लैंगिक वाङ्मय : स्वानुभव आणि स्थित्यंतरे
वरील छोट्या पुस्तकांबरोबरच अन्य एका मासिकाचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे Debonair. आमच्या कोणाच्याच बाबतीत हे मासिक घरात येण्याची शक्यता बिलकुल नव्हती आणि घरी न सांगता त्याची रीतसर मासिक वर्गणी भरण्याइतपत आम्हा मित्रात कोणी सधन नव्हते. त्यामुळे जुन्या बाजारातून त्याचे काही अंक कोणीतरी घेई आणि मग ते खोल्यांमधून फिरत. त्या मासिकातल्या ‘मधल्या’ पानावरील (centerspread) मुक्त अंगप्रदर्शन केलेल्या स्त्रीचा फोटो हे तरुणांचे मुख्य आकर्षण असे. ते मधले पान बर्याच मोठ्या आकाराचे असे व ते घडी घातलेल्या स्वरूपात मासिकात समाविष्ट असे. ते काढून कोणाच्यातरी खोलीतील भिंतीवर यथावकाश स्थानापन्न होई. असे एखादे नवे चित्र एखाद्या खोलीत लागले की त्या खोलीचा भाव एकदम वधारत असे. तरुणांमध्ये या मासिकाचे आकर्षण त्या फोटोपुरतेच असले तरी हीच त्याची मर्यादा नव्हती. त्यात काही माहितीपूर्ण लेख, राजकीय टिप्पणी आणि खुशवंतसिंग (आणि तत्सम मंडळी) यांचे लैंगिक विनोद असेही साहित्य असे. एकूण ते मासिक तसा आब राखून होते. लैंगिक शिक्षणाच्या रोखाने असलेला त्यातला एक लेख आजही आठवतो. त्यात लेखकाने पुरुषाच्या हस्तमैथुनाची अटळता व उपयुक्तता छान मांडली होती. या क्रियेने अविवाहित अवस्थेत पुरुषाच्या लैंगिक सुखाचा प्रारंभ होतो. पण तितकेच त्याचे महत्त्व नसून ती क्रिया प्रत्येक पुरूषाची आयुष्यभराची सोबत असते, हा मुद्दा मनावर अगदी ठसला. विवाहित पुरुषाच्या आयुष्यातसुद्धा अनेक कारणांनी कधी ना कधी एकटेपणाचे प्रसंग येतातच. तेव्हा या क्रियेचे महत्त्व समजून येते.
.
प्रत्यक्ष संभोग आणि कल्पनारंजनातून केलेले हस्तमैथुन ही दोन वेगळ्या पातळ्यांवरील सुखे आहेत हे अनुभवांती लक्षात येते. कालांतराने डेबोनेरला स्पर्धक म्हणून ‘फॅन्टसी’ नावाचे तसेच एक मासिक निघाले होते. त्यांचे फोटो अधिक गुळगुळीत कागदावर छापलेले असायचे. त्याकाळी पाश्चात्त्य जगातले ‘प्लेबॉय’ फक्त ऐकून माहिती होते. आमच्यातील एका बढाईखोराने, ‘कधीतरी मी सर्वांसाठी एक अंक मिळून दाखवेनच’ असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात काही ते घडले नाही. थोडक्यात, डेबोनेर म्हणजे गरिबांचे प्लेबॉय असे समजून आम्ही दुधाची तहान ताकावर भागवून घेतली होती !
याखेरीज निरोधची रिकामी पाकिटे जमवणे हा त्या काळातील सामायिक छंद असायचा. त्या पाकिटांवरील विविध प्रकारचे स्त्रियांचे फोटो पाहणे हीसुद्धा तारुण्यातील रंजनाची एक महत्त्वाची गरज ठरते. शाळेत असताना काडेपेट्यांवरील चित्रे साठवणारे आपण आता ही पाकिटे साठवायला लागल्याचे स्थित्यंतर स्वतःलाच रंजक वाटले !
हस्तमैथुनासंबंधी गैरसमज पसरवणाऱ्या जाहिराती हाही या साहित्याचा एक भागच म्हटला पाहिजे. या जाहिराती विविध सार्वजनिक भिंती, पत्रके आणि नियतकालिकातून फिरत असायच्या; आजही असतात. असे गैरसमज पसरविणारी मंडळी त्यातून तरुणांमध्ये भयगंड निर्माण करतात आणि त्या बळावर आपली दुकाने थाटतात. आम्ही जरी वैद्यकीय शिक्षण घेत होतो तरीसुद्धा अशा सार्वजनिक अपप्रचाराचा मनावर कळत-नकळत परिणाम व्हायचा. एकदा असेच आम्ही चौघे बसलो असता हा विषय चर्चेस आला आणि त्यावर तब्बल दोन दिवस साधक-बाधक चर्चा घडली. त्यातून गैरसमज दूर व्हायला चांगली मदत झाली. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी गुप्तरोगशास्त्राच्या प्राध्यापकांनी त्यांच्या पहिल्याच व्याख्यानात वर्गात खणखणीत आवाजात सांगितले, की हस्तमैथुन ही पूर्णपणे नैसर्गिक व अपायविरहित क्रिया आहे. ते ऐकल्यावर खऱ्या अर्थाने आम्ही मैथुनसाक्षर आणि निर्भीड झालो.
पदवीचे शिक्षण संपताना अजून एका साहित्याचा शोध लागला. “प्रत्येक नवविवाहिताने वाचावेच” असे पुस्तक आपल्या मायमराठीतच उपलब्ध होते- अगदी दर्जेदार प्रकाशनाने काढलेले. कोणीतरी ते मिळवले आणि मग त्याचे सामूहिक वाचन झाले. त्यामध्ये प्रणयाराधन ते संभोग या सगळ्याचे तपशीलवार शिस्तीत वर्णन आणि संबंधित सल्ले होते. “आमचे हे पुस्तक वाचा आणि मग आयुष्यभर या सुखाचा मनमुराद आनंद लुटा”, अशी त्याची पुस्तकाच्या मलपृष्ठावर रास्त जाहिरात केलेली होती. पुढील आयुष्यात माझे काही नातेवाईक त्यांच्या लग्नापूर्वी माझ्याशी मोकळी चर्चा करायला आले होते तेव्हा मी त्यांना ते पुस्तक वाचण्याची जोरदार शिफारस केली. त्यातील एकाला तर मी ते त्याच्या लग्नात भेट म्हणून दिले.
अशा तऱ्हेने पदवीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत वरील प्रकारच्या लैंगिक साहित्याचा परिचय झाला. त्यातील महत्त्वाचा वाटा लिखित साहित्याचाच होता हे लक्षात येईल. लैंगिक दृश्य माध्यमांशी संपर्क इथून पुढच्या आयुष्यात आला.
एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यावर एक वर्ष इंटर्नशिपचा कार्यक्रम असतो. त्यातील पहिले सहा महिने ग्रामीण भागात काम करायचे होते. त्याकाळी घरोघरी टीव्ही संच स्थिरावले होते. परंतु टीव्हीला व्हीसीआर जोडून पाहण्याचे तंत्र थोड्याच लोकांकडे असायचे. बरेच लोक एखादा वेगळा चित्रपट पाहण्यासाठी व्हीसीआर यंत्रणा (कॅसेटसह) भाड्याने आणत. अशा कॅसेट लायब्ररीजची तेव्हा चलती होती. अनेक नव्या जुन्या चित्रपटांच्या कॅसेटस हळूहळू उपलब्ध झाल्या. उघड संभोगक्रिया दाखवणारे चित्रपट सर्रास दाखवण्यास भारतात तरी तेव्हा परवानगी नव्हती. त्यातून मग या प्रांतातील चोरटेपणा सुरू झाला. लैंगिक दृश्यपटांना तेव्हा ब्लू फिल्म असे म्हणत. मूळ परदेशी शब्द ब्लू पिक्चर (BP) असा होता. या दृश्यपटांचे विविध स्तर होते आणि त्यांना X गुणांकन दिलेले असायचे ( X, 2X, 3X इत्यादी). त्यातले X म्हणजे काहीतरी गुळमुळीत असायचे- स्त्री-पुरुष मैत्री इतपतच. 2X म्हणजे थेटरातल्या एखाद्या प्रौढांच्या इंग्लिश चित्रपटाइतके. 3X म्हणजे उघड शरीरसंबंधाची दृश्ये. अशा प्रकारच्या कॅसेट्स काही लायब्ररीजमध्ये दडवून ठेवलेल्या असत. त्या दुकानांचे चालक त्या फक्त ओळखीच्या लोकांना देत. अशा गिऱ्हाईकांची दुकानात ‘ते’ मागण्याची एक सांकेतिक पद्धत असायची.
आमच्या इंटर्नशिप दरम्यान आम्ही चार मित्र एकत्र रहात होतो. पूर्ण वेगळ्या गावात राहात असल्याने आता भरपूर मोकळीक होती. विद्यार्थीदशेतील बंधनांमुळे पूर्वी ज्या गोष्टी करता आल्या नव्हत्या त्या आता पूर्ण करायच्या होत्या. त्यातली एक म्हणजे 3X चित्रपट पाहणे. मग ते कुठे दाखवले जातात त्या अड्डयाचा पत्ता काढला. एका शनिवारी रात्री तिथे दाखल झालो. माणशी तिकिटाचे काही पैसे मोजले. एका घराच्या खोलीत दाटीवाटीने वीस माणसे मांडी घालून बसलो. त्यांत अनेक वयोगटांतील पुरुष होते. रात्री १० नंतर आजूबाजूला सामसूम झाल्यावर त्यांनी पूर्ण अंधारात अशा कॅसेटवरील दृश्यपट चालू केला. त्याच्या सुरुवातीस जवळपास दहा मिनिटे विविध धार्मिक चित्रे आणि त्यानुरूप काही मजकूर होता ! त्यावर, “हे काय?” असे आम्ही आश्चर्याने विचारले. तिथला माणूस म्हणाला, “अहो, आपण हे दाखवत असताना कधी पण पोलिसांची धाड पडू शकते. म्हणून या फिल्मच्या सुरुवातीस व शेवटी अशी चित्रे मुद्दाम घातलेली असतात. जर पोलिस आले तर आम्ही कॅसेट पटकन रिवाइंड करून त्यांना हे दाखवतो” (जसे काही पोलीस अगदी दुधखुळे होते !).
अशा त्या चोरट्या वातावरणात, पोलिसांची धाड वगैरे न पडता आम्ही आयुष्यातील पहिलीवहिली बीपी पाहिली. त्यानंतर मित्रपरिवारात ‘बीपी’ म्हणजे ‘भक्त प्रल्हाद’ असा सांकेतिक शब्दप्रयोग रूढ झाला होता ! या दृश्यपटांचा दर्जा तसा सुमारच असायचा. पुढे अजून एक दोनदा ते प्रकार पाहिल्यावर त्यातले आकर्षण संपून गेले. तसेच त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या अतिरंजित गोष्टी आणि वास्तव यात बराच फरक असतो याचेही भान आले.
कालांतराने आंतरजाल सुविधेत प्रगती होत गेली आणि असल्या कॅसेट्स मागे पडल्या. सध्या त्या इतिहासजमा झालेल्या दिसतात. लैंगिकपट विषयातली आजची प्रगती आणि परिस्थिती सर्वांसमोर आहेच.
...
असा हा माझा लैंगिक साहित्य अनुभवण्याचा प्रवास. आज याबाबतीत तृप्त स्थितीत असताना असल्या कशाचीच गरज भासत नाही. पण ज्या त्या वयात ती मानसिक भूक भागवण्याचे काम या साहित्याने केले आहे यात शंका नाही. आयुष्यातील विविध टप्प्यांवर आणि विशिष्ट परिस्थितीत अशा साहित्याची गरज निश्चित असते. अर्थात अशा दृश्यपटांमधून दाखवल्या जाणाऱ्या विकृत गोष्टींवर कायदेशीर विचारानुसार नियमन असावे. त्यातील अतिरंजित आणि अतिशयोक्त गोष्टीही त्याज्यच. पण संतुलित प्रौढ स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित लिखित अथवा दृश्य साहित्याकडे पाहताना मनात छुपेपणाची भावना नसावी. त्याकडे समाजाने खुल्या मनाने पाहायला हरकत नाही.
………………………………………………………………………………………………..
ब्लु रे डिस्क, व्हीआर>>> आता हे नवे ज्ञान मात्र जालशोध घेउन शिकले पाहिजे 😀
In reply to योनी मनीच्या गुजगोष्टी by प्रकाश घाटपांडे
पोथी वाचनाच्या अनुभवाबद्दल>> नाही, याबाबत नव्हते कधी ऐकले.
पुढुन चिठ्ठी यायची 'सूर्योदय' किंवा 'सूर्य ढगाआड '>> हे म्हणजे अगदी जबरीच ! भारी.
लेक्चर बुडवून इंग्रजी सिनेमा पाहण्यात>> +१ इंग्रजी सिनेमाचा एक अनुभव पुढील प्रतिसादात...
त्यात अशा गोष्टी साठी मार खाल्ला तर घरचे सोलुन आंब्यावर वाळत घालतील ही भीती होतीच >>>
हा वाक्प्रचार आहे का ? खूप आवडला !
एक पेन ड्राईव्ह काही नतद्रषटांनी अशाच कामाला वाहिला होता.>>> भारीच ..
........
२. "फँटसी" नावाचे मासिक पाहिलेले.. त्याची किंमत १०० रुपडे होती... गरम होण्याऐवजी आम्ही लोक गार झालेलो पूर्ण...>>>>> खरंय, तुम्ही आणि आम्ही एकाच बोटीतली प्रवासी होतो तेव्हा ! ........ ३.
झॅक स्नायडर चा ३०० म्हणून एक प्रसिद्ध सिनेमा आहे.
>>>> उत्सुकता वाटली बघायची...
>>>मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mere naina sawan bhado... :- Mehboobaशाळेत बहुतेक मुले माझ्यापेक्षा आकाराने आणि वयाने मोठी होती. खास विषय असेल तर मला गोड बोलून तू लहान आहेस वगैरे सांगून हाकलून देत.>>> बरोबर. शाळेतल्या प्रत्येक वर्गात स्वतःला बाप समजणारी अशी काही मुले असतातच. त्यांच्या दृष्टीने अन्य मुले म्हणजे अद्याप 'अंड्यात असलेली' अशी असतात. ............... २.
पारधी या विषयात मुक्तपणे आणि उघड व्यक्त होतात तर पाखरं क्वचितच काही तरी लिहतील ते ही मोजुन मापुन.>>> अगदी ! उपमा सुंदर. आवडलीच.
In reply to पहिले वहिले ते by जेम्स वांड
या चित्रपटात मी नायकाबरोबर अशी काही मोकळी दृश्ये दिलेली आहेत की त्यामुळे माझ्या घरचे हा चित्रपट बघूच शकणार नाहीत !”त्या काळी अशी जाहिरात देखील चित्रपटास गर्दी खेचण्यास उपयुक्त ठरत होती.
In reply to आता एक कठीण प्रश्न विचारतो. by प्रकाश घाटपांडे
In reply to आता एक कठीण प्रश्न विचारतो. by प्रकाश घाटपांडे
In reply to माझ्यामते by जेम्स वांड
In reply to माझ्यामते by जेम्स वांड
In reply to माझ्यामते by जेम्स वांड
In reply to आता एक कठीण प्रश्न विचारतो. by प्रकाश घाटपांडे
In reply to शाळेत सातवी आठवीनंतर by कानडाऊ योगेशु
In reply to फॉस्फरस सेसक्वीसल्फाईड हे by गवि
In reply to 1.Sec C 2. फायलम प्रोटोझोआ by कॉमी
In reply to फॉस्फरस सेसक्वीसल्फाईड हे by गवि
In reply to कुमार sir by Rajesh188
संभोगाचे सर्वोच क्षण चा अनुभव खूप कमी लोक अनुभवतात.>>> इथे प्रश्न पुरुषाचा नसून स्त्रीचा आहे. स्त्रीच्या 'कळसबिंदू' बाबत समाजात भरपूर अज्ञान आहे. त्यादृष्टीने विविध पातळ्यांवर समुपदेशन चालू असते. पूर्वी लस्ट स्टोरीज या नेट्फ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटातील एका भागात हा विषय फार छान हाताळला आहे. बघितला नसल्यास जरूर बघावा.
In reply to स्त्रीचा... by हेमंतकुमार
In reply to अनुभव : २ by हेमंतकुमार
In reply to समारोप ! by हेमंतकुमार
📜
वाङ्मय एक "क्ष" असलेले असेल तर ते "सॉफ्टवेअर" "क्षक्ष" असेल तर हार्डवेअर आणि "क्षक्षक्ष" असेल तर "ऑपरेटींग सिस्टिम" नावाने त्याची विभागणी करुन अगदी कॉर्पोरेट कल्चर ला शोभेल अशा प्रकारे साठवणूक केली होती.>>> हे मात्र जबरदस्त ! तुमच्या कला अभियांत्रिकीला दाद द्यायला पाहिजे.
In reply to वा ! by हेमंतकुमार
१. चौ को धन्यवाद. प्रतिसाद सजवायची चित्रकला तुमच्याकडून शिकली पाहिजे! कुमारएक, अॅक्च्युअली क्रेडिट गोज टू एक्सपर्ट टर्मीनेटर साहेब. त्यांनी स्मायली / Emoji चा धागा काढल्यामुळे याचा परिचय झाला आणि सवयही (व्यसन ?) लागली स्मायली / Emoji आता चित्रं टाकताना फेसबुक किंवा कायप्पावर असल्याचा फील येतो !
😊
In reply to १. चौ को by चौथा कोनाडा
क्रेडिट गोज टू एक्सपर्ट टर्मीनेटर साहेब.>>> प्रश्नच नाही ! मी पण त्यांच्याच शाळेत शिकतो. पण मी अजून बालवाडीत आहे; तुम्ही कॉलेजला गेला आहात हा फरक 😀 😉
In reply to + ११ by हेमंतकुमार
अगदी लहान वयापासून शरीराचे वेगवेगळे भाग शिकविताना शिश्न (पेनिस) आणि योनी (व्हजायना) अशी स्पष्ट आणि नेमकी नावं शिकवणं आवश्यक आहे.
In reply to वादग्रस्त... by हेमंतकुमार
In reply to लॉजिकल ईंडिअन by निनाद
पंकजच्या कथेतील म्हातारा सांगतो, ‘बायांचं नागडेपण आता इतकं पाहिलंय की, सालं हिंदी सिनेमातील कपडे घातलेल्या हिरॉईनीच चड्डीला जास्ती त्रास देतात. तरी मी रात्री झोप येईस्तोवर एक-दोन नवे बीपी पाहातोच. यातली गंमत सांगू? पूर्वी मला हे नागडेपण स्ट्रॉन्ग करायचं, आता ते तितकसं महत्त्वाचं राहिलेलं नसल्यानं पूर्ण कपड्यातलं कुठलंही मादक शरीर मला पाहायला चालतं. मला पॉर्न पाहिल्याचं समाधान आता तंग कपडे घालणाऱ्या बायकाही देऊ शकतात. म्हणजे माझी किती मजा आहे बघ. सारं जगच माझ्यासाठी पॉर्न बनलंय’. हा म्हातारा जणू या पिढीचा प्रतिनिधी आहे.
In reply to सुंदर पुस्तक by हेमंतकुमार
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !