ब्रेन इन अ व्हॅट!
क्वांटम फिजिक्सशी किंवा आईनस्टाईनशी थोडा परिचय असेल तर “थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय प्रकार आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. किमान “स्क्रोडिंजरचे मांजर” तरी माहित असणारच. “थॉट एक्स्पेरीमेंट” म्हणजे कल्पनेची उत्तुंग भरारी. कित्येक गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात अनुभवता येत नाहीत त्याबद्दल “खयालोमे” विचार करायचा. अशा कल्पनेच्या भरारीतून आपल्याला सिद्धांतांचे पुष्टीकारण मिळू शकते. “थॉट एक्स्पेरीमेंट” हे फक्त विज्ञानापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा तत्त्वज्ञानातही सढळ वापर केला गेला आहे. उदाहरणार्थ देकार्तचा राक्षस- Descartes Evil Demon. किंवा प्लाटोचा “गुहेतील कैदी” दृष्टांत! ह्यांचा आधुनिक अवतार आहे “ब्रेन इन अ व्हॅट!”
कल्पना करा कि एखाद्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाने (किंवा अतिप्रगत परग्रह वासियांनी) तुमचा मेंदू तुमच्या कवटीतून काढून फिश बाउल मध्ये ठेवला आहे. ह्या भांड्यात मेंदूचे पोषण करणारा द्रव आहे. तो मेंदूला जिवंत ठेवतो. ह्या मेंदूचा मज्जा रज्जुशी संबंध तुटला आहे. त्या ऐवजी मेंदू तारांच्या सहाय्याने सुपर संगणकाशी जोडला गेला आहे.
आपल्याला संवेदना कशा होतात? आपल्या ज्ञानेंद्रियांकडून मेंदूला विद्युत संदेश पाठवले जातात. आपण चुकून एखाद्या गरम भांड्याला बोटाने स्पर्श केला तर बसलेल्या चटक्याचे विद्युत संदेशांत रुपांतर होते आणि हा संदेश मज्जा तंतुतून मज्जारज्जुतून मेदुला पोहोचवला जातो. मेंदू तत्काळ हात बाजूला घेण्याचा संदेश हाताच्या बोटाच्या स्नायूंना देतो.
समजा आपण संगणकाकडून “चटक्याचा” संदेश ह्या व्हॅट मधल्या एकाकी मेंदूला दिला तर त्या मेंदूची अशी कल्पना होईल कि आपण शरीरातच आहोत. आणि रोजचे जीवन जगत आहोत. शास्त्रज्ञ अशा एकाकी मेंदूबरोबर काहीही खेळ खेळू शकतील.
समजा हा प्रयोग पुणे विद्यापिठातल्या न्युरोलोजीच्या प्रयोगशाळेत चालला आहे. पण मेंदूला वाटतंय कि आपण मित्रांबरोबर वैशालीत गप्पागोष्टी करत इडली वड्यावर ताव मारत आहोत. किंवा मुंबईत मरीन ड्राईववर मैत्रिणी बरोबर हवा खात आहोत. इथच थांबू नका. आपण चंद्रावर, मंगळ ग्रहावर आहोत.
मनुष्याच्या कल्पना शक्तीला अंत नाही.
हे वाचताना तुम्हाला एलओएल होत असणार, तुम्ही म्हणत असणार ह्याची आता सटकली आहे. मला कल्पना आहे. पण ही हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाहीये.
तत्त्वज्ञानातील हा हॉट टॉपिक सुरु झाला रेने देकार्त पासून. (René Descartes in 1641 in the Meditations on First Philosophy,) त्याचे म्हणणे होते कि आपल्याला पंचेंदिरीयांतून जे ज्ञान प्राप्त होते ते खरे आहे कि तो निव्वळ भ्रम आहे. त्यतून ते सुप्रसिद्ध वाक्य आले, ‘Cogito, ergo sum’ (‘I think, therefore I am’).
१९७३ मध्ये गिल्बर्ट हार्मन ह्याला आधुनिक स्वरून दिले.आणि १९८१ साली हिलरी पुटनामने त्याच्यावर अधिक काम केले. BIV म्हणजे ब्रेन इन अ व्हॅट चा कंसेप्ट ह्या दोघानीच पुढे आणला.
मग आपण BIV मध्ये आहोत कि नाही? हे कसे सिद्ध करायचे? ह्यावर बरीच तात्विक चर्चा झाली आहे. ती केवळ ज्यांनी त्या विषयाचा कसून अभ्यास केला आहे त्यांनाच समजावी अशी आहे. अजून डोक्याला शॉट लावून घेण्यात अर्थ नाही.
विज्ञानकथा लेखकांची मात्र चंगळ झाली. ही कल्पना वापरून अनेक कथा लिहिल्या गेल्या. अनेक सिनेमे बनवले गेले. त्यांची यादी आपल्याला विकिवर मिळेल. (https://en.wikipedia.org/wiki/Brain_in_a_vat)
आपले कितीतरी आवडीचे सिनेमे ह्यात आहेत. ह्यात प्रमुख म्हणजे “द मॅट्रिक्स” ह्या सेरीज मधील तीन सिनेमे.
ह्या यादीतील मला आवडलेला म्हणजे “डोनोवान’स ब्रेन” ही कथा १९४२ साली लिहिण्यात आली. त्यावर आधारित एकूण तीन पिक्चर आले.
The Lady and the Monster (1944), Donovan's Brain (1953), and The Brain (1962). ह्या पैकी दोन The Lady and the Monster (1944), and The Brain आपण यू ट्युब वर बघू शकता. वेळ असेल तर अवश्य पहा.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11731
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिषय उत्तम लेख !
प्रगो
नवीन
मी असंच वायरिंगच पुस्तक
भक्ती तुम्ही मी वर उल्लेख
In reply to मी असंच वायरिंगच पुस्तक by Bhakti
@भक्ती,झाडांनापण मेंदू असतो? पण तो दिसत नाही?पण तो विद्युत लहरी
In reply to मी असंच वायरिंगच पुस्तक by Bhakti
फायकस मोरेसी जातीच्या झाडांचं
In reply to @भक्ती,झाडांनापण मेंदू असतो? पण तो दिसत नाही?पण तो विद्युत लहरी by कर्नलतपस्वी
,@भक्ती
In reply to फायकस मोरेसी जातीच्या झाडांचं by Bhakti
@भक्ती-अंतरजालावर काही पुस्तके चकटफू आहेत.
In reply to ,@भक्ती by कर्नलतपस्वी
नारायण धारप यांच्या सर्व भयकथा रुपये तीन हजारात उपलब्ध आहेत....
In reply to ,@भक्ती by कर्नलतपस्वी
https://bookvishwa.com
In reply to नारायण धारप यांच्या सर्व भयकथा रुपये तीन हजारात उपलब्ध आहेत.... by शैलेश लांजेकर
बाकी आता झाडांच्या मुळाची
against
In reply to बाकी आता झाडांच्या मुळाची by Bhakti
"थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय
प्रथम आभार मानतो.
In reply to "थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय by टर्मीनेटर
हा काटेरी प्रतिसाद खूप भावला
In reply to प्रथम आभार मानतो. by भागो
मागे एकदा इथल्याच एका सिनिअर
In reply to हा काटेरी प्रतिसाद खूप भावला by टर्मीनेटर
तिच्या आयला,च्यायला मायला
In reply to मागे एकदा इथल्याच एका सिनिअर by भागो
आहा! मी सांगतो काय करायचे ते
In reply to तिच्या आयला,च्यायला मायला by टर्मीनेटर
Lol… हा उपाय ऐकण्या साठीच
In reply to आहा! मी सांगतो काय करायचे ते by भागो
कंट्रोल भागो कंट्रोल.
ओके सर.
In reply to कंट्रोल भागो कंट्रोल. by कर्नलतपस्वी
कुणीतरी माघार घ्यायलाच पाहिजे
In reply to ओके सर. by भागो
एक तर मान्य कराल...
मिपा एक मधुशाला आहे.
बीआयव्ही) हा विचार एकतर खोटा
माझ्या वैयक्तीक मते ते इथे रहावेत असे वाटते!
In reply to बीआयव्ही) हा विचार एकतर खोटा by टर्मीनेटर
@भागो
त्यांनी जरूर लिहावे, वाचायला
In reply to @भागो by कर्नलतपस्वी
(अवांतर0
कॉलिंग कॉमी,
In reply to (अवांतर0 by भागो
कोणासाठी लिहिलंय हे?
In reply to (अवांतर0 by भागो
एकूण असा प्रॉब्लेम आहे तर!
अहो तुम्ही लिखाणावर लक्ष
In reply to एकूण असा प्रॉब्लेम आहे तर! by भागो
आभार गवि.
In reply to अहो तुम्ही लिखाणावर लक्ष by गवि
अवांतर : काय डिझाईन केले ....
In reply to आभार गवि. by भागो
प्लांट ऑपरेशन आणि इलेक्ट्रिकल
In reply to अवांतर : काय डिझाईन केले .... by नठ्यारा
धन्यवाद .... !
In reply to प्लांट ऑपरेशन आणि इलेक्ट्रिकल by भागो
आणि आज इथे माझे "inquisition"
In reply to आभार गवि. by भागो
येऊ द्या.
In reply to आभार गवि. by भागो
आभार.
In reply to येऊ द्या. by कंजूस
खरंय.
In reply to आभार. by भागो
"फँटम पेन" प्रकार माहीती आहे का?
पेनचा अनुभव दातांची कवळी
In reply to "फँटम पेन" प्रकार माहीती आहे का? by मिसळपाव
अवयव कापला किंवा काढला तरच हा
In reply to पेनचा अनुभव दातांची कवळी by कंजूस
हा प्रकार मी प्रथम आर्थर
In reply to अवयव कापला किंवा काढला तरच हा by गवि
ओह हे नव्हतं माहीती
In reply to अवयव कापला किंवा काढला तरच हा by गवि
पेनचा अनुभव दातांची कवळी
In reply to पेनचा अनुभव दातांची कवळी by कंजूस
वाचतोय.
कभी निरज का दिन तो कभी अरशद का....
आता चेक केले तर तो "आयडी"
In reply to कभी निरज का दिन तो कभी अरशद का.... by कर्नलतपस्वी
कुठला आय डी खारीज झाला?
In reply to आता चेक केले तर तो "आयडी" by भागो
सखाराम गटाणे होतोय का....
आता मोठा मेंदू {माणसाचा}
मराठीतून लिहिलेले सुकर वाटतं