मी : मग ? जोरात दिसतात हल्ली तुमचे ते....
मित्र : "तुमचे" ! हाहाहा.. का रे बाबा ?
मी : अजून तू त्याना किंवा त्यांनी तुला डिच नाही केले म्हणून "तुमचे".
मित्र : ह्म्म ... म्हणजे अन्य कुणाच्या बाबतीत डिचिंग अन् डिसोनिंग झालेय तर....
मी : डोंबलाचे डिसोनिंग. या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे "मिसळपाव" जणु , गुतला तो संपला.
मित्र : हाहा .... हे बाकी खराय.
मी : दर ७६ वर्षानी येतो तो. आला की आपली मजा. लोक दुर्बिणी घेऊन धावताहेत. येईल नि जाईल.
मित्र : हाहा ..अंतू बर्व्यासारखा बोलतो आहेस ! "अहो कसला न्हेरु ! त्या रत्नांग्रीत भाषणे कसला देत फिरतोस ! तांदूळ दे म्हणावं."
मी : फार बोलू नकोस , आण्णू गोगट्या करेन तुझा !
मित्र : नाही , म्हणजे इतका कडवटपणा बरा नाई. आता दिसतोय आकाशात तर दर्शन घे ! पुन्हा ७६ वर्षे काय फिरकेल न फिरकेल.
मी : अहो , तो आकाशात पाजळतो आहे तेच ठीक. लोकांनी काय आपले फायरवर्क्स पाहून टाळ्या वाजवाव्यात. आम्ही बरे आमच्या खोपटात.
मित्र : का रे ? ये की बाहेर जरा. वाजव तूपण टाळ्या.
मी : तोच तर साला प्रॉब्लेम आहे आपला. साला कधीममधी होणार्या घटकाभरच्या रोषणाईच्या चूषपणाला आम्ही लांबवर वाट दाखवणारी मशाल समजतो !
मित्र : हाहाहा .... तुम्ही म्हणजे .... कुणी शिवाजी म्हाराज की म्हण्टले की "जय" म्हणायला मोकळे. चल , बोअर करू नकोस मी फायरवर्क्स ला चाललो ... तुम्ही बसा तिच्यायला कुढत !
(सन्माननीय सदस्य सहजरावना सादर अर्पण. )
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3057
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला
(हा
_/\_
(हा
In reply to _/\_ by सहज
हाणतिच्या
हा हा हा!
:)
जियो
फायरवर्क
हा हा हा
In reply to फायरवर्क by परिकथेतील राजकुमार
फक्त
जुने-नवे
फर्मास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदनशी
In reply to फर्मास by नंदन
हाण्ण!!!
अशनीच तो आतषबाजी करणारच, अहो कॅरॅक्टेरिस्टिक आहे ते!