारांची झुंबड उडाली होती.मनमोहन सिंग अमेरिका भेटी वर येतात त्यावेळी बहुदा ती बातमी nytimes च्या पाचव्या पानावर असते!.ईंडिया कॉकस वगळता त्यांच्या भेटीला अमेरिकेत विशेष महत्व नसते.अमेरिकेच्या द्रुष्टिकोनातुन भारताचे स्थान नगण्य असले तरी भारतिय उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
मनमोहन सिंग अमेरिका भेटी वर येतात त्यावेळी बहुदा ती बातमी nytimes च्या पाचव्या पानावर असते!
अगदी टीपीकल अन-ईन्फॉर्मड प्रतिपादन! या अशा वाक्यानीच अडाणी भारतीय जनते मध्ये चुकीचे समज पसरतात.
मी रोज वॉल स्ट्रीट जर्नल वाचतो व त्यात मी अनेकदा भारतातील अनेक बातम्या पहील्या पानावर वाचल्या आहेत. (मला उलट, ही बातमी पहिला पानावर! असेही अनेकदा वाटले आहे, शोधुन दुवे देईन हवे असल्यास.)
अमेरिकेच्या द्रुष्टिकोनातुन भारताचे स्थान नगण्य असले तरी भारतिय उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो.
अत्यंत खुळा गैरसमज! मग काय त्या क्लींटन बाई तुमच्या मिडीयाची पॉप्युलॅरीटी मिळवायला आल्या होत्या का भारतात? की पुढच्या निवडकुणित भारतीय मतं मिळवायला?
उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो.
हे का याचा निट विचार करा. अर्थात हे वरील वाक्य ही पुर्ण सत्य नाहीच आहे.
हा वादाचे मुळ बहुदा अमेरिकेचे प्रमाणाबाहेर केले जाणारे उदात्तीकरण असावे
सहमत. माझ्या म्हणण्याचा उद्देश हा की उत्तरेत(गुजरात्/राजस्थान्/पंजाब) स्थलांतरीत लोकांचे प्रमाण ईतर राज्यांपेक्षा जास्त आहे.
मग काय त्या क्लींटन बाई तुमच्या मिडीयाची पॉप्युलॅरीटी मिळवायला आल्या होत्या का भारतात
नाही. भविष्यात भारत दोन राज्यांमध्ये अणु प्रकल्प चालु करणार आहे.ह्याचे कोट्यावधी डॉलर्स चे कंत्राट काही अमेरिकन कंपन्याना पाहिजे आहे. जी बोलणी झाली त्यात हा मुद्दा प्रामुख्याने होता.
(संदर्भ- nytimes.com). हा झाला व्यवहाराचा भाग.
अमेरिकेच्या उच्च राजकिय वर्तुळात भारताचे स्थान नगण्य आहे. म्हणजे ब्रिटन्,फ्रांस,जर्मनी सारखे त्याला स्थान नाही(ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.प्रत्येक देश्(भारतही) आपला फायदा बघतो).
हे का याचा निट विचार करा
अमेरिकेला जावून स्थायिक होणे ह्यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही.
क्ष्^न + य्^न = झ्^न
म्हणजे भारत त्यांच्या साठी व्यवहार करण्याइतका महत्त्वाचा आहे तर! :)
अमेरिकेच्या उच्च राजकिय वर्तुळात भारताचे स्थान नगण्य आहे. म्हणजे ब्रिटन्,फ्रांस,जर्मनी सारखे त्याला स्थान नाही
समजा, ब्रिटन जर्मनी सारखे स्थान नाही, म्हणजे नगण्य का? मला तुमचा मुद्दा कळला होता पण तुम्ही 'जितके भारताला महत्त्व (त्यांच्यामते) द्यायचे आहे तितकेच देतात, पण जितके द्यायला हवे (भारत, भारतीय लोक वगैरे) तितके देत नाहीत' असे म्हणालात तर योग्य होईल असे वाटते.
हा एक वेगळ्या धाग्याचा विषय होउ शकेल म्हणुन यावर जास्त बोलत नाही.
अमेरिकेला जावून स्थायिक होणे ह्यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही.
तुम्हाला गैर वाटते की नाही यावर मी तो प्रतिसाद नव्हता दिला, तर तुमच्या विधानातील मला वाटलेल्या चुका दुरुस्त करण्याकरीता.
मी रोज वॉल स्ट्रीट जर्नल वाचतो व त्यात मी अनेकदा भारतातील अनेक बातम्या पहील्या पानावर वाचल्या आहेत. (मला उलट, ही बातमी पहिला पानावर! असेही अनेकदा वाटले आहे, शोधुन दुवे देईन हवे असल्यास.)
मनमोहन सिंग निवडून आल्यावर वॉल स्ट्रीट जर्नल च्या पहिल्या पानावर मोठ्या फोटोसकट बातमी होती.
(पण हे फक्त वॉल स्ट्रीट जर्नल वरच. बाकीचे पेपर एवढी दखल घेत नाहीत. CNBC चे संकेतस्थळ पाहीले तर २६/११ ची बातमी सुद्धा कळेल न कळेल अशी दिली होती. कोणी सांगावे, कदाचित भारताबद्द्ल आकस असेल)
हा वादाचे मुळ बहुदा अमेरिकेचे प्रमाणाबाहेर केले जाणारे उदात्तीकरण असावे.हल्लीच हिलरी क्लिंटन भारत भेटीवर आल्या होत्या. मिडिया,सरकार ह्याना त्याना 'कुठे ठेवू कुठे नको' असे झाले होते.९ वर्षापुर्वी बिल क्लिंटन भारतात आले असता सही घेण्यासाठी भारतिय खासदारांची झुंबड उडाली होती.मनमोहन सिंग अमेरिका भेटी वर येतात त्यावेळी बहुदा ती बातमी nytimes च्या पाचव्या पानावर असते!.ईंडिया कॉकस वगळता त्यांच्या भेटीला अमेरिकेत विशेष महत्व नसते.अमेरिकेच्या द्रुष्टिकोनातुन भारताचे स्थान नगण्य असले तरी भारतिय उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो.
बराचसा सहमत आहे. पण वरचे विधान जर गृहीत धरले, तर त्याचा राग अमेरिकास्थित अनिभांवर का?
परदेशी जा...जरूर जा. नवीन गोष्टी शिका...पैसा कमवा..पण खरोखरच मायभूमीबद्दल ओढ असेल ना तर तो माणूस एका विशिष्ठ काळानंतर परत देशात जातोच.
जे जात नाहीत त्यांनी वरवर काहीही कारणे सांगितली तरी त्यांना आता भारत देश रहाण्यासाठी आवडेनासा झालेला असतो हेच मुख्य कारण असते.
हा लेख म्हणजे स्वत:च्या अपराधी पणाला स्वतःच काहितरी कन्व्हिंसिंग उपाय शोधल्यासारखे वाटत आहे.
<<<<<<<<<<<<<<<हा लेख म्हणजे स्वत:च्या अपराधी पणाला स्वतःच काहितरी कन्व्हिंसिंग उपाय शोधल्यासारखे वाटत आहे.>>>>>>>>>>>>>>
देश सोडल्यामुळे अपराध केला असे कुठे आहे ? होम सिकनेस/ त्याच त्याच गोष्टीचा कन्टाळा म्हणजे अपराधी व्रुत्ती थोडीच आहे..?
प्रतिक्रिया
हम्म खरे
भाग्यश्री....
मस्त
बिपिनचा
पर्फेक्ट प्रतिसाद बिपिनभौ
तलवारी तयार ठेवा
हेहे.. येस,
भाग्यश्री,
छान लिहीलंय
असेच म्हणतो
अगदी
प्रमेय
मनमोकळं
पसंद अपनी अपनी
एकदम सहमत..
भाग्यश्री,
भारतात या
उत्तम लेख ...
चांगला लेख
अतिशय संयत प्रतिसाद.
>>अनिवासी
सोपे आहे
अगं
ठ्ठ्यॉ!!!!
ठ्ठ्यॉ!!!!
एका दगडात...
भो विकास राव...
रिकामं मन, सैतानाच घर
पण पुढे
छान मनोगत
मुन्गी
सांस्कृतिक धक्का
आम्हालाही
तुर्त
) चुचु
सही...
मुन्गी
देश सोडणे,
नाइस
१००% सहमत
उदात्तीकरण
बर्याच
प्रतिसाद
हा झाला
बरोबर आहे
बराचसा सहमत
जबरी मुद्दा....
परदेशी
छान लिहिलं
<<<<<<<<<<<<<<<हा
Pagination