शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १
लेखनप्रकार
शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १
नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांवर आधारित सादर केलेले लेखन मिपावरील वाचकांनी वाचले आहे. त्यावरील सूचना, मार्गदर्शनातून नंतरच्या काळात ईपुस्तके बनवायला प्रेरणा मिळाली.
भारतीय नौसेनेचे स्वप्न दृष्टा म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव होतो. आपण अनुभवातून अनेक गोष्टी शिकतो. शिवाजी महाराजांना आपले नाविकदल कसे असावे जल दुर्गांचे महत्व काय किनाऱ्यावर राहून, म्हावरे पकडून उपजीविका करणाऱ्या सामान्य जनतेचे खडतर जीवन कसे असते अशा लोकांना मासेमारी करताना, मिठागरातील लवण उद्योग निर्धोकपणे करता यावा. भात शेती, अंबा, रातांबा, फणस, पोफळी, नारळ, ताड, वनौषधी, देशावर पाठवून कोकणात शांततामय जीवन जगता यावे. कोकणी माणसांच्या भाव विश्वात सागराला देवता मानायची संकल्पना असते. त्यांच्या वार्षिक सणाला, देवी यात्रांना जायला यायला सोई करणे वगैरे ही राज्यकर्ता म्हणून जबाबदारीची जाणीव बिंबली. विदेशी दर्यावर्दी लांबून येऊन अरबी सागरावर आपला हक्क सांगतात. मोठ्या जमिनी बळकावतात. आपला धर्म प्रचार करायला चर्च, मशीद बांधतात. गरिबीने पोळलेले सिद्दी व अन्य देशीय गुलाम म्हणून विकले जातात. चाचेगिरी करून बोटी लुटायचे साहस करतात. या वर उपाय योजना करायला हवी. बोटी बांधायला गोद्या, माल धक्के, माल वाहायला शिकवून तयार केलेली जनावरे पैदास केंद्रे, यासाठी अरबी लोकांकडून शिकायची सोय करायला हवी याचे भान त्यांना आले. यासर्वाचा आढावा त्यांना बसरूरच्या नौकानयनातील अनुभवातून आला असावा अशी संकल्पना घेऊन मांडणी केली आहे.
पुढील भागात
भीमगडावरील वास्तव्यातील विचारनधन
मुगल व मराठा सैन्याची तैनाती
वेंगुर्ला, कुडाळची लढाई, खवासखानाची पळापळ, मुधोळकर बाजी घोरपड्यांचा बंदोबस्त
वाचने
3710
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सुंदर.
मेहनती व व्यासंगी लेख
नेहमीप्रमाणेच शोधपुर्ण
In reply to नेहमीप्रमाणेच शोधपुर्ण by कर्नलतपस्वी
पुलेशु
सुन्दर
संकल्पना आकारू लागल्या... याच भागात राजधानी बनली पाहिजे...
बोटिवर शिजवलेले भात आणी सागूची नवी चव
सागू, सागूळ
मस्तच.
अतिशय उत्तम मांडणी !
हा इतिहास फारसा माहीत नाहीये,
In reply to हा इतिहास फारसा माहीत नाहीये, by प्रचेतस
+१
उत्तम मांडणी जमलेली आहे.
महाराजांच्या कडे कोणकोणत्या
In reply to महाराजांच्या कडे कोणकोणत्या by विजुभाऊ
किती, कोणत्या प्रकारची जहाजे या मोहिमेत होती यावर प्रकाश टाकावा.