Skip to main content
लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 29/09/2026 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
अ

 

अपना हात जगन्नाथ

चाकोरीबाहेर जाऊन त्याने गरूड भरारी  घेतली,...

खुप कष्ट उपसले,फलद्रूपही झाले. सर्व काही छान चाललं होतं.

अचानक,साम्राज्यावरचा सुर्य  मावळला. 

बँकेने जप्ती आणली,होत्याचे नव्हते झाले.

सुख के सब साथी..........

रात्रभर झोप नव्हती तरीही सकाळी शांतपणे चहा घेतला.विचार पक्का झाला होता.......

" विठ्ठलपंता सारखा......",

रखुमाई साखरझोपेत होती.....,

एकटाच,डोंगरावर,निर्जन स्थळी  असलेल्या तळ्याकडे निघाला.

पावसाळा नुकताच संपला होता.तळ्यात भरपूर पाणी जमा झाले होते. 

तळ्याच्या  काठावर येवून बसला. ..... 

 नुकताच सुर्य उगवला होता.

खडकावर रानफुले बहरली होती. छोटे छोटे दव बिंदू त्यातून ती परावर्तित किरणे......

तळ्यातली प्रतिबिंबे आणी उठणारे तरंग.......

रानफुलावरं रूंजी घालणाऱ्या मधमाशा .....

मनतल्या गरगरत्या आवर्ता प्रमाणे.......

एकटक नजरेने,कधी तळ्याकडे,कधी खडकाकडे,कधी फुलांकडे तर फुलचूखी मधे मग्न असलेल्या मधुपांकडे भान विसरून बघत होता.......

किती वेळ गेला कळालेच नाही.........

एका मधमाशीने येवून कानात काय सांगीतले माहीत नाही पण...

तळ्यातल्या तरंगा प्रमाणे चेहऱ्यावर तिव्र वेदना  उमटल्या.........

अचानक उठून उभा राहिला.

स्थितप्रज्ञ खडक, क्षणभंगुर आयुष्य असलेली रानफुले आणी फुलांना न दुखावता,अथक गुंजारव करणारे मधुप यांच्याकडे एक कटाक्ष टाकून घरी जाण्यासाठी त्याने पाऊल उचलले.......

ते बघून मधुपांचा गुंजारव आणखीन वाढला.

 

त्यांचा हेतू साध्य  झाला होता.........

अवांतर-:

"मन कशात लागत नाही  

आधार कसा शोधावा 

अज्ञात झऱ्यावर रात्री 

मज ऐकू येतो पावा "

-ग्रेस.

मन मनास  उमगत नाही

आधार कसा शोधावा

स्वप्नातिल पदर धुक्यांचा

हातास कसा लागावा

-सुधीर मोघे.

 

 

हिच ती फुले आणी त्यावर  गुंजारव करणारे मधुप.....

 

 


वाचने 36
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

खूप सुंदर आणि मनाला भिडलं ,

संकटाच्या वेळी माणसाच्या मनात काय वादळ सुरू असतं, हे खूप सहजपणे मांडलं आहे. 

शेवटी मधमाशांचा गुंजारव आणि त्यानंतरचा त्याचा निर्णय मनात बराच वेळ राहतो. 

वाचून नकळत स्वतःच्या आयुष्याकडेही पुन्हा एकदा पाहावंसं वाटतं.

 

पैजारबुवा, 


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद. 

 

मधुपां प्रमाणे माझाही हेतू साध्य झाला.


मुक्तक खूपच आवडले.

 

मन मलाच माझे गवसे,

आधार कशास शोधावा

सोनेरी काठ नभाचा, 

जणू अलगद हाती यावा 🙂


In reply to by श्वेता व्यास

धन्यवाद. 

 

सोळा लाख  इन्फ्लुएन्सर असलेल्या रिळाच्या राणीने जीवन संपवले

 लोकांच्या मनाचा ठाव  घेत असताना स्वताचे मन कुठेतरी हरवून  बसली असावी.

 

स्वसंवाद खुप जरूरी आहे. 

अनुभवाचे बोल.


मी जंगलात  फिरतो तेंव्हा असंख्य गोष्टी दिसतात. बरेच काही सुचवून जातात.निसर्ग  नेहमीच सकारात्मक उर्जा देतो.स्वताशी संवाद  साधायला मदत करतो. 

 

आज फिरताना तळ्याच्याकाठावर उभा होतो तेव्हा रानफुले,खडक,मधमाश्या,कोवळी किरणे बघून हे मुक्तक सुचले.

 

खडककवरची रानफुले पण दरवर्षी दिसतात. कोण बी पेरतो,कोण खतपाणी करतो माहीत नाही पण ठठरलेल्या वेळात ऋतूचक्र चालू असते. 

 

माझे अतिशय आवडते गाणे,मनावर मळभ आले तर नक्कीच दूर करते.अनेक वेळा रडू देखील येते.पण कवीची creativity  रानफुलांनी खोटी ठरवली. मधुकर अरकड यांची रचना आणी अशोक पत्की यांचे संगीत.  ऐकलीच असेल.

 

बिज अंकुरे, अंकुरे

ओल्या मातीच्या कुशीत

कसे रुजावे बियाणे 

माळरानी खडकात

https://youtu.be/JVMfbr7f9Fs?si=3H6jnYt0jh-4zG0Z

 


In reply to by कर्नलतपस्वी

होय,माझेही खुप आवडत गीत आहे.

सुंदर मुक्तक !

त्या तारे जमीन पर ईशान सारखं,एकटंच भल्या पहाटे, सगळं जग साखरझोपेत असताना निघाव .सर्वात आधी निसर्गाची किमया हलकासा सूर्योदय ,दवात भिजलेली पान फुले,अलवार भिरभिरणारा गार वारा,तळ्यातले कोवळे रंग टिपावे..

पहाटे केलेले चिंतन  मनाच्या पटलावरुन कधीच पुसले जात नाही.