जिवंत पण जाणीवरहित
लेखनप्रकार
बेशुद्ध पडलेला रुग्ण हा त्याच्या कुटुंबीयांसाठी धडकी भरवणारा विषय असतो. अचानक आलेली बेशुद्धी ही तर अधिक चिंताजनक असते. ही अवस्था नक्की कशामुळे येते हे सामान्यांना नीट समजले नाही तरी तिचे गांभीर्य कळते. तिच्या मुळाशी मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो. या बिघाडाची अनेक कारणे असतात. त्यामध्ये विविध आजार, गंभीर अपघात, व्यसनांचा अतिरेक आणि काही औषधांचे प्रमाणाबाहेर सेवन यांचा समावेश होतो. बेशुद्ध रुग्णास शुद्धीवर आणणे हे डॉक्टरसाठी एक आव्हान असते. ते पेलत असताना त्याला आपले वैद्यकीय कौशल्य अगदी पणाला लावावे लागते.
बेशुद्धावस्थेची विविध कारणे, संबंधित रुग्णतपासणी व त्याचे निष्कर्ष आणि अशा रुग्णाचे भवितव्य या सगळ्यांचा आढावा या लेखात घेत आहे. सुरवातीस आपली जागृतावस्था आणि मेंदूचे संबधित कार्य यांची माहिती देतो. त्यातून पुढे माणूस बेशुद्धावस्थेत कसा जातो हे समजेल.
लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधारे असेल:
१. जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य
२. बेशुद्धावस्थेची कारणे
३. रुग्णतपासणी
४. उपचार, आणि
५. रुग्णाचे भवितव्य
जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य:
हे समजण्यासाठी मेंदूची संबंधित रचना जाणली पाहिजे. ढोबळपणे मेंदूचे ३ भाग असतात: मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि मेंदूची नाळ (stem). मोठ्या मेंदूच्या बाहेरील आवरणाला cortex असे म्हणतात. हा भाग जैविकदृष्ट्या सर्वात उत्क्रांत असतो. तिथे सर्व मज्जातंतूंच्या संदेशांचे एकीकरण होते.
याउलट मेंदूची नाळ ही जैविकदृष्ट्या सर्वात प्राचीन भाग आहे. तिच्यामध्ये RAS नावाची एक ‘सक्रीय यंत्रणा’ असते. तिच्यातील मज्जातंतूंत सतत काही रासायनिक क्रिया होतात. त्यातून cortexला संदेश जातात. RAS आणि Cortex यांच्या समन्वयातून आपली जागृतावस्था टिकवली जाते. जेव्हा कुठल्याही कारणाने या यंत्रणेवर विपरीत परिणाम होतो, तेव्हा संबंधिताची शुद्ध जाऊ शकते.
बेशुद्धावस्थेची कारणे:
अनेक प्रकारचे आजार आणि डोक्याला जबरी मार बसणारे अपघात यांमध्ये व्यक्ती बेशुद्ध होते. काही प्रमुख कारणे आता समजून घेऊ.
१. मेंदूच्या रक्तपुरवठ्यातील अडथळा: याची दोन कारणे आहेत :
अ) रक्तवाहिन्या त्यांच्यात साठलेल्या मेद-थरांमुळे आकुंचित वा बंद होणे (Stroke)
आ) रक्तवाहिनी फुटणे.
या कारणामुळे येणारी बेशुद्धी ही बरेचदा अचानक येते. बऱ्याचदा अशा रुग्णांना लकवा / पक्षाघात झालेला असतो.
२. अपघात : बऱ्याच वाहन अपघातांत डोक्यास जबरी मार लागतो. तसेच डोक्यावर कठीण वस्तूचा जोराचा प्रहार हेही महत्वाचे कारण आहे.
३. औषधांची विषबाधा: मेंदूला गुंगी आणणारी औषधे (प्रामुख्याने opium गट) आणि अन्य घातक पदार्थ अतिरिक्त प्रमाणत घेणे. हे मुख्यतः व्यसनी लोकांत आढळते. तसेच आत्महत्या वा खून करण्यासाठी देखील यांचा वापर होतो. जवळपास ४०% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते.
४. हृदयक्रिया बंद पडणे: हृदयविकाराचा तीव्र झटका व अन्य काही आजारांत जर हृदयस्पंदन थांबले (arrest) तर मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होतो. जवळपास २५% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते.
५. जंतूसंसर्ग: विशिष्ट जिवाणू आणि विषाणूंमुळे मेंदूदाह किंवा मेंदूच्या आवरणांचा दाह होतो. हे आजार गंभीर असतात.
६. ग्लुकोजच्या रक्तपातळीचे बिघाड: मेंदूला ग्लुकोजचा योग्य प्रमाणात पुरवठा सतत आवश्यक असतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी अति वाढणे अथवा कमी होणे या दोन्ही कारणांमुळे बेशुद्धावस्था येते. आता ही दोन्ही कारणे विस्ताराने बघू.
अ) ग्लुकोजची पातळी अति वाढणे : याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अनियंत्रित मधुमेह. जेव्हा ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा शरीरातील भरपूर पाणी मूत्रावाटे निघून जाते (dehydration). त्यातून एकूण रक्तपुरवठा खूप मंदावतो(shock). तसेच अशा रुग्णास खूप उलट्याही होत असतात. त्यातून दुष्टचक्र होऊन परिस्थिती अजून बिघडते.
आ) ग्लुकोजची पातळी खूप कमी होणे: जेव्हा ही पातळी ४० mg/ dL चे खाली जाऊ लागते तेव्हा मेंदूच्या कार्यात बिघाड होऊ लागतो. जर का ती २० mg इतकी खाली गेली तर रुग्ण बेशुद्ध होतो.
ही पातळी कमी होण्याची प्रमुख कारणे अशी: मधुमेहीने घेतलेला इन्सुलिनचा अतिरिक्त डोस, स्वादुपिंडातील अति-इन्सुलिन निर्माण करणाऱ्या गाठी, यकृत आणि मूत्रपिंडाचे तीव्र आजार आणि फाजील मद्यसेवन. मद्यपी लोकांत मद्यपानाच्या जोडीला अन्य व्यसनी पदार्थांचे सेवन सुद्धा असू शकते. तसेच असे लोक जबरी वाहन अपघातालाही आमंत्रण देतात.
७. चयापचयातील अन्य बिघाड: यामध्ये रक्तातील सोडियमची पातळी खूप कमी वा जास्त होणे आणि काही हॉरमोनचे बिघाड यांचा समावेश आहे.
८. अपघाती विषबाधा: यामध्ये मुख्यतः कार्बन मोनोऑक्साइड व शिसे यांचा समावेश आहे. खाणी किंवा गटारातील कामे करणाऱ्यांना कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा होऊ शकते. हा वायू आपल्या रक्तात हिमोग्लोबिनला घट्ट चिकटतो आणि त्यामुळे असे हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे वहन करू शकत नाही.
रुग्णाची शारीरिक तपासणी:
सर्वप्रथम रुग्णाचे नातेवाईकांकडून त्याचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे असते. यात व्यसनाधीनता, पूर्वीचा आजार, औषधे आणि अपघात या माहितीचा समावेश होतो.
प्रत्यक्ष तपासणी करताना डोक्याला मोठी जखम आहे का आणि हातापायाच्या त्वचेवर सुया टोचल्याच्या खुणा पाहतात. मग रुग्णास चिमटे काढून तो काही प्रतिसाद देतो का अथवा डोळे उघडतो का, हे पाहतात. तसेच मनोरुग्णांचे बाबतीत ते बेशुद्धीचे सोंग करीत नाहीत ना, हेही पहावे लागते. शरीर-तापमान पाहणे महत्वाचे. रुग्णाच्या नाडी आणि श्वसनाची गती आणि ताल हे काळजीपूर्वक पहिले जाते. दोन्ही डोळ्यातील बाहुल्यांचा आकार आणि त्यांनी टॉर्चच्या प्रकाशाला दिलेला प्रतिसाद पाहणे हेही महत्वाचे ( विशेषतः ओपियम गटातील रसायनांची विषबाधा झाली असल्यास).
निरोगी डोळ्याच्या बाहुल्या :
ओपियम गटातील रसायनांची विषबाधा : डोळ्याच्या बाहुल्या :
याव्यतिरिक्त रुग्णाचे विविध प्रतिक्षिप्त प्रतिसाद तपासले जातात.
पूर्ण शारीरिक तपासणीनंतर बेशुद्धीची खात्री केली जाते आणि तिची तीव्रता ठरवली जाते. आता पुढची पायरी म्हणजे बेशुद्धीचे कारण ठरवणे. त्यासाठी विविध प्रयोगशाळा आणि प्रतिमाचाचण्या कराव्या लागतात.
प्रयोगशाळा चाचण्या
१. रक्त: यावरील चाचण्या ३ गटांत मोडतात. रक्तनमुन्यात खालील रासायनिक घटक गरजेनुसार मोजले जातात.
अ) ग्लुकोज, कॅलशियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, युरिआ आणि क्रिअॅटिनिन.
आ) ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण, अमोनिआ
इ) विशिष्ट औषधांचे प्रमाण
२. पाठीच्या मणक्यातील द्रव (CSF) : जेव्हा मेंदूच्या जंतूसंसर्गाची शक्यता वाटते तेव्हा ही तपासणी केली जाते. त्यात जंतूंचा शोध घेणे आणि काही रासायनिक चाचण्या करतात.
प्रतिमा चाचण्या
यात मुख्यत्वे CT अथवा MRI स्कॅन आणि EEG (मेंदू-विद्युत आलेख) यांचा समावेश असतो. त्यातून मेंदूला झालेल्या इजेबद्दल सखोल माहिती मिळते.
वरीलपैकी योग्य त्या चाचण्या झाल्यावर बेशुद्धीचे निदान केले जाते. आता त्यानुसार उपाय केले जातात.
उपचार आणि रुग्णाचे भवितव्य
अशा रुग्णांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवले जाते. त्यांच्यावर उपचार करताना प्रथम त्यांच्या श्वसन व रक्ताभिसरण या मूलभूत क्रियांवर लक्ष केंद्रित केले जाते. गरजेनुसार रुग्णाच्या श्वासनलिकेत नळी घातली जाते. तिचा उपयोग कृत्रिम श्वसन देण्यासाठी होतो. बेशुद्धीच्या कारणानुसार शिरेतून औषधे देऊन उपचार केले जातात.
आता रुग्ण शुद्धीवर कधी येणार हा कळीचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर मेंदूस किती प्रमाणात इजा झाली आहे, यावर ठरते. ती मध्यम स्वरूपाची असल्यास काही दिवसांत रुग्ण शुद्धीवर येतो. मात्र ती गंभीर स्वरूपाची असल्यास तो महिनोंमहिने बेशुद्धीत राहू शकतो. त्यानंतर पुढे ३ शक्यता असतात:
१. काही रुग्ण बरे होतात
२. काही मृत्यू पावतात, तर
३. काही vegetative अवस्थेत राहतात.
vegetative अवस्था
आता ही अवस्था आणि निव्वळ बेशुद्धावस्थेतील फरक समजून घेऊ. बेशुद्ध माणूस निद्रिस्त आणि जाणीवरहित असतो. तर vegetative अवस्थेतील माणूस हा “जागा” असला तरी पूर्णपणे ‘जाणीवविरहित’ असतो. असे रुग्ण हे वेळप्रसंगी डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करू शकतात. तसेच ते ‘झोपी जाणे’ आणि ‘जागे होणे’ या अवस्थांतून जाऊ शकतात. पण, त्यांना कुठलेही आकलन (cognition) होत नाही. एक प्रकारे ही ‘जागृत बेशुद्धावस्था’ (coma vigil) असते ! म्हणजेच असा रुग्ण हा केवळ कागदोपत्री जिवंत पण काहीही समजण्यास वा करण्यास असमर्थ असतो. असा रुग्ण जर या अवस्थेत १ महिन्याहून जास्त काळ राहिला तर तो कायमच्या अशा अवस्थेत गेल्याची नोंद होते. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्या रुग्णावरील सर्व ‘जीवरक्षक उपाय यंत्रणा’ बंद करण्याची कायदेशीर परवानगी (काही देशांत) मिळते.
***
अनेक प्रकारचे अपघात, गंभीर आजार, व्यसनांचा अतिरेक अशा अनेक प्रसंगांत माणूस बेशुद्ध होतो. आपल्या कोणाच्याही कुटुंब अथवा परिचयातील व्यक्तीवर अशी वेळ येऊ शकते. अशा दुःखद प्रसंगाला सामोरे जाताना आपल्याला मनोबल वाढवावे लागते. त्या दृष्टीने बेशुद्धावस्थेची मूलभूत माहिती या लेखात दिली आहे. वाचकांना ती उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
*************************************************************
'vegetative ' (अवस्था) साठी मराठी शब्द जरूर सुचवावा ही वि.

वाचने
66542
वाचनखूण
प्रतिक्रिया
106
'vegetative ' (अवस्था) साठी
आसन्नमरण हा शब्द कदाचित जवळ
In reply to आसन्नमरण हा शब्द कदाचित जवळ by सुबोध खरे
उत्तम व सोपा शब्द
बरोबर !
अचेतन ?
....
In reply to .... by हेमंतकुमार
"गतभान" असा शब्द योजता यावा.
मृतप्राय हा एक शब्द होऊ शकतो.
In reply to मृतप्राय हा एक शब्द होऊ शकतो. by आनन्दा
यात जवळ जवळ मेल्यात जमा आहे
" भाजीपाल्यावत " हा शब्द
याच्या उलट अवस्थाही असते.
In reply to याच्या उलट अवस्थाही असते. by गवि
गवि,
In reply to गवि, by हेमंतकुमार
धन्यवाद
In reply to धन्यवाद by गवि
कौतुकास्पद !
In reply to कौतुकास्पद ! by हेमंतकुमार
स्टीफन हॉकिंग्जचं संशोधन आणि
In reply to स्टीफन हॉकिंग्जचं संशोधन आणि by गवि
मस्त ..
In reply to धन्यवाद by गवि
Diving bell & the butterfly
In reply to धन्यवाद by गवि
काय!
In reply to गवि, by हेमंतकुमार
हा एक काय प्रकार आहे
In reply to हा एक काय प्रकार आहे by मराठी_माणूस
मराठी माणूस,
In reply to मराठी माणूस, by हेमंतकुमार
डेंजर प्रकार आहे हा.
सर्वांना धन्यवाद.
वैद्यकिय-आरोग्य विषयावरच्या
हे शब्द कोडे काय आहे
हे शब्द कोडे काय आहे
In reply to हे शब्द कोडे काय आहे by Rajesh188
राजेश,
In reply to हे शब्द कोडे काय आहे by Rajesh188
The reticular activating
कोमामध्ये रुग्णाच्या अन्न
वरील सर्वांचे
अभ्या,
In reply to अभ्या, by हेमंतकुमार
डोके व मानेस जबरी इजा
In reply to अभ्या, by हेमंतकुमार
अभ्या,
In reply to अभ्या, by हेमंतकुमार
अभ्या,
In reply to अभ्या, by हेमंतकुमार
हे सांगितले ते बरे झाले, साला
In reply to हे सांगितले ते बरे झाले, साला by आनन्दा
चित्रपट आणि मालिकांमधील काही
In reply to चित्रपट आणि मालिकांमधील काही by डॉ सुहास म्हात्रे
इनोदनिर्मिती !
In reply to चित्रपट आणि मालिकांमधील काही by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रेकाका चक्क "माझ्या
In reply to म्हात्रेकाका चक्क "माझ्या by अभ्या..
इतर अनेक घरांत चालू असतात
माझ्या बायकोचा नवरा(की नवऱ्याची बायको?)नावात काय आहे? आपला ईनोदाशी मतबल. भावनाओंको समजो. बाकी, सिरियलचे बरोबर नाव ताबडतोप सांगितल्यामुळे, तू मराठी सिरियल्स मन लावून पाहतोस (किंवा त्या पहाव्या लागतात) हे सिद्ध झाले आहे. =)) =)) =))In reply to अभ्या, by हेमंतकुमार
मूळ अधोरेखित पाहता:
In reply to मूळ अधोरेखित पाहता: by गवि
अपघात आणि ‘विस्मरण’..
In reply to अभ्या, by हेमंतकुमार
शतशः धन्यवाद
गवि,
अतिशय कठिण विषयाचे उत्तम
धन्यवाद!
सर्व नवीन प्रतिसदकांचे
'vegetative ' (अवस्था) साठी
शेखर, पूर्ण सहमत.
वजन १.५ किलो पण नाही
अजब...
माहितीपुर्ण लेख
In reply to माहितीपुर्ण लेख by मराठी कथालेखक
जोडप्रश्न
In reply to माहितीपुर्ण लेख by मराठी कथालेखक
सख्खे नातेवाईक आणि फॅमिली
म.क., धन्यवाद
In reply to म.क., धन्यवाद by हेमंतकुमार
सन्मानाने मरण्याचा हक्क
काही गोष्टी विपरीत घडतात
मुद्देसूद तरीही रोचक पद्धतीने
अनिंद्य, धन्यवाद
आमच्याकडून दंडवत स्वीकारा
@ कुमार१
In reply to @ कुमार१ by खिलजि
बदला..
In reply to बदला.. by चिगो
=)) =)) =))
खिलजी,
जाणीव होते
नाही,
In reply to नाही, by हेमंतकुमार
मृत्यू च म्हणावं लागेल मग
vegetative ला प्रतिशब्द
गा पै, धन्यवाद .
फ्लावरचा गड्डा की विधात्याची कमाल ?
चौरा, धन्यवाद !
पेशीबाह्य आक्रमणाचे पासून मेंदूचे रक्षण कोण करते ? त्या रक्षा भिंतीची ही काही मर्यादा असेल ना ? नाहीतर मस्तिष्कावरण दाह कसा झाला असता ?>>>>> शरीराचा रक्तप्रवाह आणि मेंदू यांना वेगळे करणारी जी रक्षाभिंत आहे तिला Blood Brain Barrier (BBB) असे म्हणतात. ती भिंत म्हणजे सूक्ष्म रक्तवाहिन्यांतील विशिष्ट पेशी असतात. निरोगीपणात ही भिंत जीवाणूंना मेंदूत शिरू देत नाही. पण जेव्हा काही तीव्र जंतूंचा शरीरात प्रवेश होतो, तेव्हा ते या भिंतीला दुबळी बनवतात. मग त्यांची विषे मेंदूत शिरतात.शंकानिरसन २.
मेंदू एंडो क्राइन संस्थांचे ही काही काम करत असतो .या संस्थांचे काम हे मनुष्य बेशुद्धावस्थेत असताना चालू असते का ?>>> होय, हे काम तेव्हाच्या चयापचयाच्या गरजेनुसार चालू असते. जेव्हा मेंदूस गंभीर मार लागलेला असतो, तेव्हा तर अनेक हॉर्मोन्सच्या पातळीत चढउतार होत राहतात. त्यामध्ये प्रामुख्याने थायरोईड, TSH, इन्सुलिन आणि ग्रोथ हॉर्मोन यांचा समावेश आहे.Blood Brain Barrier
In reply to Blood Brain Barrier by जॉनविक्क
जॉनविक्क ,
प्रश्न चे उत्तर हवे आहे विश्लेषण नको
In reply to प्रश्न चे उत्तर हवे आहे विश्लेषण नको by Rajesh188
स्वामीला इचारा कि!
समारोप
वाह डॉक्टर साहेब,
टर्मिनेटर,
पुण्यात गांजा पिणाऱ्या/ओढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील देशात सर्वात जास्त झाली आहे.>>>>> ......हे धक्कादायक आहे. वाईट वाटले.खूपच छान, माहितीपूर्ण आणि सुबोध लेख....
खालील प्रतिमा दिसल्या नाहीत....
नितीन,
नेहमीप्रमाणे एक सुरेख .......
सुधीर,
शाकावस्था ....
धन्यवाद,
क्षुप = झुडुप वा झाळकट. इंग्रजीत ......
क्षुप = झुडुप वा झाळकट. इंग्रजीत ......
बिहार मधील मुलांचे मृत्यू
In reply to बिहार मधील मुलांचे मृत्यू by हेमंतकुमार
याबाबत इथे तज्ज्ञांनी,
बिहार : गूढ वाढले !
In reply to बिहार : गूढ वाढले ! by हेमंतकुमार
या प्रकरणात लिचीची शेती