>>" आय्.सी.यु. मधे पॅरॅलीसीस चा ऍटॅक कसा येतो ह्यावर बोलत होती. नशीब, काका झोपले होते.<<
हा हा ..
खरं आहे.. नातेवाईकांना आवरा .. हॉस्पिटलात काय बोलावे, काय करावे याचे अनेकांना भानच नसते.
पेठकरकाकांनी मिपावर त्यांच्या आजारपणाची कथा लिहिली होती त्यात पण असेच काही किस्से होते ते आठवले.
तुम्ही आशिर्वादाचे धनी झालात हे उत्तम.
-- लिखाळ.
प्रभू देवा... आभार! या वेळी कसलेही अनुमान न बंधता सरळ सगळे समले (असा समज आहे).
'गुटका कींग', मगरबाई, 'बायको पीडीत'... अलंकार जबरा वापरलेत.
तुम्ही जी कृती केलीत ती एकदम समयोचित व स्तुत्य. अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकीतल्या वागण्यांसाठी आपला भारतीय समाज हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. पण जस जसे 'बायको पीडीत' क्लब वाढत आहेत तसतसा त्या संस्कृतीचा र्हास होत आहे असे वाटते.
काय हो, त्या अनादी काळात सुद्धा 'बायको पीडीत' क्लब असतील का? का हे आजकल फुटलेले पेव आहे.
आपला,
('बायको पीडीत'क्लबचा सदस्य न व्हावा लागलेला समाधानी) भास्कर
ऑ अवलिया आणि ही समस्या यांचा संबंध काय असवा बॉ?
समस्या ग्रस्त आणि समस्यावरचे उपाय शोधुन देणारे मास्तर यांच्या कडून काहीही उत्तर मिळाले तरी आम्ही ते ग्राह्य समजतो. कसें ? ;)
आपला,
(अवलिया फॅन) भास्कर
"तुमच्या मिसेसना हॉस्पिटल मधे पाठवु नका.त्या परत आल्या तर प्राणिसंरक्षक समितीच्या केस ला सामोरे जायला मी तयार आहे".
=)) ए़केक नमुने... बाकी प्रकटन आवडले.
मास्तरांनी दिलेला समय सुचकता, दक्षता पाळणे ह्या विषयावर दिलेला तास आवडला.
शंकरराव
मास्तर, आपले निरीक्षण बरोबर आहे. आपल्या नातेवाईक रुग्णाला बाहेरची नातेवाईक नसलेली मंडळी मदत करताहेत हे बर्याचदा रुग्णाच्या नात्यातल्या लोकांच्या डोळ्यावर येते. ते स्वतःही फारशी मदत करीत असतीलच असे नाही पण दुसरे कोणी केले की ह्यांचे माथे फिरते! (म्हणूनच त्यांना 'ना त्यातले' म्हणत असावेत का? ;) )
गुटका किंग, मगरबाई ह्या तुमच्या शब्दसंपत्तीला आपला सलाम! ;)
चतुरंग
प्रभू श्टाईल..
मस्त लेख.
आमच्या शेजारी एक काकू होत्या.. त्यांना काही कारणाने ऍडमीट करावे लागले तर..
तिथले डॉक्टर पथ्याची जी काही यादी देत होते त्यात, "नको" चेच प्रमाण ९५ % होते. शेवटी त्यांना आई म्हणाली, "डॉक्टर, काय खायचं तेच फक्त सांगा."
असो... या लेखामुळे हा किस्सा आठवला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
खरंच.. अशा नातेवाईकांना आवरता आले पाहिजे.
आय. सी. यु. मधुन नुकत्याच बाहेर आलेल्या पेशंटला येवून भांडलेले नातेवाईक ऐकिवात आहेत. असल्या लोकांना प्रंग काय आपण बोलतो काय याचे भान कसे नसते कुणास ठाऊक.
अगदी गरजेच्या आणि विश्वास असलेल्या नातेवाईकाला किंवा मित्रालाच मदत करायला सांगावे. बाकीच्यांना भेटायला कधी यायचे ते आम्ही कळवू , तेव्हा या म्हणून सांगावे.
अनामिक
एकदम फंडु !!!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
प्रतिक्रिया
>>" आय्.सी.यु.
एकदम चंपक
प्राणीसंरक्षक
अलंकारिक अनुभव
उत्तर
अवलिया
बापरे! खूप
मित्र
"तुमच्या
हा हा!
खास..
खरंच.. अशा
एकदम फंडु
ओघवता लेख