✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भयकथा आणि वातावरण निर्मिती

व
व्यंकु यांनी
Wed, 12/17/2008 - 22:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5111 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

प
प्रियाली Wed, 12/17/2008 - 23:13 नवीन

वातावरण निर्मिती

वातावरण निर्मिती भयकथेचा मोठा भाग व्यापते. बरेचदा मूळ कथाबीज दमदार नसले तरीही वातावरण निर्मिती त्या कथेत अपेक्षित रंग भरून कथा उठावदार करते. परंतु भीती दाखवण्यासाठी रात्र, अमावास्या, वटवाघुळे यांचीच गरज असते असे नाही. एखादा साधा प्रसंग, ठिकाणही भीती घालू शकते. खालचा किस्सा इंश्टंट आहे, फारसा जमला नसावा पण भर दिवसाचे वातावरण आहे. सूर्य डोक्यावर आला आहे. एसटी खडखडत थांबते आणि मी खाली उतरतो. उन्हाचा झोत गपकन डोळ्यात जातो आणि क्षणभर अंधारी येते. धुळीचा लोट उडवत एसटी निघून गेली तरी मी तिथेच उभी असतो. थोडंसं पाणी हवं होतं. आजूबाजूला नजर टाकली तर सर्वत्र शुष्क माळ पसरला दिसतो. चिटपाखरू नजरेस पडत नाही. सुकलेला, उजाड माळ नुसता. माणसं याच्या वाटेलाही फिरकत नसावीत. उन्हाच्या गरम झळा बसतात. माझ्या घशाला कोरड पडते..पाणी. दूरवर एक झाड स्तब्ध उभं असतं. नरक कसा दिसत असेल? या माळापेक्षा वेगळा तर नसेलच. डोळे किलकिले करून मी झाडापलीकडे बघायचा प्रयत्न करतो. झाडापलीकडे माळावर मृगजळ पसरलं आहे. पाणी... पाणी तोंडात घेतल्याशिवाय या काहिलीतून सुटका नाही. त्या मृगजळात एक आकृती वाकून काहीतरी करताना दिसल्यासारखं वाटतं. पाणी... पाणी मागायला हवं, तिथे जे कोणी आहे त्याच्याकडून. त्या आकृतीच्या दिशेने मी चटचट पाऊले उचलतो. अंगाची काहिली होते आहे. घामाच्या धारा वहात आहेत पण तोंड साफ सुकलं आहे. आता ती आकृती स्पष्ट दिसू लागते. म्हातारा आहे, त्याच्या कामात मग्न. लाकडाचा ढिग रचतो आहे. मी जवळ जवळ धावतच त्याच्याकडे जातो आणि धापा टाकत विचारतो - "बाबा पाणी मिळेल का हो? तहानला आहे जीव पाण्यावाचून." म्हातारा मागे वळतो आणि निरागस हसतो. "हो रे बाळा, तुझ्या तोंडात पाणी घातल्याशिवाय पुण्य नाही लागणार. सकाळपासून कामाला लागलो तेव्हा तुझ्यासाठी चिता रचून झाली. तुझ्या तोंडात पाणी घालायला घेऊन येतोच मी." मी लाकडांच्या ढिगार्‍याकडे निरखून बघतो. माझं अचेतन शरीर त्यावर पहुडलेलं असतं.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 12/17/2008 - 23:16 नवीन

मस्तच ....

स्सह्ही गं प्रियालीताई ...
"हो रे बाळा, तुझ्या तोंडात पाणी घातल्याशिवाय पुण्य नाही लागणार. सकाळपासून कामाला लागलो तेव्हा तुझ्यासाठी चिता रचून झाली. तुझ्या तोंडात पाणी घालायला घेऊन येतोच मी."
आज खुप दिवसांनी भितीचा तडाखा, ह्यावेळी अंगाला दरदरुन घाम सुटला नस्सला तरी "सरसरुन काटा" मात्र नक्कीच आला ... ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
अ
अवलिया Wed, 12/17/2008 - 23:36 नवीन

प्रियालीत

प्रियालीताईंनी प्रतिसाद टाकला आहे असे कोणीतरी तिकडे म्हणाले आणि मी आधीच घाबरलो. प्रियाली नाव हजर सभासदांमधे नाही ही खात्री झाल्यावरच लेख उघडला.. हो पटकन येवुन भोः केले तर काय ? लेख आणी परतिसाद लय भारी -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ध
धमाल मुलगा गुरुवार, 12/18/2008 - 10:58 नवीन

लय भारी!

घे व्यंक्या, तुला गायडन्ससाठी दस्तुरखुद्द भयालीदेवी जातीनं हजर! येड्या, अजुन काय पाहिजे? रिक्षावाल्याची श्टोरी अजुन खुलव...वरचा प्रियालीतैचा प्रतिसाद अभ्यासुन तुझ्या गोष्टीत काही बदल करता येत अस्तील तर पहा...होऊन जाऊदे अजुनएक भ्याव-दाखवी गोष्ट :) प्रियालीतै, ही गोष्ट पण लय भारी! पण मला ती गाडीचीच गोष्ट जास्त आवडलेली..रस्त्याच्या वळणावरच्या तरुणीची :) अवांतरः व्यंकोबा, परिक्षेचा अभ्यास सोडून भुताखेताच्या गोष्टी कसल्या सांगत फिरतोय रे? मराठीच्या पेप्रात काय भयकथा लिहा असा १० मार्कांचा प्रश्न येणारे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
श
शितल Wed, 12/17/2008 - 23:42 नवीन

वा.

सह्ही.. प्रियाली ताई, एक क्षण काहीच सुचत नाही. व्यंकु, कथा चांगली लिहिली आहेस पण शेवट लवकर गुंडाळास का?
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 12/18/2008 - 00:14 नवीन

वा वा!

एक सोडून दोन वेगवेगळी प्रात्यक्षिके. अंधार-थंडी->एकटेपणा-धोका रखरख-उजाड->एकटेपणा-धोका अशा वेगवेगळ्या प्रकारे भयाण वातावरणनिर्मिती जमली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी गुरुवार, 12/18/2008 - 09:47 नवीन

झकास

व्यंकूशेठ प्रयत्न चांगला आहे. लिहीत रहा. सध्या नाहीतरी मराठीत भयकथा लेखकांची वानवाच आहे. नारायण धारप गेले, मतकरींनी लेखन जवळजवळ थांबविल्याचे दिसते अशा स्थितीत मराठीत ताज्या दमाचे भयकथा लेखक हवेच आहेत. :))
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 12/18/2008 - 10:10 नवीन

क्या बात है

व्यंकुजी प्रियालीतैंच्या भयकथा वाचा आणी मग तुमची पण एक नवी भयकथा येउ दे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/18/2008 - 17:05 नवीन

हेच

हेच म्हणतो.. आमची भयालीदेवी भयकथा एक्स्पर्ट आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 12/18/2008 - 19:21 नवीन

वाह वाह,

वाह वाह, छानच आहे, आवडले पुले शु ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा