✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टिंग्डि टिडिडिडि

व
वपाडाव यांनी
Fri, 04/05/2019 - 14:43  ·  लेख
लेख
टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग. . 1994 सालची गोष्ट आहे. अर्थात हे सर्व समजण्याचं वयही नव्हतं तेव्हा. फारतर चवथ्या इयत्तेत असेन. आमची आवड त्याकाळी 'हम आपके है कौन' टाइप सिनेमा पुरती मर्यादित होती. आणि आवडते गाणे माइ नी माइ. (किंबहुना तेच दाखवले जात असल्यामुळे आमचा व्यासंगही इतका विस्तृत नसेल. 'अ आ ई, उ ऊ ऊ, मेरा दिल ना तोडो' वगैरे निषिद्ध होतं तिथे हे काय?) . पण तारुण्यात प्रवेश केला आणि ह्या गाण्याची महती समजली. . टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग . ए $$ हे $$ आ $$ हा $$ हा $$ हा हे $$ हे $$ आ $$ हा $$ हा . टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग . हा रिदम ऐकल्यावर ज्याच्या अंगावर शहारे-रोमांच-काटे येत नाहीत असा माणूस विरळा. . पिवळ्या-करड्या रंगाच्या अर्धपारदर्शक शिफॉन साडीत, भरलेल्या अंगाची, उंचपूरी, सौंदर्य-मादकता यांचा मिलाफ असलेली, कमनीय शरीराचं देणं लाभलेली, पहिल्या पावसाच्या सरिंनी भिजलेली, कामातुर रविना डोळ्यासमोर येत नसेल तर नवल! . तब्बल 25 वर्षे. दोन तप झाले. तरीही काल-परवा ऐकल्यासारखं वाटतंय. अगदी परिपूर्ण गाणं आहे हे. गेयता, नर्तनमूल्य व प्रणय या सर्वांनी ओतप्रोत भरून, ओथंबुन वाहणारा प्रपात. गाण्यातील शब्द-अर्थ-लय एकदम सुसंबद्ध आहे. संगीतकाराने चढत्या चालीचा केलेला वापरही अप्रतिम. *ए-हे-आ-हा-हा-हा* ह्या मार्दवात अलकाने आणि त्याचवेळी आपल्या बोलक्या डोळ्यांनी रविनाने कमाल केली आहे. हृदयाची सतत वाढत चाललेली धडधड जाणवणारी. त्यावर कडी केली आहे नृत्यदिग्दर्शकाने. पावसाचा, तिच्या तलम वस्त्राचा, भिजलेल्या केसांचा अन कमनीय बांध्याचा केलेला वापर. उफ़्फ़्फ़. काय सांगु अन किती सांगु!! . त्यावर कहर म्हणजे रांगडा मर्द अक्षयकुमार. तो ज्या सहजतेने तिला कवेत घेतो अन गिरकी मारतो, केवळ अशक्य. अक्षयचं लाजणं देखील सूचक-अर्थपूर्ण आहे. . अंधाऱ्या जागेत फटीतुन झिरपत येणाऱ्या प्रकाशाच्या कवडशांचा, टपकणाऱ्या थेंबांचा, तुटक्या-मोडक्या जिन्याचा आणि सर्वात कहर म्हणजे टेरेसवरील जागेचा, सैरभैर वाऱ्याचा, अमर्याद पावसाचा अन दोन सचेतन कायांचा उस्फुर्त संवाद दिग्दर्शकाने टिपला आहे. . रविना ही काही त्याकाळची आघाडीची नटी नव्हती किंवा तिच्या अभिनयाच्या जोरावर (माधुरी-जूही-श्रीदेवी प्रमाणे) सिनेमे हिट करून देत नव्हती. एक मल्टीस्टारर (नसीर-परेश-सुनिल-अक्षय) सिनेमा, त्यात असावी म्हणून घेतलेली नटी. . पण जे व्हायचं तेच झालं. एक अजरामर कलाकृती घडली. खुद्द डायरेक्टरने देखील विचार केला नसेल इतकं जुळून आलेलं समीकरण आहे हे गाणं. . ह्या गाण्याची फ्रेम-न-फ्रेम, अगदी अक्षय छत्री हातात धरून जिना चढून वर येताना ते रविना धुंद होऊन जलपरीसारखी टेरेसवरील पाण्यात लोळत असेपर्यंत, कोरल्यागत आठवते. बीट-न-बीट, शब्द-न-शब्द, रविनाची अदा-न-अदा लक्षात आहे. मनात घर करून बसले आहे. . मला तरी हे गाणं *वन्स इन अ डिकेड* टाइप वाटते. ह्या संपूर्ण टीमसाठी, अलका याग्निक -उदित नारायण - आनंद बक्षी - विजु शाह - राजीव राय - अक्षय कुमार आणि स्पेशली रविनासाठी एकदा बघाच. . #रसग्रहण #मोहरा #रविना #टिपटिप - काळे पुष्पक
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
शिफारस

प्रतिक्रिया द्या
22046 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

कोणतं गाणं आहे हे? खरच नाही

शाली
Fri, 04/05/2019 - 14:52 नवीन
कोणतं गाणं आहे हे? खरच नाही समजले.
  • Log in or register to post comments

गाण्याची लिंक

वपाडाव
Fri, 04/05/2019 - 14:52 नवीन
https://m.youtube.com/watch?v=PAQYnne4Yn4
  • Log in or register to post comments

ओह! टिप टिप बरसा पाणी. माफ

शाली
Fri, 04/05/2019 - 14:56 नवीन
ओह! टिप टिप बरसा पाणी. माफ करा, लक्षात नाही आले. लिहिताना तुमच्या डोक्यात ऱ्हिदम असणार, वाचताना माझे डोके रिकामे होते. :)
  • Log in or register to post comments

मान्य आहे, पण तुम्ही

गवि
Fri, 04/05/2019 - 15:01 नवीन
मान्य आहे, पण तुम्ही "भरो, मांग मेरी भरो, करो, प्यार मुझे करो अंग से अंग लगादे प्रेमसुधा बरसादे (चुभूदेघे) दासी तेरी प्यासी रही कितने जनम .. " हे गाणं पाहिलं नाहीत का? मकु आहे त्यात.
  • Log in or register to post comments

ताल

वपाडाव
Fri, 04/05/2019 - 16:38 नवीन
पाह्यलंय. पण ते तितकं श्रवणीय नाही. नुसतं मनच नाही तर हात-पाय-मेंदु थिरकायला लावणारं गाणं आहे हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बाबाऊ

जेम्स वांड
Fri, 04/05/2019 - 15:07 नवीन
चुराके दिल मेरा मदी असलेले लटकेझटके अलगच
  • Log in or register to post comments

भारी गाणं आहे, शृगांरिक !

चौथा कोनाडा
Fri, 04/05/2019 - 16:09 नवीन
भारी गाणं आहे, शृगांरिक ! मादकता खल्ल्लास करणारी !
  • Log in or register to post comments

रविनाला पुर्वी सुंदरच दिसायची

मराठी कथालेखक
Fri, 04/05/2019 - 17:23 नवीन
रविनाला पुर्वी सुंदरच दिसायची .. तिच्याकरिता खास बघावं असं गाणं : परंपरामधलं "फुलों के इस शहर मे" टीप टीप बरसाच्या तुलनेनं हे गाणं फारसं लोकप्रिय नाही पण तरी रविना आवडत असेल तर एकदा नक्की बघा. नंतर रविना अधिक बारीक झाली, खराब दिसू लागली.
  • Log in or register to post comments

अप्रतिम रसग्रहण

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 04/05/2019 - 17:25 नवीन
गाण्याचे म्हणतोय मी, रविनाचे नाही :)
  • Log in or register to post comments

जो जे वंछिल तो ते लाहो।

वपाडाव
Sat, 04/06/2019 - 17:17 नवीन
जो जे वंछिल तो ते लाहो। आम्ही दोन्ही गोष्टी त्याच समरसतेने करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

सुंदर !

प्रसाद गोडबोले
Fri, 04/05/2019 - 17:54 नवीन
सुंदर ! बाकी जुने कलाकार मिपावर परतत आहेत हे पाहुन आनंद झाला :)
  • Log in or register to post comments

छान गाणं. 4 वर्षा आधी मी

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/05/2019 - 20:10 नवीन
छान गाणं. 4 वर्षा आधी मी कॉलेज ला बस मध्ये जायचो. त्यावेळी बस ड्रायव्हर काका दोन गाणे पुन्हा पुन्हा वाजवायचे. त्यात हे एक टीप टीप बरसा पाणी. आणी दुसरं मेरा दिल जीस दिल पे फिदा है. एक दिलरुबा है.
  • Log in or register to post comments

आपल्या आठवणी जागवल्या

वपाडाव
Sat, 04/06/2019 - 17:04 नवीन
आपल्या आठवणी जागवल्या त्यानिमित्ताने. प्रवासाचा शिण क्षणार्धात गायब होत असेल ह्या गाण्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भारीच रसग्रहण

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 04/05/2019 - 20:33 नवीन
त्याचे यथार्थ वर्णन केले आहे. पहिल्यांदा "टिंग्डि टिडिडिडि" वाचून काहीच कळात नव्हते पण पिवळ्या-करड्या रंगाच्या अर्धपारदर्शक शिफॉन साडीत, भरलेल्या अंगाची, उंचपूरी, सौंदर्य-मादकता यांचा मिलाफ असलेली, कमनीय शरीराचं देणं लाभलेली, पहिल्या पावसाच्या सरिंनी भिजलेली, कामातुर रविना डोळ्यासमोर येत नसेल तर नवल! हे वाचल्यावर अक्खे गाणे कानात वाजायला लागले. त्याचे एक भ्रष्ट व्हर्जन खाली पहा....८९ लाख लोकांनी हे गाणे पाहिले आहे हे पहाताना लक्षात ठेवा दुसरा हा व्हिडीओ पण पहा... हे अजून एक समुहनृत्य हा शेवटचा अगदी छोटासा व्हिडीओ पहाच.. अजून दोन तीन आहेत पण ते इकडे देता येणार नाहित पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

दांडगा व्यासंग बुवा तुमचा..

आनन्दा
Sat, 04/06/2019 - 11:37 नवीन
दांडगा व्यासंग बुवा तुमचा.. बाकी चौथा विडिओ व्ही एफ एक्स आहे असे वाटतेय मला. मुळात तो डान्स तितका चांगला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

भंगार आहे ते

अभ्या..
Sat, 04/06/2019 - 11:49 नवीन
त्या चौथ्या गाण्यात व्हिएफएक्स नाही आणि ते करण्याच्या लायकीचे पण नाही. राघव जुयाल ने केलेल्या ह्याच गण्यावरच्या डान्सची भ्रष्ट नक्कल आहे तो डान्स. आजकाल यु ट्युबावरच्या नवीन डान्सच्या त्याच त्याच टिपिकल स्टेप्स पाहून गोविंदाचे जुने डान्स बघितलेलं बरं असे वाटू लागलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

त्या कॅनडातील पोरीने साडी

वपाडाव
Sat, 04/06/2019 - 16:59 नवीन
त्या कॅनडातील पोरीने साडी-गाणे-लोकेशन-स्टेप्स सर्व व्यवस्थित निवडले आहे. पण, पुन्हा, अर्थात जे रविना २५ वर्षापूर्वी करून गेली ते हिला अजुन २५ वर्षे तरी जमणे नाही. असो. आपण विस्तृत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वा वा

तुषार काळभोर
Sat, 04/06/2019 - 06:20 नवीन
एकदम कडक गाणं!! रविनाची म्हणून आवर्जून पाहतो अशी अजून दोन गाणी. पत्थर के फुल मधली. कधी तू छलिया लगता है आणि मै ढुंढताही रहा.
  • Log in or register to post comments

हो. ह्या दोन्ही गाण्यात ती

वपाडाव
Sat, 04/06/2019 - 17:07 नवीन
हो. ह्या दोन्ही गाण्यात ती विलक्षण खेळकर आणि बालिश आहे. म्हणजे दोघेही. राजकपूर छाप गाणी असल्याने ती वेगळ्या धाटणीची आहेत. पण दोन्ही गाणी ठेका घ्यायला लावतात व कर्णमधुरपण आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

पैलवान , ही दोन्ही गाणी

चौथा कोनाडा
Sat, 04/06/2019 - 17:19 नवीन
पैलवान , ही दोन्ही गाणी क्लासच आहे. गोगोड्ड आणि मधाळ ! आपुन बी फॅन हय या गाण्यांचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हया तुम्ही तिचं अजून एक

प्रमोद देर्देकर
Sat, 04/06/2019 - 22:34 नवीन
हया तुम्ही तिचं अजून एक अजरामर गाणं विसरता आहात कोणालाही या सहज स्टेप्स घेवून नाचता येईल किसी डिस्को में जाये किसी हॉटेल में खाये अहाहा अजूनही एकतो तर पाय थिरकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

गोविंदा म्हणजे वेगळं विश्व

वपाडाव
Tue, 04/09/2019 - 21:49 नवीन
गोविंदा म्हणजे वेगळं विश्व आहे. त्यासोबत फक्त दोन अभिनेत्री शोभल्या. रविना त्यापैकी एक. आणि या दोघांची केमिस्ट्री केवळ कमाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

पहिली

तुषार काळभोर
Tue, 04/09/2019 - 22:28 नवीन
नीलम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

आणि करिष्मा कपूर...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 04/10/2019 - 10:03 नवीन
निलम बरोबर त्याने त्याच्या करियरची सुरुवात केली. त्यांनी बरेच सिनेमे केले त्यांचे गाजलेले चित्रपट लव्ह ८६, हत्या, खुदगर्ज, गोविंदा आणि करिष्मा कपूर ही जोडी सुध्दा सुपरहिट होती. अनेक यशस्वी सिनेमे आहेत या दोघांचे. पटकन आठवणारे म्हणजे हिरो नं १, राजाबाबू, साजन चले ससुराल, कुली नं १, हसिना मान जायेगी, खुद्दार पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

बेश्ट!

लई भारी
Mon, 04/08/2019 - 11:32 नवीन
मला वाटलं मीच एकटा फ्यान हाय वाटत ह्या गाण्यांचा :D आणि अर्थात टिप-टिप बद्दल काय बोलणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

दूरदर्शनच्या बातम्या ?

वकील साहेब
Sat, 04/06/2019 - 10:49 नवीन
लेखाच्या सुरूवातीच ते टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग. दूरदर्शनच्या बातम्यांच्या सुरु होण्या अगोदर जी धून वाजायची त्या धूनची आठवण काढून काही लिहिलंय की काय अस वाटल होत. :) :)
  • Log in or register to post comments

परफेक्ट ! हेच वाटलं होतं.

उगा काहितरीच
Sat, 04/06/2019 - 11:51 नवीन
परफेक्ट ! हेच वाटलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वकील साहेब

आयोव. हे तुम्ही म्हणालात

वपाडाव
Sat, 04/06/2019 - 17:09 नवीन
आयोव. हे तुम्ही म्हणालात तेव्हा आजमावले. खरच असे सुद्धा ऐकु येते. तुमच्या बाजूने विचार केला तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

बेस्ट रे

अभ्या..
Sat, 04/06/2019 - 11:51 नवीन
एकच लंबर, वपु लिहू लागले. ह्याच फ्लो मध्ये ते आपले सात समुदर पार मैं तेरे पिछे पिछे येऊ दे की, सोबत ती देरीमिल्कच्या सासुसून स्पेशल परफॉर्मन्स सहित.
  • Log in or register to post comments

हा "विश्वात्मा" सिनेमापण

वपाडाव
Sat, 04/06/2019 - 17:15 नवीन
हा "विश्वात्मा" सिनेमापण राजीव राय ह्यांचाच. त्या आधी "त्रिदेव"मध्ये तिरछी टोपीवाले गाणं. ते ही ह्यांचं. वेळ काढून लिहिन. टिप टिप सारखं उस्फूर्त नाही येतए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

धन्यवाद !

हेमंतकुमार
Sat, 04/06/2019 - 12:36 नवीन
अलका याग्निक -उदित नारायण - आनंद बक्षी - विजु शाह - राजीव राय - अक्षय कुमार आणि स्पेशली रविनासाठी एकदा बघाच. >>>> +१ मस्तच...
  • Log in or register to post comments

दक्षिणेकडील मिड नाईट साँग्ज

ऋतुराज चित्रे
Sat, 04/06/2019 - 18:39 नवीन
दक्षिणेकडील मिड नाईट साँग्ज च्या कार्यक्रमाला ह्याच गाण्याच्या रिदम वापरला आहे.
  • Log in or register to post comments

रविना सर्वाधिक गोड दिसली ती

गवि
Sat, 04/06/2019 - 22:56 नवीन
रविना सर्वाधिक गोड दिसली ती "अंदाज अपना अपना"मध्ये. (आणि माधुरी "दिल" मध्ये)
  • Log in or register to post comments

टिपटिप?

गामा पैलवान
Sun, 04/07/2019 - 18:42 नवीन
वपाडाव, गाणं बघितलं तूनळीवर. गाण्याचे बोल 'टिपटिप बरसा पाणी' पेक्षा 'धुवांधार बरसा पाणी' हवे होते. छताला पडलेल्या बारक्याशा भोकशातनं पाणी पडून रवीना इतकी ओलीचिंब होते की वरच्या उघड्या गच्चीवर गेल्यावर काय होणार त्याचा अचूक अंदाज येतो. तसंच पार्श्वभागी दाखवलेल्या गगनचुंबी इमारतींवर पाण्याचा मागमूसही दिसंत नाही. एकंदरीत पराकोटीच्या विरोधाभासांनी भरलेलं गाणं आहे. नेमकं म्हणूनंच ते प्रेक्षणीय ठरलं आहे. टिपटिप म्हणता खरोखरीचे दोनचार शिंतोडेच जर रवीनावर उडवले असते तर ते तितकसं रोचक झालं नसतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

असलं अलंकारिक गाणं! अन

वपाडाव
Tue, 04/09/2019 - 17:40 नवीन
असलं अलंकारिक गाणं! अन भिजलेली रविना सोडून मागच्या बिल्डिंगा काय बघत बसले हो तुम्ही! हट्ट. . पैलवान कसा रग्गेल अन रंगेल हवा! आम्ही निरखुन घेतो डोळंभरून! तुम्ही दळा त्या बिल्डिंगाचं दळण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

या गाण्याची ट्यून मात्र

गवि
Mon, 04/08/2019 - 12:12 नवीन
या गाण्याची ट्यून मात्र चोरलेली आहे. हे अनेकांना माहीत असेलच. डॉ. अल्बानचं मूळ गाणं इथे उल्लेखणं टाळतो.
  • Log in or register to post comments

हरकत नाही. त्यावेळी अनु मलिक

वपाडाव
Tue, 04/09/2019 - 17:34 नवीन
हरकत नाही. त्यावेळी अनु मलिक एकटा चोर आहे असे माहिती होते. आता दोघे आहेत असे समजु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

"टीप टीप होने लगी, जादू चलने

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/11/2019 - 17:49 नवीन
"टीप टीप होने लगी, जादू चलने लगे" या जम्पिंगजॅकच्या गाण्यावर त्यावेळी बरेच दिवाने झाले होते. खास या गाण्यासाठी सिनेमा वारंवार पाहायचे. माझ्या गावाततर पडद्याआवर पैसे ही फेकायचे !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा