✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धिरडं (बालकथा)

श
शाल्मली यांनी
Mon, 11/10/2008 - 04:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9980 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

स
सूर्य Mon, 11/10/2008 - 04:49 नवीन

धिरड्याचं

धिरड्याचं चित्र झकास टाकलत. माझा आवडता पदार्थ आहे. :) . बालकथा सुद्धा छान.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/10/2008 - 05:34 नवीन

शाल्मली, सुंदर बालकथा, एकदम चुरचुरीत, कुरकुरीत!

धिरड्याची चित्रेही मस्तच! :) (खुद के साथ बातां : रंगा, धिरडं हवं असलं की लिखाळ कसे बरं सांगत असतील बायकोला? :? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 11/10/2008 - 21:01 नवीन

रंगा के

रंगा के साथ बातां : सहजराव आमच्याबद्दल लिहितात नावाचा लिखाळ स्वभाव मवाळ थोडासा खट्याळ लिहीतसे त्यामुळे आम्ही भटजीबुवांसारखे नसणार हे नक्कीच. :) अवांतर : जो फोटो काढतो तोच धिरडं करतो असे असते का? :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
शितल Mon, 11/10/2008 - 05:35 नवीन

फोटो मस्त आलेत.

आणि कथा आवडली. :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/10/2008 - 07:28 नवीन

आम्ही पण

आम्ही पण ल्हानपणी ही ष्टोरी ऐकली होती, मस्तच आहे... :) भटजीबुवाचा आणि धिरड्याचा फोटू क्लासच! :) या वरून सहजच पुण्याच्या कट्ट्यावर मी अजून एका भटजीची ष्टोरी सांगितली होती आणि ती सगळ्यांना अगदी मनमुराद आवडली होती ते आठवले. अर्थात, ती ष्टोरी बालसाहित्यात मोडत नाही हा भाग वेगळा! :) आपला, तात्याभटजी :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 11/10/2008 - 18:34 नवीन

हा हा

=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
झ
झकासराव Mon, 11/10/2008 - 19:12 नवीन

सहजच

सहजच पुण्याच्या कट्ट्यावर मी अजून एका भटजीची ष्टोरी सांगितली होती >>>>>>> =)) =)) =)) ती गोष्ट आठवुन आतासुधा जोरजोरात हसुन घेतल. बाकी धिरड्याची गोष्ट आधी ऐकली होती. फोटु मस्त आहे. :) घावन आणि धिरड एकच ना? ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
र
रेवती Mon, 11/10/2008 - 08:06 नवीन

वाचून दाखवली.

माझ्या मुलाला वाचून दाखवली. त्याला आवडली. बालसाहित्य आलं मिपावर आता धिरड्याचं साहित्यपण येऊ देत. ;) स्वातीताईनं एकदा घावनाची कृती दिली होती. त्यात आणि वर फोटूमधे असलेल्या धिरड्यात फरक काय? रेवती
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 11/10/2008 - 17:42 नवीन

फरक

<<स्वातीताईनं एकदा घावनाची कृती दिली होती. त्यात आणि वर फोटूमधे असलेल्या धिरड्यात फरक काय?<< स्वातीताईनी टाकलेले घावन मी वाचलेले नाही. पण घावन हे तांदूळाच्या पीठाचे असते. आणि वरच्या फोटोत दाखवलेलं धिरडं डाळीचे पीठ+थोडे तांदूळाचे पीठ असे आहे. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ऋ
ऋषिकेश Mon, 11/10/2008 - 09:03 नवीन

लै भारी

मिसळपावचे पाहुणे संपादक ऋषिकेश यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही बालकथा लिहित आहे.
मनापासून आभार ! :) बालसप्ताहाची सुरवात तर लै भारी :) गोष्ट एकदम मस्त! एकदम चुरचुरीत.. चमचमीत.. आणि टार्गेट ऑडीयन्सला साजेसे लेखन आणि आता न्याहारीच्या वेळी वाचल्याने पोटात कावळे ओरडु लागले आहेत.. अरेरे आमच्या कँटीनमधे धिरडं मिळत देखील नाहि :( -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 11/10/2008 - 14:55 नवीन

मस्तच!

अगदी जमलंय हो धिरडं! बाकी, धिरडं म्हणजे, बायकांना पोळ्या लाटायचा अन भाकर्‍या थापायचा कंटाळा आल्यावर करण्याजोगा अगदी सोपा, सहज प्रकार. नाव मात्र द्यायचं - `आज तुमच्या आवडीचा वेगळा स्वयंपाक केलाय हो!' असो. आम्ही भाजलेल्या लष्कराच्या भाकर्‍या इथे वाचा : http://abhipendharkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 11/10/2008 - 15:13 नवीन

हा हा!

<<बाकी, धिरडं म्हणजे, बायकांना पोळ्या लाटायचा अन भाकर्‍या थापायचा कंटाळा आल्यावर करण्याजोगा अगदी सोपा, सहज प्रकार. नाव मात्र द्यायचं - `आज तुमच्या आवडीचा वेगळा स्वयंपाक केलाय हो!'<< हे एकदम पटलं..(पण मनातल्या मनात) ;) पण धिरडं हा पदार्थ मधल्या वेळचं खाणं म्हणूनही छान वाटतो हं :) --('ह्यांच्या' आवडीचा वेगळा स्वयंपाक करणारी) शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
च
चित्रा Tue, 11/11/2008 - 07:10 नवीन

छान गोष्ट

पण धिरडं हा पदार्थ मधल्या वेळचं खाणं म्हणूनही छान वाटतो हं +१ लहानपणीची आठवण आली, गोष्ट छान आणि धिरडीदेखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/10/2008 - 17:29 नवीन

मस्त आहे गोष्ट

आवडली मला! (सकाळीच स्वतः बनवून धिरडी चापणारी बालिका) अदिती
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 11/13/2008 - 19:39 नवीन

:)

मस्त आहे गोष्ट प्रेषक १३_१३ व्यस्त अदिती ( सोम, 11/10/2008 - 17:29) . आवडली मला! (सकाळीच स्वतः बनवून धिरडी चापणारी बालिका) अदिती
टाइमस्टँप चुकलाय का ? ही खरड ( सोम, 11/10/1888 - 17:29) . मधली असावी !! --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
स्वाती दिनेश Mon, 11/10/2008 - 17:36 नवीन

गोष्ट!

खूप दिवसांनी ह्या गोष्टीची आठवण करून दिलीस,छान वाटले. धिरड्याचे फोटो मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments
व
वारकरि रशियात Mon, 11/10/2008 - 17:43 नवीन

खूप दिवसांनी पुन्हा ऐकली

मुक्तसंगः अनहंवादि गोष्टी ऐकण्यात रंगून जाणारा (व धिरडी आवडणरा बाल) वारकरि
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 11/10/2008 - 18:35 नवीन

काय मस्त

काय मस्त गोष्ट सांगितलीत !! अजुन येउद्या अश्या गोष्टी !!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/10/2008 - 21:37 नवीन

सह्ही.

माझ्या आजीनेही ही गोष्ट मला सांगितली होती लहानपणी. आज बरं वाटलं वाचून पुन्हा एकदा. सह्ही. फोटोही मस्त. मी या धिरड्यामध्ये बर्‍याचदा कधी पालक, कधी मेथी, कधी किसलेला दूधी भोपळा घालते. माझा लेक डोसा म्हणून आवडीने खातो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 11/10/2008 - 22:15 नवीन

छान

कथा आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 11/10/2008 - 22:32 नवीन

आवडली

आवडली गोष्ट! मी नव्हती ऐकली आधी.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/10/2008 - 22:42 नवीन

मस्तच...

लहानपणी ही गोष्ट नेहमी सांगायचे आई-बाबा. आठवणी जाग्या झाल्या. :) धिरड्याचे फोटो पण मस्त. त्यामुळे पण बर्‍याच आठवणी आल्या. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 11/11/2008 - 14:04 नवीन

धन्यवाद!

सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद! :) --(आभारी) शाल्मली.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 11/11/2008 - 14:09 नवीन

खटकल.

शाल्मली ताई कथा चांगली आहे,परंतु हिला बाल कथा म्हणायचे का? भटजीबुवा रागावले आणि म्हणाले "येवढं कसं तुला येत नाही??" असं म्हणून रागाने ते बायकोला पाठीत रट्टे मारायला लागले. लहान मुलांना ,नव-याने बायकोला मारणे हे दाखवलेच पाहिजे का? मला वाटते लहान मुलांना असल्या गोष्टींची सवय आपणच लावतो. बाकि चालु द्या. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 11/11/2008 - 15:36 नवीन

अभिज्ञ, तुम

अभिज्ञ, तुमचा मुद्दा बरोबर आहे. परंतु वर प्रतिसाद दिलेल्या अनेक लोकांनी ही कथा लहानपणी ऐकली असून त्यांना आवडल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मनावर ह्या गोष्टीचा काहीच विपरित परिणाम झाल्याचे दिसत नाही. मला वाटते लहान मुलांना असल्या गोष्टींची सवय आपणच लावतो. तसेच आपले आई-वडिल किती गंभीरपणे अथवा चेष्टेच्या सुरात गोष्ट सांगत आहेत तेही लहान मुले अजाणतेपणी लक्षात घेतच असतात. जेव्हा पालक विनोदी सुरात भटजीबुवा रागावले आणि म्हणाले "येवढं कसं तुला येत नाही??" असं म्हणून रागाने ते बायकोला पाठीत रट्टे मारायला लागले. असे सांगतात, तेव्हा मुलांच्या चेहेर्‍यावर हसूच उमटते.. असे मी सुद्धा पाहिले आहे. तेव्हा पालकांनीच गंभीर कथा गंभीर अंगाने आणि विनोदी कथा विनोदी अंगाने सांगावी असे मला वाटते. . तरीही तुमचा मुद्दा पुढील वेळेस मी जरूर विचारात घेईन. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
च
चतुरंग Wed, 11/12/2008 - 02:23 नवीन

अभिज्ञ,

तुम्ही गोष्ट सांगताना, भटजीबुवांची बायको रागावली आणी म्हणाली "येवढं कसं तुम्हाला आठवत नाही??" असं म्हणून रागाने ती भटजींना पाठीत रट्टे मारायला लागली. .... असा बदल केलात तरी चालेल.. शेवटी मुलांना धिरड्याची गोष्ट समजल्याशी कारण! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ल
लिखाळ Wed, 11/12/2008 - 18:56 नवीन

>>भटजीबुवां

>>भटजीबुवांची बायको रागावली आणी म्हणाली "येवढं कसं तुम्हाला आठवत नाही??" असं म्हणून रागाने ती भटजींना पाठीत रट्टे मारायला लागली.<< हा हा हा.. हे मस्त ! -- (घरातले लाटणे लपवून ठेवणारा) लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
शाल्मली Wed, 11/12/2008 - 22:32 नवीन

(घरातले

(घरातले लाटणे लपवून ठेवणारा) लिखाळ तरीच लाटणं सापडत नाहीये.. ;) त्यामुळे पोळ्या करता येत नाहीत हल्ली.. आणि मग धिरडी करावी लागतात.. ;) --लाटणं शोधणारी (शाल्मली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
अ
अभिज्ञ गुरुवार, 11/13/2008 - 15:52 नवीन

हे कसे वाटतेय?

भटजीबुवांची बायको रागावली आणी म्हणाली "येवढं कसं तुम्हाला आठवत नाही??" असं म्हणून रागाने ती भटजींना पाठीत रट्टे मारायला लागली. त्या ऐवजी, भटजी रागावून बायकोच्या पाठित रट्टे घालायला लागतो. ते पाहून बायकोहि भटजीच्या पाठित रट्टे घालत सुटते. दोघांचीहि रट्टारट्टि पाहून त्यांचा लहान मुलगाच ओरडतो कि तुम्ही दोघे एकमेकाच्या पाठिचे "धिरड" का करताय? शेवटी भटजीला/लहान मुलांना धिरड्याची गोष्ट समजल्याशी कारण! ;) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 11/13/2008 - 17:43 नवीन

चालेल, हा बदल पुढल्या पिढीत चालेल.

दर पिढी गणिक मारणारे लोक आलटून पालटून बदलत रहातील! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
र
राम दादा Tue, 11/11/2008 - 17:35 नवीन

गंमत झाली बुआ..

बायकोने बिचारीने ..मार खाउन सुद्धा सांगितले..आणि हा भडजी..???? आणि काय काय आठवायसाठी ..त्या बायकोला किती मारत असेल . कोणास ठाऊक... असो..कथा आवडली.... राम दादा...
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 11/13/2008 - 19:34 नवीन

बाकी

पोरांना कसं समजावायचं हा एक गहन प्रश्नच असतो. माझ्या मुलीची एखादी अनाठायी मागणी पूर्ण केली नाही आणि तिला समजावायल गेलं, तर `हेच तुमचं उलट बोलणं मला आवडत नाही' म्हणून माझ्यावरच आगपाखड करते. यापुढे काय बोलायचं? कप्पाळ? (अवांतर : `आपण मुलांना शिकवणं म्हणजे संस्कार. त्यांनी आपल्याला शिकवणं म्हणजे उर्मटपणा.' ही ग्राफिटी स्वानुभवावरच आधारित होती. असो.) - मुलीचे शब्दबाण झेलणारा अभिजित.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/13/2008 - 20:29 नवीन

शाल्मली,

शाल्मली, मस्तच गं गोष्ट :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा