Skip to main content

माहिती हवी आहे

मिसळपाव लेखन सोय - चाचणी

लेखक नीलकांत यांनी रविवार, 19/04/2026 07:09 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार, 

मिसळपावच्या नवीन रूपात संगणकावर मराठी लिहिण्याच्या पध्दतीत थोडा बदल केला आहे. दुर्दैवाने गमभण module स्वरूपात नसल्यामुळे ही नवीन पद्धत बनवावी लागली आहे. आपण या नवीन पद्धतीला लेखनिक असे म्हणतोय. 

तुम्ही ही लेखनिक पध्दत वापरून पाहिली आहे का? लिहीताना काही अडचण येते आहे का? कुठला शब्द लिहिता येत नाहीये. अर्थात येथे लिहिता नाही आला तर इंग्रजीत लिहून सांगू शकता. 

कृपया लिहून बघा. त्रुटी सांगा. त्यावर उपाय करूया आणि ही पद्धत अधिकाधीक सोयिस्कर बनवूया. 

धन्यवाद.

इच्छांचा नियंत्रक कोण?

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 28/11/2025 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
The German philosopher Arthur Schopenhauer said: “Man does at all times only what he wills, and yet he does this necessarily. But this is because he already is what he wills.” — Chapter 5, On the Freedom of the Will Albert Einstein paraphrased Schopenhauer in his essay My View of the World (1931): “A man can do as he will, but not will as he will.” जास्त काही लिहिण्याच्या फंदात पडत नाही कारण मुळातच माहिती हवी आहे म्हणून विचारतो आहे. आता वरील कोट जो आहे तो आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञांनी दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे त्याला थोतांड म्हणणे वगैरे चुकीचे आहे.

आयर्लंड मध्ये कुणी मिपाकर आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 17/12/2024 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, विशेष असे काही नाही. माझ्या सारखेच, माझ्या मुलाच्या पायाला देखील चक्रे आहेत. काही वेळ गेला की मुलगा थोड्या काळासाठी स्थलांतर करतो. पुणे, कोलकाता, नाशिक, पुणे असे स्थलांतर करत करत, सध्या तरी मोठा मुलगा डब्लिन, आयर्लंड इथे आहे. तर, विचारायचे असे होते की, आयर्लंड मध्ये कुणी मिपाकर आहेत का? आपलाच मिपाकर मुवि...

उद्योगासाठी फंड कसा मिळवावा?

लेखक विनिता००२ यांनी सोमवार, 10/08/2020 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आम्ही एक स्पोर्टस व आर्ट्स ट्रेनिंग इंन्स्टीट्युट काढत आहोत. तयारी सुरु झाली आहे. सध्या स्टार्ट अप साठी शासनाच्या काही योजना आहेत असे लक्षात आले. पण नेमके कुठे व कसे अप्रोच करावे ते कळत नाहीये. आमचे प्रोजेक्ट बरेच मोठे असल्याने फंड बराच लागेल. तर... स्टार्ट अप साठी फंड 'शासन किंवा संस्था' यांकडून कसा मिळवता येईल. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद!!

मदत हवी आहे

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 12/03/2018 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
वडीलांना रात्री आरामात गाणी ऐकता यावीत म्हणुन टॅब वर अनेक गाणी भरुन दिली. टॅबची मेमेरी मर्यादित असल्याने एक मोठा संग्रह एस डी कार्डवर चढवला. मात्र टॅबवर निर्माण केलेल्या फोल्डरवर दिसली तरी गाणी प्रत्यक्षात लावता येत नाहीत. हे कशामुळे असावे? जर मेमरी कार्डवर्ची माहिती वापरता येत नसेल तर त्याचा उपयोग काय? टॅब सॅमसंग ए सहा आहे. २) मोबाईलवर अंतर्गत मेमरी व्याप्त होउ नये म्हणून आपण कार्ड वापरतो, पण टिपलेले व्हिडिओ फक्त अंतर्गत मेमरीतच जातात केवळ टिपेलेले फोटो कार्डवर जातात. असे का? हे बदलण्याचा पर्याय सापडला नाही. जाणकारांकडून मदत हवी आहे

म्हणीचा अर्थ व व्युत्पत्ती

लेखक IT hamal यांनी गुरुवार, 09/02/2017 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी म्हणी खरोखरच अगदी थोड्या शब्दांमध्ये मोठा अर्थ सांगून जातात.. बऱ्याच म्हणी आजकाल वापरात नसल्याने ( किंवा इंग्रजीच्या फॅडमुळे वापरायची लाज वाटल्याने लोक त्या वापरायच्या टाळतात म्हणून...) काही वर्षात नामशेष होतील कि काय असे वाटते. आमच्या वेळेस ४ थी च्या स्कॉलरशिप परीक्षेच्या सिलॅबस ला म्हणी होत्या..त्यामुळे बऱ्याच म्हणी पाठ झाल्या व अजूनही त्यांचे अर्थ ही माहीत आहेत. मी कुणाच्या भावना न दुखावता एक शंका विचारू इच्छितो की : "सोनार , शिंपी,कुलकर्णी अप्पा , यांची सांगत नको रे बाप्पा " या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे? आणि ही म्हण कशी तयार झाली असावी?

अभियांत्रिकी पदविका नंतर कोणते कोर्सेस करावे ????

लेखक निलम बुचडे यांनी सोमवार, 22/08/2016 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
मेकॕनिकल इंजीनिअरींग डिप्लोमा पूर्ण केल्यानंतरच्या कोर्सेसची माहिती हवी आहे . कृपया मार्गदर्शन करावे.

महावितरण कंपनीकडुन वीज पुरवठा बंद पडल्यास पेनल्टी कशी मागायची ?

लेखक नितीनचंद्र यांनी बुधवार, 06/04/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ३ एप्रील ला चिंचवड विभागात वीज पुरवठा भर दुपारी खंडीत झाला. सुमारे पाच तास चिंचवड विभागातले ग्राहक हाश्य - हुश करत राहिले. अनेकांनी फोन करुन वीज महावितरण कंपनीकडे किती वेळ लागेल इ. विचारणा केली पण वीज वितरणाचे अधिकारी फोनवर उपलब्ध नव्हते. याची नोंद दि. ४ एप्रीलच्या दैनीक सकाळच्या पिंपरी चिंचवड अवृतीतही घेतली गेली. सामन्यपणे आपला ( ग्राहकाचा ) आवाज वर्तमान पत्रात दिसला या नादात ग्राहक खुष झाले असतील. जर सप्लायचा फ्युज गेला असेल आणि शहरात ४ तासांपेक्षा जास्त काळ वीज बंद असेल तर दर तासाला पन्नास रुपये पेनल्टी ग्राहक मागु शकतो या बाबत मात्र ग्राहक जागरुक नाहीत.

सामाजिक संस्थांबद्दल माहिती हवी आहे .

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 05/04/2016 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
एका माहितीतल्या कुटुंबातील लहान मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . अशा कुठल्या सामाजिक संस्था आहेत ज्या खर्चामध्ये मदत करु शकतात . अशा सामाजिक संस्थांबद्दल माहिती हवी आहे .