मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वक्ता दशसहस्त्रेषु हरपला!

क्रान्ति · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
Ram Shewalkar राम शेवाळकर यांचं हृदयविकारानं निधन! एक थोर साहित्यिक, वक्ता, संतसाहित्याचा प्रगाढपंडित आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं आहे. मिपा परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.

वाचने 4721 वाचनखूण प्रतिक्रिया 14

अनामिका 03/05/2009 - 13:36
"अजि सोनियाचा दिनु" म्हणत ज्ञानेश्वरीचे निरुपण आपल्या ओघवत्या वाणीने करित रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या प्रा .राम शेवाळकर यांना भावपुर्ण आदरांजली ! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

चतुरंग 03/05/2009 - 14:19
वक्तृत्वाला एक खोली लाभलेले जे थोडे विचारवंत वक्ते मराठीत आहेत त्यापैकी राम शेवाळकर हे एक होते. त्यांना आदरांजली. (त्यांचे एकच भाषण ऐकण्याचा योग आला होता आणि ते चांगलेच प्रभावी होते. चांगले लोक नेहेमीच लवकर का जातात? हा प्रश्न पुन्हा एकदा मनात आल्याशिवाय राहिला नाही!) चतुरंग

प्राजु 03/05/2009 - 16:22
यांची बरीच व्याख्याने इप्रसारणवर ऐकली आहेत. अतिशय रसाळ भाषा, आणि मनाची पकड घेणारी वाणी, यांचं पसायदानवरचं निरूपण अजूनही मनांत घर करून आहे. माझी भावपूर्ण आदरांजली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसुनाना 04/05/2009 - 11:25
अभ्यासू विचारवंत वक्ता हरपल्याने दु:ख झाले. त्यांच्या स्मृतीस माझी विनम्र आदरांजली.

सागर 04/05/2009 - 11:55
माझीही राम शेवाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली खरोखर वक्ता दशसहस्त्रेषु होते राम शेवाळकरजी.... कोणाकडे त्यांच्या व्याख्यानाच्या एमपी थ्री आहेत का? मला एवढ्याच मिळाल्या आहेत : http://www.esnips.com/web/Vyakhyanmala-ProfRamShevalkar - सागर