टार्या........ तू खरचं माजोरा आहेस...... :)
पण तुझ्या माजातही मला एक निरागसता जाणवते. (काय माहिती का? ) :-?
पण अन्यायाला विरोध करण्यासाठी तू या माजाचा, तुझ्या बिल्ड अप बॉडीचा वापर करतो, हे वाचून खरंच शिवकालीन मावळ्यांची आठवण आली.
तुझे बसमधले, कॉलेजातले, गल्लीतले "माजोरे" प्रसंग खरोखरच मस्त आहेत...
काही लोक आपल्या कल्पनाशक्तीला पार फाडुन अकल्पित प्रसंग वाचकांसमोर , स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी लिहितात.... अर्थात त्याची सत्यता, १ % असते, हे वाचकांना ही माहित असते. पण तुझे तसे नाहीये. (कारण तुझ्या माजा'ची आणि "पावर" ची समस्त मिपाकरांना पुरेपूर कल्पना आहे.) वर उल्लेखलेले प्रसंग "लाईव्ह" पाहताना खरंच खूप मज्जा आली असती आम्हाला!
त्यामुळे जस्ट कीप इट अप... सध्या आफ्रिकेत असलेला तुझा सुप्त माज, भारतात आल्यावर उफाळून येवू दे, ही सदीच्छा! :)
-> शिवरायांच्या मावळ्यांचा आदर करणारी,
मृगनयनी.
:)
स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी लिहितात.... अर्थात त्याची सत्यता, १ % असते, हे वाचकांना ही माहित असते.
सहमत. पण त्यांचा किती मोठा पोपट होतो .. हे त्यांना कळत नाय ना .. मला काय क्षमता सिद्ध करायची गरज ;) आहे तो असा आहे. एकदा केनियात पण संध्याकाळी चालताना एक कल्लू पाकिट मारत होता. स्वाभाविकच त्याच्या तोडावर एक बसलेली. हे सगळं सेकंदांत होतं ग.. त्याला फिल्मी डायलॉग वगैरे नाही लागत. माझा छोटा भाऊ माझ्यापुढे गेला निघुन .. खि खि खि
९५% वेळा मारामारीची वेळ नाही येत. बॉडी लँग्वेजनेच कामं होतात. असा अणूभव
शोलेतल्या बिरू स्टाईल : जिस जिस को शक हो वो सामने आ जाय :)
अवांतर : मृगनयनीजी, आपण लेख वाचला आपल्याला आवडला , धन्यवाद.
आपल्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल आभार.
(लवकरच १०० लेख पुर्ण करतो. :) )
- टारझन
काही जणांना मार पडल्याशिवाय समजतच नाही...
>>हे आपल्या सरकारला केव्हा समजणार... :(
(लवकरच १०० लेख पुर्ण करतो. )
कर कर ..लवकर कर..मी वाचतोय.. :)
स्वप्निल
९५% वेळा मारामारीची वेळ नाही येत. बॉडी लँग्वेजनेच कामं होतात. असा अणूभव
बर्याचदा फाटका इसमाचाही फक्त हिमतीच्या जोरावर निभाव लागतो, स्वानुभव आहे.
टार्या चांगलं लिहिलं आहेस रे!
टार्या, तू मस्तच लिहितोस. एकदम मनमोकळं. मजा आली. अरे पण आता दुसरा भाग पण लिही. हा माज कसा कमी झाला (झाला असेल तर ;) ते पण लिही. :)
अवांतरः शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांची एक गोष्ट आठवली. हे लोक लाहोर मधे असताना, खूप व्यायाम वगैरे करत. साहजिकच 'बॉडी' तयार झालेली. तू म्हणतोस तसा 'माज' अंगात सुरसुरत होता. एकदा ही मंडळी रस्त्यावरून चालले असता सुखदेव (का राजगुरू?) यांनी अचानक समोर येणार्या एका माणसाच्या कानाखाली लगावून दिली. बहुतेक कारण काहीच नव्हते. त्या नंतर भगतसिंहानी त्यांची जी शाळा घेतली, खूप झाडले. ते म्हणाले की ही रग जी अंगात आहे ती देशाच्या कामी लाव. क्रांतिकारी विचार तर त्यांच्यात होतेच, या प्रसंगानंतर मात्र ते (सुखदेव / राजगुरू) अजून जोमाने सामिल झाले. (चु.भू.दे.घे. डीटेल्स वेगळे असतील पण गोष्ट खरी आहे. खूप पूर्वी एका प्रसिद्ध इतिहासाच्या पुस्तकात वाचले होते.)
बिपिन कार्यकर्ते
साली आमची सगळि रग तोंडात. हात हलतच न्हाय :(
मस्तरे मित्रा!
(अवांतरः मी डी.वाय. पाटिल ला डिप्लोमा केला आहे. तु पण डि.वाय. ला होतास का?)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
डी.वाय. पाटिल कॉलेज ऑफ इंजिनियरींग , अकुर्डी रेल्वेस्टेशनच्या मागे.
मी इंजिनियरींग ला होतो मित्रा
२००६ पास आउट ! डिप्लोमा पण आला होता नंतर नंतर तिकडे.
पुन्हा बिपिनजी, संहिताजी आणि पांतस्थजी,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
- टार्कृष्ण
गाववाल्या :-) (आमचे पण पुण्याचेच पाणी), एकदम मस्त लिहिल आहेस..
तो झुरळांचेच वंशजांना मारलेला स्प्रे अन बसमधला प्रसंग तर सहीच आहे..
ताकदीचा योग्य वापर केलास!!
टार्स
लै म्हणजे लै भारी लिहिलस
तु असाच पुढचा भाग लिहि
तुझा माज कसा कमी झाला वैगेरे....
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
टार्स
मी जितके पैलवान, बॉडी- बिल्डर बघितले आहेत, किंवा ज्यांच्या संपर्कात आलो आहे, ते मनाने खूपच भाबडे असतात. त्यांच्या मनात कपट कधीच येत नाही. तुझे लेखन वाचून पण तुझा भाबडेपणा जाणवल्याशिवाय रहात नाही.
हा गुण सगळ्यांच्यात कसा काय येतो हे तो एक मारुतीरायाच जाणे.
तुझे सद्ररक्षणाय, खलनिर्दालनाय असे कार्य सुरु ठेव.
http://kalekapil.blogspot.com/
आपल्या शरीराविषयी एकप्रकारचा वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. भीती कमी होते. जिथे भीती असते तिथे कपट येते!
सामर्थ्याचा योग्य वापर करण्याचे वळण मनाला असेल तर चांगल्या गोष्टी घडतात अन्यथा गुंडागर्दीकडेही मन ओढले जाऊ शकते पण सर्वसाधारणपणे तुमचे निरीक्षण बरोबर आहे.
मीही काही सौष्ठवपटूंना ओळखतो तेही स्वभावाने मृदु आहेत.
समर्थांनी म्हणूनच बलोपासना सांगितली आहे! अकरा मारुतींची स्थापना काय उगीचच केली काय त्यांनी?
जय हनुमान!! :)
चतुरंग
माज म्हणजे माजोरी.. आपण चुकतो आहोत हे समजूनही तसंच वागत रहाणे म्हणजे माज.
तू जे काही केलंस म्हणजे मारामारी.. हाणामारी.. वगैरे.... ते दुसरा कोणी माज करत असेल तर त्याचा माज उतरवण्यासाठीच.
लेख मात्र आवडला. प्रांजळपणे आणि मोकळे पणाने लिहिलेला लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अग्गं प्राजु तै ... मी असा गुढग्यात असल्यासारखा तु म्हणतेस तो 'माज' नाही केला कधीच. आणि ते पटतही नाही. पण सांगणे का तात्पर्य की, कोण पण .. मीच नाही... याम केला ना .. की अंगात रग येतेच. कुठे तरी ताकद दाखवावीशी वाटते. कधी कधी आपलं बॉक्सिंग किंट बडवणे, थोडं काही झालं की ऍग्रेसिव्ह भुमिका घेणे,इ.इ.
येप्स मी कधीच दादागिरी नाही केली, ना कधी आपण भारी, हाण कोणा मरतुकड्याला असं केलं.
ते जिम ला जायचो तिथलं पब्लिक अशा खुमखुमीला 'माज' असणे म्हणायचं. बाकी समाजकार्याचं फॅड जबरदस्त होतं, कोणा मित्रासाठी पण मारामारीला पुढे.
बरं आमचे मित्र आघाडीवर, नेहमी आपले शेळी सारखे असणारे, मी बरोबर असलो की तेच्च वाघ व्हायचे, अरेच्चा :)
त्यांचाच आवाज वर.
सालाबाद प्रमाणे, सर्व मायबाप वाचकांचे आभार..
आणि स्वतःला १०० लेख पुर्ण करण्यासाठी शुभेच्छा ! आणि अजुन लेख येउन द्या म्हणनार्यांनो .. जेवढं होतं तेवढंच लिवलं भो, उगाच माणसिक मनोरे कसे उभे करू ? माज उतरला तो काळाच्या ओघात. ऑटोमॅटीक .. जॉबला लागल्यावर मला "रूड बिहेवियर" ची नोटीस मिळालेली.. असो तो वेगळाच्च मॅटर होता म्हणा. पण आवाजाचा टोन कसा राखावा, राग दाबून वर दात कसे विचकावे इत्यादी, ते जॉब मधेच शिकलो. फक्त बॉडीलँग्वेजने डॉमिनेट केल्याची आणि मारामारी न करण्याची लैच्च उदाहरणं आहेत.
असो वर एक लिहायचं राहिलेलं, जे बस मधलं पोरगं होतं ना, त्याला खिडकीतून गार हवा लागत होती, त्याने त्या पुढच्या गरिब मुलाला (खेकसून) सांगितलेलं खिडकी बंद कर, त्याने नकार दिला असावा.
बास ..
(आजवर कद्धीच हाटकून माज न केलेला)
- टारझन
टारूबाळाचा विजय असो.................
(अजुन एक माजलेला)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
एकदम टकाटक लिवलं आहेस की! तू केलेली 'समाजसेवा' जाम आवडली अन पटली!
अरे, त्या वयात असं वाटतंच की कुणा संडूला जाम बुकलून काढावे फुरफुरणारे स्नायू जरा गप होतात! तुझ्या लिहिण्यातला निखळपणा आवडला.
मी कधीच एवढा बलदंड नव्हतो. पण मी ही थोड्याफार मारामार्या केलेल्या आहेत! ;) एक चांगलीच आठवते.
सातवी-आठवीतली गोष्ट. वर्गातल्या एकाचे आई-वडील आमच्या शाळेतच शिकवायला. फुल माज करायचा तो. दमदाटी, गरीब पोरांना मारणे. बाहेरची मुले आणून दमबाजी, मारामारी असले प्रकार.
माझी त्याची दोन तीन वेळा झनापनी झालेली. त्याने बाहेरची मुले आणून मला दोनेकदा चोपलेले होते. त्यामुळे तसा दबून असायचो पण माझ्या मनात अपमान ठुसठुसत होता!
शाळेच्या ग्राउंडवर लांब उडीसाठी रेती भरलेले खड्डे होते. त्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यात उड्या मारणे हा आमचा नेहेमीचा आवडता खेळ.
एके दिवशी तो आला आमच्यातल्या एकदोघांना दमदाटी करुन ढकलले. मला ढकलून पाण्यात पाडले आणी माझे दप्तरही भिरकावून दिले. मग मात्र मी सटकलो.
त्याच्यावर धावून जाऊन त्याला लोळवले, अचानक हल्ल्याने तो गांगरुन गेला. पाय धरुन फरपटत त्याला ओढत खड्ड्यात ढकलले. वर उडी मारुन त्याचे तोंड पाण्यात दाबून धरले. त्वेषाने हल्ला केल्याने माझ्या अंगात फारच जोर आला होता. ५-१० सेकंद पाण्यात बुडाल्याने नाकातोंडात रेतीचे पाणी जाऊन, गुदमरुन, वेडावाकडा होत उसळून तो बाहेर आला. त्यानंतर तो जाम टरकला होता! पुन्हा म्हणून कधी माझ्या वाटेला गेला नाही! ;)
चतुरंग
टार्या माज चांगला हाय खास करुन ईशल्या बरुबर केलेलि तुम्बा तुम्बी कारन त्याची भन ती तुझी भन चोपलास ना त्या झुरळांना
जबर्या हाण्लास ना
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
मस्तच लिहिलंय रे.
पण एक गोष्ट मात्र खरी... दुसरयासाठी लढताना वेगळाच आत्मविश्वास जागा होतो.
शाळेत असतानची घटना आठवली. एक 'वांड' क्याट्यागरीतल्या मुलाने माझ्या एकदम खास दोस्ताला खाली पाडला आणि दोन तीन लाथा घातल्या. अस्मादीक सहसा शरीर बळापेक्षा वाक् बळ जास्त वापरण्यावर भर देणारे असल्यामुळे सुररवातीला समजावण्याचा प्रयत्न केला पण पोरगं ऐकत नाही म्हटल्यावर दे दणादण चोपला. आणि वर्गाच्या भिंतिवर डोकं आपटलं. दोन मिनिटं त्याला काही सुधरेचना! आणि मग थोड्या वेळाने सीन असा होता कि ते पोरगं सुन्नपणे भिन्तीजवळ बसलेलं आणि मी डोळ्यात पाणी आणून त्याला सांगतोय्.."बघ सान्गत होतो ना तुला; कशाला उगाच मारलास त्याला....."
असो. जाता जाता ..... मी ही 'डी वाय' चाच रे. फक्त पिम्परी डी वाय चा :)
."बघ सान्गत होतो ना तुला; कशाला उगाच मारलास त्याला....."
=)) =)) =))
बेष्ट ... सेम टू सेम .. मी माझ्या छोट्या भावाला मारला होता, कारण तो आमच्याबरोबर विहीरीवर पोहायला येत होता म्हणून.. तो रडायला लागल्यावर आईच्या माराची जाणीव झाली .. मी पण सेम म्हणालेलो .. "."बघ सान्गत होतो ना तुला; कशाला आलास माझ्या मागे ?....."
जाता जाता ..... मी ही 'डी वाय' चाच रे. फक्त पिम्परी डी वाय चा
जाता जाता विप्र चावले काय बे तुला ? अर्रे वा .. डि वाय वाला का तू .. उत्तम ..
- टारझन
प्रतिक्रिया
टार्या........
:-)
चांगले केले...
९५% वेळा
:)
टार्या...
झकास!!!
होय
मस्त अनुभव
टार्स लै
मनाने खूपच भाबडे
शरीर कमावण्यामुळे
मस्त लिहिले आहेस.
हा माज नव्हे..
सहमत
सही रे माजो-या!!!(ह.घे.)
फंडू रे टार्या!
टार्या
मस्तच
मस्त रे