Skip to main content

मिसळपाव लेखन सोय - चाचणी

लेखक नीलकांत यांनी रविवार, 19/04/2026 07:09 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार, 

मिसळपावच्या नवीन रूपात संगणकावर मराठी लिहिण्याच्या पध्दतीत थोडा बदल केला आहे. दुर्दैवाने गमभण module स्वरूपात नसल्यामुळे ही नवीन पद्धत बनवावी लागली आहे. आपण या नवीन पद्धतीला लेखनिक असे म्हणतोय. 

तुम्ही ही लेखनिक पध्दत वापरून पाहिली आहे का? लिहीताना काही अडचण येते आहे का? कुठला शब्द लिहिता येत नाहीये. अर्थात येथे लिहिता नाही आला तर इंग्रजीत लिहून सांगू शकता. 

कृपया लिहून बघा. त्रुटी सांगा. त्यावर उपाय करूया आणि ही पद्धत अधिकाधीक सोयिस्कर बनवूया. 

धन्यवाद.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1965
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

तिथे व्यक्त झालेल्या टोकाच्या मतांना किंवा राग, द्वेषाला कुणी फारसे गांभिर्याने घेणार नाही. 

 

मुळात सोमी वर कुणी काय व्यक्त केले याबद्दल आपण जीवाला त्रास करून घ्यायचाच नाही.

भुंकणाऱ्या कुत्र्याचे तोंड बंद करून काहीही निष्पन्न होत नाही.  

त्यात बरीच लोकांना आपल्या बद्दल मत्सर असतो किंवा आपल्या विचारसरणी बद्दल.

यातली एक तरी  गोष्ट तुम्ही बदलणार का?  

नसेल तर कशाला कुणाला भीक घालताय?  


अवांतर :

 

अहो, मोझेस जोनाथन खोंडे, आम्ही ऐकलेलं की ज्यूंनी ख्रिश्चन नावं घेतली आणि लपून राहिले. इथे चक्क एक अँग्लो इंडियन मनुष्य यहुदी नावं घेऊन उघड्यावर वावरतोय. घोर कलियुग म्हणतात ते हेच की काय ! 

 

;-)

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

आता दिसायला हवा. लॉग आऊट आणि लॉग इन किंवा इतर डिव्हाईस वरून किंवा इनकॉग्निटो मोड मधे नव्याने लॉगिन करून पाहा प्लीज एकदा. आणि इथे सांग.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

अद्याप बदल लागू झालेले नाहीत असे दिसते. कोणत्याही विशिष्ट आयडींना ऍक्सेस नाही असे नसून सार्वत्रिक प्रॉब्लेम आहे. वाट पहावी. होईल सर्व नीट.


In reply to by गामा पैलवान

खरडफळ्याचा हा जालनिर्देश असेल : https://www.misalpav.com/guestbook तर प्रवेश प्रतिबंधित सूचना येतेय.

-गा.पै.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला दिसला ना!

 

खरेच दिसला का? नक्की एकदा कन्फर्म करा. लोकांमध्ये उगीच कन्फ्युजन नको.


In reply to by गवि

माफ करा, मला दिसला नाही असे पूर्ण लिहायचे होते पण ना लिहून पोस्ट झाले.