निसर्ग
---------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रसन्न सकाळ आहे. हवाही आल्हाददायक. बोराच्या झाडावर साळुंक्या बसल्या आहेत. त्या जोडीचा किलबिलाट चालू आहे . पलीकडच्या झुडपांवर छोटी पिवळी फुलपाखरं उडत आहेत. मध्येच हवेची झुळूक येतीये . पानं डोलत आहेत. झाडावर सरडा कळून येत नाहीये. दिवस पावसाचे पण पाऊस नाहीये.
मलाही छान वाटतंय !
चहाच्या टपरीपाशी पोरापोरींची गर्दी आहे. ती पोरं मजेत चहा पितात आणि कटिंग चायवाले छोटे थर्माकोलचे कप वाढलेल्या झुडपांमध्ये फेकतात .
माणूस निसर्गाचा असा नाश का करतो ?
पण- अशाच एका कपामध्ये माती भरलीये…
त्यामध्येच मी उगवलोय .आता मी लहान आहे ; पण उद्या मी त्या कपापेक्षा उंच होणारच आहे .त्याच्या कडेवरून बाहेर डोकावणार आहे .
त्याला दाखवणार आहे- निसर्ग सगळ्यांपेक्षा मोठाच आहे !
----------------------------------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे
प्रतिक्रिया
20 Oct 2019 - 11:10 pm | सुचिता१
छान ! सकारात्मक दृष्टीकोन !!
21 Oct 2019 - 2:18 pm | गोंधळी
आरेवा
छान,प्रासंगिक.
21 Oct 2019 - 7:14 pm | अर्धवटराव
निसर्गावर देखील सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याची वेळ आली आता ;)
21 Oct 2019 - 11:29 pm | जॉनविक्क
इतकी ओघवती कथा आहे. सकारात्मकता आवडली.
23 Oct 2019 - 10:09 pm | बिपीन सुरेश सांगळे
वाचकांचे आभार आभार