काही दिवसांपासून एपिस्टन फाईल्स चर्चेत आहे आणि या संबधित असणारी छायाचित्रे व व्हिडिओने तर समाज माध्यमांवर एकच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये नामांकित व्यक्ती असण्याची चर्चा आजूबाजूला होताना दिसत आहे. जेफ्री एपिस्टन नावाचा कोणी एक धनाढ्य व्यक्ती एका खाजगी बेटावर लहान मुलींची तस्करी करत होता. धनाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलींचे या बेटावर लैंगिक शोषण केले जायचे. ३० लाख कागदपत्रे असलेल्या या फाईलमध्ये समाजातील मान्यवर व्यक्तीची नावे असली तरी ही मंडळी दोषी असल्याचे अजूनतरी सिद्ध झाले नाही. या कागदपत्रांमध्ये ‘cannibalism’ या शब्दाने खळबळ माजवली आहे. Cannibalism म्हणजे स्वजातीचे भक्षण करणे. या प्रकरणातील व्यक्ती नरमांस भक्षण करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे भयानक कृत्य का केले गेले असेल हा प्रश्न राहून राहून सतत मनात येतो. असे करून यातील दोषी व्यक्तींना कोणते सुख मिळाले? खाणे, पिणे आणि शरीरसुख उपभोगणे हेच मानवी सुखाचे टोक आहे का?
अशा घटनांमुळे पाश्चात्यांच्या भोगवादाची परिसीमा लक्षात येते. आणि मनुष्याच्या शाश्वत सुखाची संकल्पना मांडणाऱ्या भारतवर्षामध्ये आपण जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो ! पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना ही इंद्रियसुखावर येऊन थांबते. याउलट भारतीय तत्वचिंतनामध्ये सुख ही संकल्पना केवळ भौतिक किंवा इंद्रियजन्य आनंदापेक्षा आत्मानंदाचा विचार करते. यामध्ये सुखाचा विचार अधिक सूक्ष्म, खोल आणि शाश्वत पातळीवर केला गेला आहे. इंद्रिय सुखापेक्षा आत्मिक सुखावर भारतीय तत्वज्ञान भर देते. आत्मिक सुख म्हणजे आत्मस्वरूपाच्या अनुभूतीतून प्राप्त होणारे सुख. उपनिषदांमध्ये आत्मा हा नित्य, शुद्ध आणि आनंदस्वरूप मानला आहे. जेव्हा मनुष्य देह, मन आणि बुद्धी यांपलीकडे जाऊन आत्मस्वरूपाची ओळख करून घेतो, तेव्हा त्याला आत्मिक सुखाची अनुभूती येते.
‘कोहम्’ (मी कोण आहे?) पासून सुरु झालेला प्रवास ‘सोहम्’ (मी परमात्मा आहे) पाशी येऊन थांबतो. हा प्रवास बाह्य जगातून अंतर्जगाकडे नेणारा आहे. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सुखाची एकेक पातळी मनुष्य गाठत जातो. या सुखाची अनुभूती इंद्रियांनी अनुभवता येत नाही; ती अंतःकरणाच्या शुद्ध अवस्थेत प्रकट होते
भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात..
“सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम्।” म्हणजे मनुष्याचे जे परमसुख आहे ते बुद्धीने जाणता येते, ते इंद्रियांपलीकडचे आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोगाचे सोपान चढून या सुखासनावर मनुष्य बसू शकतो.
कठोपनिषद सांगते —
“श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः।”
(मनुष्यापुढे श्रेयस आणि प्रेयस असे दोन मार्ग असतात.)
प्रेयस म्हणजे इंद्रियसुख; श्रेयस म्हणजे आत्मिक कल्याण व आनंद. आत्मिक सुख हे श्रेयस मार्गाने मिळते. वेदांनुसार अज्ञान हे दुःखाचे मूळ आहे, आणि ज्ञान म्हणजे आत्मिक सुखाचा स्रोत. श्रेयस मार्ग खडतर असला तरी हा मार्ग माणसाला आत्मज्ञानी बनवतो. प्रेयसातच अडकून राहणारे अंतिमतः भोगवादीच बनतात.
ईशावास्य उपनिषद म्हणते
विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥
(जो विद्या व अविद्या दोन्ही जाणतो, तोच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होतो. अविद्येने तो मृत्यूवर विजय प्राप्त करतो तर विद्येने मोक्षपदास जातो.)
येथे अविद्या म्हणजे जीवन व्यवहारासाठी लागणारे भौतिक ज्ञान आणि विद्या म्हणजे आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे आत्मज्ञान. कसे जगायचे याचे उत्तर अविद्या देते. का जगायचे याचे उत्तर विद्या देते. याचा समतोल ज्याला राखता आला त्याला शारीर मर्यादा राहत नाहीत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृती भौतिक सुख नाकारत नाही, तर त्याला मर्यादा घालते. वेद देखील भौतिक सुखाला नाकारत नाहीत, पण ते अपूर्ण आणि क्षणभंगुर असल्याचे स्पष्ट करतात. धर्म, अर्थ, काम, मोक्षादि चार पुरुषार्थांची संकल्पना भोग नाकारत नाहीत तर धर्माच्या चौकटीत राहून मोक्ष पदापर्यंत पोहोचवतात.
भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते . आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात भारतीय तत्वचिंतन अधिकच अर्थपूर्ण ठरते. पाश्चात्य भोगवादाच्या तुलनेत भारतीय त्यागवाद नक्कीच सरस ठरतो. म्हणूनच माणसातील माणूसपण विसरून त्याला परब्रह्मपदावर नेऊन ठेवणारे भारतीय तत्वज्ञान संपूर्ण विश्वास अनुकरणीय आहे! स्वामी दयानंद सरस्वतींनी ‘वेदांकडे चला’ असा संदेश दिला आहे. तो सर्वकाल सुसंगत आहे. आज स्वामीजींची २०२ वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन !
वाचने
5090
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/!\_
पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना
जस्ट क्युरियोसिटी...
In reply to पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना by हणमंतअण्णा शंक…
सोकाजी
In reply to जस्ट क्युरियोसिटी... by सोत्रि
हास्यास्पद प्रतिसाद !
In reply to सोकाजी by हणमंतअण्णा शंक…
कमाल आहे!
In reply to हास्यास्पद प्रतिसाद ! by नागनिका
उत्तम लेख. स्वामी दयानंद
In reply to कमाल आहे! by हणमंतअण्णा शंक…
ख्रिस्ती परंपरा आणि प्राचीन
In reply to सोकाजी by हणमंतअण्णा शंक…
+१११
एपस्टिन फाईल्स
In reply to +१११ by Bhakti
नक्की लिहा
In reply to एपस्टिन फाईल्स by हणमंतअण्णा शंक…
गुन्हेगार
In reply to +१११ by Bhakti
???
In reply to +१११ by Bhakti
अजून एक सांगायचं राहिल.
In reply to +१११ by Bhakti
नाव आले म्हणजे गुन्हेगारच असे नाही.
In reply to अजून एक सांगायचं राहिल. by Bhakti
गार्डियन ने
In reply to नाव आले म्हणजे गुन्हेगारच असे नाही. by हणमंतअण्णा शंक…
तरी मी अजून मोठी नाव लिहायचं
In reply to नाव आले म्हणजे गुन्हेगारच असे नाही. by हणमंतअण्णा शंक…
करोडो लोकांना असल्या म्हणजे
In reply to तरी मी अजून मोठी नाव लिहायचं by Bhakti
+१
In reply to नाव आले म्हणजे गुन्हेगारच असे नाही. by हणमंतअण्णा शंक…
एपस्टिन फाईल्स
In reply to अजून एक सांगायचं राहिल. by Bhakti
नक्कीच सद्सदविवेकबुध्दीवर
In reply to एपस्टिन फाईल्स by चंद्रसूर्यकुमार
त्याला सस्पेशल बधिर ठरवावा...
In reply to नक्कीच सद्सदविवेकबुध्दीवर by Bhakti
वेगळा मुद्दा
In reply to नक्कीच सद्सदविवेकबुध्दीवर by Bhakti
बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना
धर्म हा कुठल्यारती एका
In reply to बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना by विजुभाऊ
😜
- (अधार्मिक) सोकाजीऐहीक भोग
In reply to बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना by विजुभाऊ
"एका बाजूने ते जेमतेम
In reply to ऐहीक भोग by मूकवाचक
मानवीकरण
In reply to "एका बाजूने ते जेमतेम by सुबोध खरे
"समस्या केवळ “कम्युनिझम” या
In reply to मानवीकरण by अभ्या..
गल्लत नाही
In reply to "समस्या केवळ “कम्युनिझम” या by सुबोध खरे
भारतात माओइस्ट लोकांनी कित्येक निरपराध आदिवासींची हत्या अशीच केली आहे आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही.निरपराध आदीवासी दोन्ही बाजूंनी नाडले आणि मारले गेले होते. अनेक आदिवासी भागांमध्ये जमीन, जंगल हक्क, विस्थापन, शोषण यांसारख्या प्रश्नांमुळे असंतोष वाढला. त्या पार्श्वभूमीवर काहींनी माओवादी चळवळीला पाठिंबा दिला. पण त्यामुळे निरपराधांवरील हिंसा योग्य ठरत नाही. पण ह्यातील ज्यांना पश्चाताप व्हायला हवा असे वाटते त्यांना शासन करतानाही कित्येक निरपराध आदीवासींचा बळी गेला आहे. त्याच वेळी, त्या प्रदेशांतील सामाजिक-आर्थिक समस्या आणि राज्याच्या धोरणांचाही विचार करणे आवश्यक ठरते. हिंसा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन कोणत्याही बाजूने झाले तरी त्याचे समर्थन होऊ शकत नाही.काही कम्युनिस्ट राजवटींमध्ये
In reply to गल्लत नाही by अभ्या..
सहमत आहे
In reply to "एका बाजूने ते जेमतेम by सुबोध खरे
अरे वाह !
In reply to "एका बाजूने ते जेमतेम by सुबोध खरे
धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा
In reply to "एका बाजूने ते जेमतेम by सुबोध खरे
धर्मांध लोकांपेक्षा पेक्षा निधर्मांध लोकच जास्त क्रूर असतात असेच इतिहास सांगतो.@सुबोध खरे, आपले विचार, व्यासंग व अनुभव यांचा आदर आहे तथापि, या बाबतीत मी सहमत होण्याइतका माझ्याकडे डेटा नाही. माझ्या समजुतीनुसार एक समाज म्हणून धर्मांध असो वा निधर्मी असो, खरा हिंदू कधीही क्रूर असू शकत नाहीत. हं बाकी, इतर काही पंथीय लोक क्रूरपणाची परिसीमा गाठतात याच्या घटनांनी इतिहासाची पाने भरलेली आहेत.विजुभाऊ, नेमके बोललात.
In reply to बहुतेक धर्म हे ऐहीक भोगांना by विजुभाऊ
Epstein फाईल्स मध्ये नसलेल्या
इथे रेंगाळले अध्यात्म.
रेंगाळू दे की
In reply to इथे रेंगाळले अध्यात्म. by कंजूस
छोटा प्रयोग करा
एकदा खचाखच भरलेल्या
न्याय?
अनेक भारतीय तरुणांशी जेन झी
In reply to न्याय? by स्वधर्म
स्वधर्म,
In reply to न्याय? by स्वधर्म
स्वधर्मजी विस्तृत
In reply to न्याय? by स्वधर्म
उत्तरे नाही मिळाली
In reply to स्वधर्मजी विस्तृत by नागनिका
काही मुद्दे
Markus Gabriel
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to Markus Gabriel by हणमंतअण्णा शंक…
उदाहरणार्थ
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
माय टू सेंट्स...
In reply to उदाहरणार्थ by चंद्रसूर्यकुमार
- The Power of Positive Thinking
- True Joy of Positive Living: An Autobiography
- You Can If You Think You Can
- Positive Thinking Every Day: An Inspiration for Each Day of the Year
- A Guide to Confident Living
- Six Attitudes for Winners
- Confidence
- Reaching Your Potential
नेव्हिल गॉडर्ड यांच्या पुस्तकाची यादी बघितली तर हे स्पष्ट होतं- Your Faith is Your Fortune
- The Power of Awareness
- Feeling Is the Secret
- The Power of Imagination: The Neville Goddard Treasury
- Relax More, Try Less: The Easy Path to Abundance
- The Wealth Mindset: Understanding the Mental Path to Wealth
- Imagination Creates Reality
पण भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनशास्त्रे किंवा तत्वज्ञान, भौतिक पातळीवरच्या (इंद्रियजन्य) आयुष्याच्या पलीकडील सत्याचा उलगडा करून देण्याचा प्रयत्न करतात. ते जे उलगडून सांगतं ते इंद्रियातीत असल्याने निराकार आहे आणि त्याची अनुभूती एक्झॅक्ट शब्दांत पकडण कठीण आहे. त्यामुळे त्याला सगुण साकार रुपात समजावून सांगाण्याचा मार्ग शोधला आणि तिथेच सगळी गडबड झाली. ते सगळं तत्वज्ञान वेगवेगळया ‘स्कूल ऑफ थॉट्स’ मधे विभागलं जाऊन, त्या त्या स्कूल ऑफ थॉट्सच्या शाब्दिक अवडंबरामुळे शब्दबंबाळ होऊन नक्की काय करायचे याचा कसलाही अर्थबोध न होणाऱ्या भाषेत अडकून पडलं. - (चर्चोत्सुक) सोकाजीधन्यवाद
In reply to माय टू सेंट्स... by सोत्रि
मस्त चर्चा होतेय!
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
वेन डायर
In reply to मस्त चर्चा होतेय! by सोत्रि
ख्रिस्ती धर्मतत्वज्ञान पहिले
In reply to वेन डायर by चंद्रसूर्यकुमार
काही उदाहरणे द्याल का
In reply to ख्रिस्ती धर्मतत्वज्ञान पहिले by कॉमी
Natural Language Processing का दुसरे काही?
In reply to मस्त चर्चा होतेय! by सोत्रि
अष्टावक्र
In reply to मस्त चर्चा होतेय! by सोत्रि
अष्टावक्र
In reply to मस्त चर्चा होतेय! by सोत्रि
अष्टावक्र गीता
In reply to मस्त चर्चा होतेय! by सोत्रि
अष्टावक्र गीता
In reply to मस्त चर्चा होतेय! by सोत्रि
अष्टावक्र गीता
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
अष्टावक्र गीता
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
सर्वपल्ली राधाकृष्णन
चंसुकु,
In reply to सर्वपल्ली राधाकृष्णन by चंद्रसूर्यकुमार
वाट बघत आहे
In reply to चंसुकु, by सोत्रि
एखाद्या तत्वज्ञानाचा अभ्यास
In reply to वाट बघत आहे by चंद्रसूर्यकुमार
फरक
In reply to एखाद्या तत्वज्ञानाचा अभ्यास by अप्पा जोगळेकर
मातीचेच पाय
In reply to सर्वपल्ली राधाकृष्णन by चंद्रसूर्यकुमार
अष्टवक्र गीता
अष्टवक्र गीता