Skip to main content

काही ग्राफिटीज्

लेखक राज-निती यांनी सोमवार, 23/02/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
ससा 'भित्रा' पण शर्यतीत आरंभ 'शूर'. कधी कधी संशयाची पाल चुकचुकत नाही, तेव्हां जास्तच संशय येतो. 'चिरतारूण्याचे' रहस्य 'म्हातारपणात' असतं.
लेखनविषय:

वाचने 3346
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

In reply to by JayGanesh

जय गणेश, आपला अभिप्राय इतरांपेक्षा वेगळा आहे. पण खरं सांगू का, कुणालाही आपल्या मराठीचं असं 'वेड' लागलेलं केव्हाही चांगलच. त्याच कारण म्हणजे 'शहाण्या' माणसालाच चांगल 'वेड' लागू शकतं.

लई बहारी. मलापण एक सुचलीये, ती अशी : एकत्र नांदलेल्यांचे कालांतराने मार्ग भिन्न होतात - चकणा पोटातच राहतो आणि . . . दारू डोक्यात जाते.

In reply to by दत्ता काळे

झक्कास , चालु द्यात ..! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

डानरावांची सोडून बाकी सगळ्या ग्राफिट्या (बघा शोधला की नाही मराठी शब्द!) आवडल्या. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.