Skip to main content

कल्पकतेची ऐशीतैशी

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 09/04/2025 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पकतेची ऐशीतैशी =========== सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत. त्याला संबंधितांकडून प्रतिसाद मिळत आहेच, पण या सर्वाच्या मुळाच्या असलेल्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करायची गरज निर्माण झाली. आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्‍या राजकीय नेत्यांची कमी नाही. आपले खरे दुखणे कशात आहे, याचा जर थंड डोक्याने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर जे सत्य गवसते त्यामुळे रक्त उकळायला लागते. काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा मी फोटोग्राफी करत असे. माझ्या फोटोग्राफीची नजर विकसित होण्यासाठी मी जगभर फोटोग्राफीमध्ये काय चालते याचा अभ्यास करत असे. तर सांगत काय होतो, की मी माझ्या आजीला तिच्या शेवटच्या दिवसात भेटायला नाशिकला गेलो होतो. माझ्या आजीचा मुक्काम माझ्या मावशीकडे होता. जाताना मी माझा कॅमेरा बरोबर नेला होता. आजीला नमस्कार करून निघताना फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढला, तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की "आजारी माणसांचे फोटो काढत नसतात!" या दोन मावशांनी आयुष्यात कॅमेरा हातात धरणं सोडा पण आयुष्यात कसलाही पराक्रम केलेला नाही, पण फोटो कशाचे काढावेत आणि नाहीत याबद्दल मात्र त्यांची ठाम मते होती. आणि मी त्यांचे ऐकले पाहिजे हा त्यांचा चमत्कारिक आग्रह मात्र अनाकलनीय होता. भारतात कल्पकता रूजणं शक्य नाही याची कारणे वरील (प्रातिनिधिक) प्रसंगात द्डलेली आहेत. समाजातले अडाणी आणि निर्बुद्ध लोक (विशेषत: संस्कृतीरक्षक) जेव्हा कला, सर्जनशीलता यांची व्याख्या करायला लागतात तेव्हा त्या समाजात कल्पकता कधीच विकसित नाही. आज ए०आय० अवतरल्यानंतर ट्रंप,पुतीन आणि पोप यासारख्या सारख्या जागतिक नेत्यांची यथेच्छ टिंगलटवाळी ए०आय० ने तयार केलेल्या चित्राद्वारे चालू आहे. पण यामुळे एकही जण कोर्टकचेर्‍यांची वारी करताना दिसत नाही. पण फक्त भारतात विडंबन हा गुन्हा ठरू शकतो. कुठेतरी असे वाचले आहे की ख्रिश्चन धर्म सर्वात टिंगलटवाळी झालेला धर्म आहे. कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही. मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्‍या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13300
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

मी आज्जीला सांभाळतो पण एखादा फोटो आता घेऊद्या अशी विनंती बथ्थड डोक्याच्या मावशांकडे केली असती तर कदाचित काढून दिला असता.पण त्या बथ्थड डोक्याच्या मावशाना वाटलं असेल हा उंटावरून शेळ्या हाकतोय.

काल परवाच “अरेबियाचा लॉरेन्स” (lawrence of arabia) हा १९६२ सालचा अतिशय सुंदर सिनेमा पाहिला! त्यात एका टोळीचा प्रमुख अमेरिकन छायाचित्रकाराला नेहमी तलवार दाखवून म्हणतो फोटो नाही फोटो नाही! :)

काय ठरलं मग शेवटी? ज्या देशातील स्टॉक मार्केटातून धागाकर्ते पैसे कमावतात तो भारत हा जगातला सर्वाधिक कल्पनादरिद्री देश आहे की नाही? बरं, कल्पनापूर्ण देश कोणता? समाजवादी वेनेझुएला?

In reply to by वामन देशमुख

तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहे आणि इथे "उजवी बुरशी" ए० आय० सुरूवातीच्या मर्यांदावर अजून आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करते आहे. ए० आय० चे नवनवे अवतात काय करू शकतात हे त्यांच्या बौद्धिक क्षमते पलिकड्चे आहे! लवकर शहाणे व्हा! नुकत्याच एका पाहणीत असे सध्या अस्तित्वात असलेले जवळ्जवळ सर्व ए०आय० "डावीकडे" झुकलेले आहेत असे लक्षात आले आहे. भारताचा ए० आय० (जेव्हाकेव्हा येईल तेव्हा) उजवी कडे झुकलेला असेल का, याची मला उत्सूकता आहेच.

In reply to by युयुत्सु

एकंदरीत भारतातील परिस्तिथी बघता... भारतात स्वतःचा 'ए आय' निर्माण होईल याची शक्यता मला कमी वाटते ... "ए आय" व्हावा अशी इच्छाशक्ती दिसत नाही ... आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक संस्था किंवा त्यांचे आज मिळणारे संचित , यावरच "मिरवणं" चालू राहील...

In reply to by आंद्रे वडापाव

भारत सरकारचा भर ए आय तयार करण्यापेक्षा अंधभक्त तयार करण्यावर जास्त आहे.

In reply to by युयुत्सु

तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहे आणि आपल्याकडे वयाच्या ६ व्या वर्षापासून निरूपयोगी हिंदी भाषा सक्तीने शिकण्याचे फर्मान काढले आहे.

कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या भारताने UPI हि प्रणाली विकसित करून व्यवस्थित पणे त्याचा विस्तार करून जगभरात अग्रभागी नाव कमावलं. पण चिदंबरम साहेबांच्या ओंजळीने पाणी पिणारे लोक अशा एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणून निरगाठ बांधून बसले आहेत. त्यांना कोण समजावणार?. अशा अनेक गोष्टी आहेत. नाविक हि जी पी एस प्रणाली काली म्हणजे KILO AMPERE LINEAR INJECTOR Directed-Energy Weapons DAPO धीरूभाई अंबानी पायोनियर ऑफर. हि गोष्ट अनेकांच्या विस्मरणात गेली असेल. पण ३५० रुपये महिना तीन वर्षा साठी ज्यात १० पैशात १५ सेकंद टॉक टाइम आणि भ्रमणध्वनी फुकट अशा या योजने मुळे तळागाळातील लोकांच्या हातात सुद्धा भ्रमणध्वनी आला हि वस्तुस्थिती डोळ्याआड करता येणार नाही. आणि त्यामुळे भारतात मोबाईल क्रांती आली.आज भारतात साधारण ८५ % लोकांकडे भ्रमणध्वनी आहे. दरडोई उत्पन्नाशी तुलना केल्यास हा एक चमत्कारापेक्षा कमी नाही. आज रिलायन्स जियोने फुकट विश्वचषकाचे प्रसारण करून बाकी सर्व स्टार सोनी सारख्या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांचे धाबे दणाणले. यात कल्पकता नाही असे म्हणणाऱ्यांची किंवा करावी तितकी थोडी आहे. जिओ आणि एअरटेल यांनी वायर आणि फिक्स्ड वायर लेस क्रांती आणून जगभरात सर्वात स्वस्त डेटा उपलब्ध करून दिला आहे भारतात कल्पकता नाही म्हणणारे त्यावरच असे लेख पाडण्याचे काम करत आहेत Mobile data in India is the third cheapest in the world. बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात ( शारीरिक बद्धकोष्ठता मध्ये पोटात वात फिरतो तसेच )

ज्या लोकांचा ऊर किरकोळ अचिव्हमेंण्टने भरून येतो त्यांनी खालील क्लीप बघावी आणी "टेंपल इकॉनॉमी" आणि "पेटंट इकॉनॉमी" यावर मनन चिंतन करावे. https://www.youtube.com/watch?v=JMHuVIE4Jk8

In reply to by युयुत्सु

आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक संस्था किंवा त्यांचे आज मिळणारे संचित , यावरच आजचे "मिरवणं" चालू राहील...

In reply to by युयुत्सु

असं कसं? गटारातून गॅस नळीने काढून स्टोव्ह पेटवून चहा बनवून विक्री करणे, ट्यूबमध्ये गॅस नेऊन शेतातील पंप चालवणे अशा कल्पक शोधांचे जनक पेटंट घेत नाही हा त्यांचा मोठेपणा आहे. "वसुधैव कुटुंबकम" हेच त्यांचे एकमेव पेटंट!

In reply to by आग्या१९९०

तेच तेच प्रतिसाद प्रत्येक लेखात आणणे हे हि वैचारिक बद्धकोष्ठाचेच लक्षण आहे. बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात

In reply to by सुबोध खरे

तेच तेच प्रतिसाद प्रत्येक लेखात आणणे हे हि वैचारिक बद्धकोष्ठाचेच लक्षण आहे. तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही त्याचे पालन करण्यात कुठलीही कसर ठेवत नाहीत हे जाणवते.

नाविक जीपीएस प्रणालीला किरकोळ म्हणण्यासाठी आपल्या बुद्धीची कीव करावी का हा प्रश्न आहे. नीट पणे वाचून पहा त्याची गरज भारताला का झाली ते

बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात बाडिस. धागाकर्ता शेणाची टोपली कल्पकतेच्या फडक्याखाली झाकून घेऊन आला. परंतु टोपलीतल्या शेणाने स्वत:चेच तोंड माखले गेल्यानंतर "मी आता परत येथे लिहिणार नाही" असे सांगून पळ काढला. परंतु पुन्हा एकदा एक नवीन शेणाची टोपली घेऊन परत आला आणि पुन्हा एकदा शेणाने तोंड माखून घेतले. परंतु तरीही अक्कल आली नाही.

सनातन भारतीय संस्कृतीत १४ विद्या आणि ६४ कलांना सन्मानाचे स्थान आहे. देवदेवतांच्या सगुण रूपाला डमरू, बासरी, वीणा, मोरपीस या शिवाय पूर्णत्व येत नाही. प्रार्थनास्थळे देखील स्थापत्यशास्त्रातील बेजोड कलाकृतीच आहेत. अन्नब्रह्म ते नादब्रह्म अशा संकल्पना नवीन नाहीत- एखादी उत्तम जमलेली पाककृती ते जमून आलेली मैफिल अशा नानाविध कलात्मक अविष्कारातून आणि आस्वादातून ब्रह्मानंदाची अंशत: का असेना अनुभूती येऊ शकते याचा सहर्ष स्वीकार मूळ संस्कृतीतच आहे. असो.