ठाकठोक

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
19 Sep 2019 - 9:34 pm

ठाकठोक
---------

मी तसा ओके आहे .
फक्त एक गोष्ट सोडता . मला जास्त आवाज आवडत नाही . सहनच होत नाही.
पण वरच्या मजल्यावरची ती जीवघेणी ठाकठोक ! ती बाई हे सारं मुद्दाम करते .
मला त्रास द्यायला. छळायला.
यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा; नाहीतर मी मरून जाईन असं वाटतं.

आज मला बरं वाटतंय. शांत शांत . वेगळंच .कारण वरचा आवाज बंद झालाय.
पण पोलीस आले आणि त्यांनी मला धरलं .
“का खून केलास तिचा ?” एका पोलिसाने विचारलं.
मला काहीच आठवत नव्हतं. सांगणार तरी काय?
एका कामवालीने मध्येच तोंड घातलं ,” साहेब, ती बाईसुद्धा वेडसर होती. तिला सारखा पालींचा भास व्हायचा . नसलेल्या पालींच्या मागे ती घरभर फिरायची. त्यांना मारत - ठोकत !”

कथा

प्रतिक्रिया

सुचिता१'s picture

20 Sep 2019 - 7:42 am | सुचिता१

कथा बीज चांगले आहे. पण अजून फुलवता आली असती.

तुषार काळभोर's picture

20 Sep 2019 - 7:58 am | तुषार काळभोर

अजून लिहीत राहा!

प्रचेतस's picture

20 Sep 2019 - 8:05 am | प्रचेतस

मस्तच.

विजुभाऊ's picture

20 Sep 2019 - 8:21 am | विजुभाऊ

समजली नाही कथा .
की पुढचा अजून एखादा भाग यायचाय अजून कथेचा

श्वेता२४'s picture

20 Sep 2019 - 4:48 pm | श्वेता२४

ठोकाठोक

टर्मीनेटर's picture

20 Sep 2019 - 5:54 pm | टर्मीनेटर

लघुकथा आवडली!

गड्डा झब्बू's picture

20 Sep 2019 - 6:18 pm | गड्डा झब्बू

बोलता भी काणा और सुनता भी काणा :-))

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Sep 2019 - 11:18 pm | बिपीन सुरेश सांगळे

सगळ्या वाचकांचा आभारी आहे
उशिरा प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व .

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Sep 2019 - 11:19 pm | बिपीन सुरेश सांगळे

पैलवान विशेष आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Sep 2019 - 11:20 pm | बिपीन सुरेश सांगळे

विजुभाऊ ही लघुकथाच आहे .
आपण पुन्हा एकदा वाचून पहा , ही विनंती