२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने.......
लेखनप्रकार
२०१९ च्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने.......
एक शहरात राहणारी, मध्यम वयातील स्त्री; देशात होणाऱ्या सततच्या राजकीय घडामोडींमुळे जिच्या आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही तिने २०१९ च्या देशाच्या निवडणुकीत मनापासून मतदान केलं. मोठी लाईन लागलेली होती मतदानासाठी. खूप उकडत होतं; प्रौढ मतदारांना पुढे जाण्याची परवानगी असल्याने असलेल्या रांगेमध्ये देखील अजून वेळ लागत होता... तरीही ही स्त्री उभी होती. 'मी माझा मतदानाचा हक्क.... किंबहुना जवाबदारी जर आज पूर्ण केली नाही आणि असंच एक-एक करत अनेकांनी मत दिलं नाही तर कदाचित काँग्रेस म्हणजेच पर्यायाने राहुल गांधी निवडून येईल.... नको रे बाबा! मोदीच बरे आहेत.' अशी भावना तिच्या मनात होती आणि रांगेत उभं राहून इतरांशी बोलताना तिच्या लक्षात येत होतं की इतरांच्या मानत देखील हेच भाव आहेत.... आणि मग 'मोदीच बरे आहेत'; असं आपल्याला का वाटतंय बरं याचा ती विचार करायला लागली.
मोदी आल्यामुळे माझ्या आयुष्यात फार काही फरक पडला नाही हे खरंय; पण....... अलीकडे कॉलेजमध्ये जाणारी माझी दोन्ही मुलं देशात होणाऱ्या घडामोडींवर बोलताना दिसतात. माझ्या तारुण्यात काहीतरी बफोर्स नावाचा भ्रष्टाचार झाला होता. जन्मले तेव्हा इमर्जन्सी का असंच काहीतरी होतं असं आई सांगायची. पण आपण कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं देशात घडणाऱ्या घटनांबद्दल जागरूक असणं....... मनाला समाधान देऊन जातं.
मोदींनी 'घर घर शौचालय' योजना सुरू केल्याचं वाचलं आणि घरी कामाला येणाऱ्या आशाताईंना त्याबद्दल सांगितलं. त्यांच्या सासूबाई तशा बऱ्याच वृद्ध आहेत त्यामुळे त्यांना सार्वजनिक शौचालयात जायला खूप त्रास व्हायचा. रात्री घरातच पॉट द्यावं लागायचं. घरात सासूबाई आणि आशाताईंव्यतिरिक्त त्यांच्या दोन वयात आलेल्या मुली आणि एक मुलगा आणि नवरा इतकी माणसं. त्यामुळे पॉट देताना देखील खूप अडचण असायची. त्यामुळे त्यांनी 'घर घर शौचालय' बद्दल लगेच चौकशी सुरू केली. जवळ जवळ तीन वर्षांनंतर त्यांच्या घरात त्यांनी शौचालय बांधून घेतलं. त्या म्हणाल्या खूप मागे लागावं लागलं हो; पण आता समाधान वाटतं. लेकी देखील मोठ्या झाल्यात. बाहेर जाण्यापेक्षा आता त्या घरातलंच शौचालय वापरतात. आशाताईंचं बोलणं.......... मनाला समाधान देऊन गेलं.
एकदिवस नवरा ऑफिसमधून आला आणि म्हणाला आपण गॅसची सबसिडी सोडून देऊ. मी लगेच हिशोबाला बसले. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. मग गॅस कंपनीमध्ये जाऊन चौकशी करून सगळ्या formalities पूर्ण केल्या. अलीकडे अनेक जाहिराती बघते आहे की गावांमधल्या स्त्रियांना गॅस मिळायला लागला आहे. आता त्यांचा लाकडं जमवून चूल पेटवायचा त्रास बंद झाला आहे. एका स्त्रीचा सुखावलेला चेहेरा जाहिरातीत दिसतो. कदाचित ती खरी महिला नसेलही. कोणी कलाकार असेल. पण त्या जाहिरातीत सत्यता आहे; हे............ मनाला समाधान देऊन जातं.
२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदीजींनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते झाडायला सुरवात केली तेव्हा मनात आलं होतं... काय पण स्टंटबाजी आहे. असं पंतप्रधानाने झाडल्याने स्वच्छता होते का? इतर महत्वाची कामं सोडून हे काय करायला लागले मोदी? पण अलीकडे घराच्या कोपऱ्यावरची कचरा पेटी वाहून जात नसते... आणि असलीच तर मी लेकाला त्याचा फोटो काढून फेसबुकवर टाकायला सांगते. लगेच सफाईला सुरवात होते. हा दिसणारा बदल........ मनाला समाधान देऊन जातो.
मोदींच्या काळात समजायला लागलं की आपले जवान किती प्रतिकूल परिस्थितीत राहातात. पाकिस्तान सतत त्यांच्यावर छुपे हल्ले करतच असतो. आजवर आपल्या जवानांचे हात बांधलेले होते. त्यामुळे ते फक्त स्वतःचा बजाव करत होते. पण आता केंद्र सरकारने त्यांना free hand दिला आहे. त्यामुळेच होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला आपले जवान देखील जोरदार उत्तर द्यायला लागले आहेत. माझ्या देशाच्या सीमारेषा आता सुरक्षित हातात आहेत. गेली पाच वर्ष देशाचे पंतप्रधान दिवाळी त्या जवानांमध्ये जाऊन साजरी करतात. हा विचार........ मनाला समाधान देऊन जातो.
नोट बंदीचा किती त्रास झाला. इतकी चिडचिड व्हायची माझी. मी एकटीच होते न रिकामटेकडी घरात. त्यामुळे सतत बँकेच्या रांगेत जाऊन उभं राहायला मीच होते. त्यात पै-पै जोडून नवऱ्याला न सांगता जमवले दिड लाख रुपये बँकेत जमा करायला लागले होते. इतका राग आला होता त्या मोदींचा. यांचं काय जात एका दिवसात सगळं बदलायला? याला ना घर ना दार.... ना बायको ना पोर.... आमचं कसं होणार? पण मग एक दिवस एक रिक्षावाला भेटला. म्हणाला भाभी घर मे बहुत पैसा पडा था. तो मैने बीबी का अकाऊंट खोला. मोदीने लेडीज को जादा फायदा दिया हें ना बँक मे. बहुत तकलीफ हुवा. लेकीन अपने को तो सिर्फ लाईन मे खडा रहना था. ये काला पैसा वालोको मोदीने अछा सबक सिखाया. त्याचं बोलणं ऐकलं आणि मनात आलं खरंच की; खोट्या नोटा आता बंद होतील. मला माझे दीड लाख नवऱ्याला सांगावे लागले. पण ते माझ्या अकाऊंट मध्ये जमाँ तर झाले. हे काळा पैसा वाले तर कर्माने गेले. मग लक्षात आलं; कितीतरी लोकांनी माझ्याप्रमाणे पैसे बँकेत ठेवायला सुरवात केलीय. त्यामुळे देशाची आथिर्क स्थिती सुधारते आहे. हे सगळंच...... मनाला समाधान देऊन जातं.
तसं बरंच काही केलं की त्यांनी. अधून मधून नवरा आणि मुलांच्या चर्चमधून कळत असतं आपल्याला.
ती अजूनही मतदानाच्या रांगेत उभी होती. अजूनही ती विचार करत होती. तरीही 'मोदीच बरे' अस का?
तिच्याच मनाने तिला विचारलं......
मग कोण राहुल गांधी? त्याचं ते बालिशपणे वागणं. मोदींना त्याने म्हणे भर संसदेत मिठी मारली होती आणि मग डोळा मारला होता. बघितला होता मी तो व्हिडियो. शोभतं का हे असलं वागणं त्याला? अरे लग्न नाही केलंस तू. पण म्हणून तू काही पंचवीशीतला नाहीस न. आमच्या देवेंद्र फडणविसाच्या वयाचा आहेस. त्याची प्रगल्भता बघ की जरा. राज्य चालवतो आहे तो. दिसायला कसा गोंडस बाळासारखा आहे. कायम हसतो. वाटतं आपलं सगळं म्हणणं एकूण घेईल. पण पक्का आहे हो निर्णय घेताना. 'मनात आलं तेच केलं; विकासाच्या मार्गाने राज्याला नेलं;' हे दाखवून दिलं की त्यानं. नाहीतर तू! माझे बाबा महान.... माझी आजी महान... मी.... माझी आई... माझी बहीण.... यातच अडकलास. तू जर झालास पंतप्रधान तर मलाच देश सोडून जावं लागेल.
समजा मोदीही नाही आणि राहुल देखील नाही..... मग कोण ती ममता? की ते यादव? अरे देवा!
मोदींनी काही सगळे प्रश्न सोडवले नाहीत. पण किमान त्यांच्या असण्याने प्रश्न सुटतील ही आशा आहे.
अजून तास लागला तरी चालेल मत देऊनच बाहेर पडणार मी!!! एकदाचा तिचा नंबर लागला आणि मतदान करून आणि आपण केलेल्या मतदानाची खात्री करून ती समाधानाने बाहेर पडली.
मात्र............. २३ मे ला घरातले सगळे बाहेर पडले आणि तिने टीव्ही चालू करून ठेवला. आपली कामं आवरताना अधून मधून ती अंदाज घेत होती. 'काय होतंय ग बाई? मोदीच आले पाहिजेत हो.' तिने आशाताईंना म्हंटलं. त्या देखील म्हणाल्या;"वहिनी, त्योच येणार हो. मला काय बी चिंता न्हाई." आशाताईंचा आत्मविश्वास बघून तिला देखील बरं वाटलं. दुपार पर्यंत तिला देशाचा कल समजायला लागला आणि समाधानाने तिने टीव्ही बंद केला. संध्याकाळी नवरा आला तोच सांगत की मोदींच भाषण आहे आता आणि परत एकदा तिने घाईघाईने टीव्ही लावला.
मोदी म्हणत होते....... तुमच्या विश्वासाला तडा जाऊ नाही देणार. फक्त आणि फक्त देशाचाच विचार करिन. पुढच्या पाच वर्षात जितकी म्हणून प्रगती करणे शक्य आहे ती करेन. कदाचित चूक झाली तर ती सुधारेन.... पण चूक त्याचीच होते जो मार्गक्रमण करतो आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला आहात त्याने फुशारून जाणार नाही. चला कामाला लागुया!
रात्रीच्या जेवणाची तयारी करताना तिच्या मानत येत होतं आईचे संस्कार चांगले हो! शहरातली असो किंवा गावातली. शिक्षित असो किंवा अशिक्षित..... संस्कार तर तेच असतात न!
वाचने
23600
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
सुंदर.
छान लिहीलंय.
सुंदर लेख.
:-)
In reply to :-) by राघव
>>> साधारण सर्वत्र सामान्य
मनापासून धन्यवाद
+1
छान लिहिलेय !
सहमत
In reply to सहमत by गोंधळी
स्वातंत्र्यानंतर ६५ वर्ष
In reply to स्वातंत्र्यानंतर ६५ वर्ष by डँबिस००७
अभ्यास वाढवा..
In reply to अभ्यास वाढवा.. by प्रियाभि..
प्रियाभि
In reply to अभ्यास वाढवा.. by प्रियाभि..
ईतिहासाचा आपला अब्यास खुप
नवऱ्याला न सांगता जमवले दिड लाख रुपये
In reply to नवऱ्याला न सांगता जमवले दिड लाख रुपये by mayu4u
:) खिक्क!
मस्त लिहिले आहे ज्योती ताई,
जबरा
In reply to जबरा by नाखु
छान लेख.
छान
इथे मिपावर बरेच तज्ञ आहेत असे
In reply to इथे मिपावर बरेच तज्ञ आहेत असे by एमी
मी तज्ज्ञ अजिबात नाही. तुमचा
In reply to इथे मिपावर बरेच तज्ञ आहेत असे by एमी
ती जी घरघर शौचालय योजना आहे,
सुंदर!
In reply to सुंदर! by समीरसूर
मग आहे कोण? कुणीच नाही.
मग आहे कोण? कुणीच नाही.-- योगी आदित्यनाथ आहेत ना.आजची ही स्थिती
In reply to आजची ही स्थिती by चौकटराजा
चौकतराजा,
In reply to आजची ही स्थिती by चौकटराजा
चौकतराजा,
In reply to चौकतराजा, by ज्योति अळवणी
.
In reply to . by दादा कोंडके
अरे वा
In reply to आजची ही स्थिती by चौकटराजा
मोदींचे फेल्युअर
In reply to मोदींचे फेल्युअर by ट्रेड मार्क
धागा नीट वाचा ..
In reply to धागा नीट वाचा .. by चौकटराजा
दुरुस्ती
In reply to दुरुस्ती by चौकटराजा
राजाजी
प्रशासनातं एक वर्क कल्चर निर्माण करणे हे राजकीय पुढार्याचे काम नसले तरी ते पी एम व सी एम यांचे काम नक्की आहे कारण ते पुढारी नव्हेत प्रशासक आहेत.ठीक आहे. पण वर्क कल्चर वर्षानुवर्षे तयार होत असते ते काही एकदम बदलता येत नाही. इथे तुम्ही फक्त देवेंद्र आणि नरेन्दला दोष देण्याऐवजी एकूणच वर्क कल्चर दशकानुदशके कसे चालत आहे हे म्हणलं असतात तर संयुक्तिक झालं असतं.पाकिस्तानला जा हा संदेश मला मिपावर येणार हे मी जाणून होतोच त्यात नवल काही नाहीपाकिस्तानला जा कोण म्हणलंय? जे ठिकाण आवडत नाही तिथे आपण रहात नाही, म्हणून जर तुम्हाला भारतात एवढे प्रॉब्लेम दिसत आहेत आणि सुधारणांचे चाललेले प्रयत्न जर दिसत नाहीयेत, तर तुमच्या पसंतीच्या ठिकाणी जाऊन राहू शकता एवढेच सांगणे आहे. पाकिस्तान तुमच्या मनात आहे ते आमच्यावर टाकू नका. तिकडे जायचे असेल तर तिकडे जा.पोलिसास नुसती तक्रार दिलेली नाही तर संशयिताचा फोटो व मोबाईल क्र दिलेला होता पोलीस त्याचशी बोलले तरी तो फोन बंद करीत असून आपल्याला तो दाद देत नाही असे म्हणणारे पोवीस तुमचे जवळचे नातेवाइक तर नाहीत ना ?फसवणारा मेकॅनिक तुमचा जवळचा नातेवाईक होता का, ज्याला तुम्ही असेच पैसे दिलेत? आणि आता मग उगाच पंप्र आणि मुम वर आरोप करत फिरत आहात? तुम्ही वैयक्तिक झाल्यामुळे दुर्दैवाने मला हे म्हणायला लागत आहे. डी एस कुलकर्णी केस बरोबर तुमच्या केसची तुलना म्हणजे..... या प्रतिसादात डँबिस००७ यांनी म्हणल्याप्रमाणे पोलिसांची अपुरी संख्या, अपुरा पगार, अपुऱ्या सुविधा, वेडेवाकडे कामाचे तास याचा पण विचार करा. पोलिसांच्या दृष्टीने बघता तुम्ही तुमच्या निष्काळजीपणामुळे पैसे स्वतःच्या हाताने देऊन बसलात आणि मग त्याचा फोटो, चेपू प्रोफाईल वगैरे दाखवून मी किती शहाणा हे दाखवत आहात असं वाटणं साहजिक आहे. बाकी पैसे दिल्याचं आणि त्याबदल्यात काय सेवा ठरली होती व तसेच कुठली सेवा मिळाली नाही हे तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करता येईल अशी आशा करतो. अर्थात, तुम्हीच म्हणलं आहे "गुन्हा एन सी ( अदखलपात्र ) असल्याने पोलीस अगदी कायद्याने आपला अर्ज फाईल मध्ये फेकू शकतात.". तरी पण पोलीस कायदा सोडून वागत आहेत असं तुम्हाला वाटतंय?In reply to धागा नीट वाचा .. by चौकटराजा
गेल्या ४०-५० वर्षांत
In reply to गेल्या ४०-५० वर्षांत by डँबिस००७
श्रीकर परदेशी
In reply to श्रीकर परदेशी by चौकटराजा
उत्तम वर्क कल्चर चे उदाहरण
In reply to श्रीकर परदेशी by चौकटराजा
महाराष्ट्र पोलीस नालायक आहेत
दुर्दैवाने मोदींच्या कामाची
स्म्रुती इराणीनी त्यांच्या
In reply to स्म्रुती इराणीनी त्यांच्या by विजुभाऊ
या भागात कोंग्रेस हे काम का
या भागात कोंग्रेस हे काम का करू शकली नाही कोण जाणे .-- असे न करण्यामागे कॉंग्रेसचा 'गरिबी हटाव' सारखा उदात्त हेतू असावा. -- जसे एकदा का देशातून गरिबी हटली की कॉंग्रेसची सत्ता गेली अशी त्यांना भिती वाटत होती. अगदी तशीच भिती कॉंग्रेसच्या चार पिड्यांच्या नेत्यांना अमेठीबाबत वाटत असावी, एकदा का अमेठीतील जनतेला सर्व प्रकारच्या सुख-सोयी मिळाल्या की आपला पत्ता कट होईल हे जाणून त्यांनी तिथे तुम्ही म्हणताय त्या प्रथामिक सोयी देखील पुरवल्या नाही.In reply to या भागात कोंग्रेस हे काम का by प्रसाद_१९८२
हे एकदम परफेक्ट बोललात.
In reply to या भागात कोंग्रेस हे काम का by प्रसाद_१९८२
घर घर शौचालय !! ह्या योजने
छान
असहमत मुद्दे..
छान लेख
In reply to छान लेख by धर्मराजमुटके
पण
In reply to छान लेख by धर्मराजमुटके
धर्मराजमुटके साहेब ,
वाचा: कॉग्रेस हा ‘पक्ष’ नाही
चित्रगुप्त जी
काँग्रेसचे सरकार सदा सर्वकाळ
In reply to काँग्रेसचे सरकार सदा सर्वकाळ by सुबोध खरे
हि लाजिरवाणी स्थिती कोणी केली
The 1991 Indian economic
In reply to The 1991 Indian economic by सुबोध खरे
जाऊ द्या
हे मात्र खरे आहे