कल्पकतेची ऐशीतैशी
लेखनप्रकार
कल्पकतेची ऐशीतैशी
===========
सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत. त्याला संबंधितांकडून प्रतिसाद मिळत आहेच, पण या सर्वाच्या मुळाच्या असलेल्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करायची गरज निर्माण झाली.
आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्या राजकीय नेत्यांची कमी नाही.
आपले खरे दुखणे कशात आहे, याचा जर थंड डोक्याने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर जे सत्य गवसते त्यामुळे रक्त उकळायला लागते.
काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा मी फोटोग्राफी करत असे. माझ्या फोटोग्राफीची नजर विकसित होण्यासाठी मी जगभर फोटोग्राफीमध्ये काय चालते याचा अभ्यास करत असे.
तर सांगत काय होतो, की मी माझ्या आजीला तिच्या शेवटच्या दिवसात भेटायला नाशिकला गेलो होतो. माझ्या आजीचा मुक्काम माझ्या मावशीकडे होता. जाताना मी माझा कॅमेरा बरोबर नेला होता. आजीला नमस्कार करून निघताना फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढला, तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की "आजारी माणसांचे फोटो काढत नसतात!"
या दोन मावशांनी आयुष्यात कॅमेरा हातात धरणं सोडा पण आयुष्यात कसलाही पराक्रम केलेला नाही, पण फोटो कशाचे काढावेत आणि नाहीत याबद्दल मात्र त्यांची ठाम मते होती. आणि मी त्यांचे ऐकले पाहिजे हा त्यांचा चमत्कारिक आग्रह मात्र अनाकलनीय होता.
भारतात कल्पकता रूजणं शक्य नाही याची कारणे वरील (प्रातिनिधिक) प्रसंगात द्डलेली आहेत. समाजातले अडाणी आणि निर्बुद्ध लोक (विशेषत: संस्कृतीरक्षक) जेव्हा कला, सर्जनशीलता यांची व्याख्या करायला लागतात तेव्हा त्या समाजात कल्पकता कधीच विकसित नाही.
आज ए०आय० अवतरल्यानंतर ट्रंप,पुतीन आणि पोप यासारख्या सारख्या जागतिक नेत्यांची यथेच्छ टिंगलटवाळी ए०आय० ने तयार केलेल्या चित्राद्वारे चालू आहे. पण यामुळे एकही जण कोर्टकचेर्यांची वारी करताना दिसत नाही. पण फक्त भारतात विडंबन हा गुन्हा ठरू शकतो. कुठेतरी असे वाचले आहे की ख्रिश्चन धर्म सर्वात टिंगलटवाळी झालेला धर्म आहे.
कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही.
मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?
वाचने
13201
वाचनखूण
प्रतिक्रिया
96
In reply to तेच तेच प्रतिसाद प्रत्येक by सुबोध खरे
तेच तेच प्रतिसाद प्रत्येक
मुद्दा कल्पकते बद्दलचा आहे.
नाविक जीपीएस प्रणालीला किरकोळ
बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं
बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतातबाडिस. धागाकर्ता शेणाची टोपली कल्पकतेच्या फडक्याखाली झाकून घेऊन आला. परंतु टोपलीतल्या शेणाने स्वत:चेच तोंड माखले गेल्यानंतर "मी आता परत येथे लिहिणार नाही" असे सांगून पळ काढला. परंतु पुन्हा एकदा एक नवीन शेणाची टोपली घेऊन परत आला आणि पुन्हा एकदा शेणाने तोंड माखून घेतले. परंतु तरीही अक्कल आली नाही.कोण म्हणतो भारतात कल्पकता
कल्पकता आणि भारतीय संस्कृती