तो यवन त्याच्यावर पचकन थुंकला,
याच्या डोळ्यात अंगार फुलला,
“हरामी नजर नीचे” असे म्हणत त्या यवनाने त्याच्या खाडकन थोबाडीत मारली.
यवनाच्या नरडीचा घोट घ्यायला शिवशिवणारे हात मोठ्या मुश्किलीने आवरत तो म्हणला.
“गलाती झाली हुजूर, पुढच्या वेळी तलवार चालवा माझ्या गर्दनीवर, एकडाव माफी द्या गरीबाला”
त्याला उद्दामपणे बाजूला ढकलत तो यवन पुढच्या भोया कडे वळाला.
हिच संधी साधून तो त्याच्या साथीदारासह तो जडशीळ पेटारा कसाबसा उचलत लगबगीने तिथून सटकला.
ठरलेल्या जागी पोचेपर्यंत तो घामाने अक्षरश: निथळत होता. त्याचे हृदया छाती फोडून बाहेर येवू पहात होते.
आजूबाजूला सावधपाणे पहात त्यांनी पेटारा खाली ठेवला
आणि तो म्हणाला “सगळे सुरक्षीत आहे महाराज... बाहेर या”
पैजारबुवा,
वाचने
6490
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
शशक आवडली आहे, पण,
छान आहे
जय भवानी , जय शिवाजी
मस्तच
आवडली
कंडूशमनार्थ...
In reply to आवडली by mayu4u
मळमळ??
In reply to कंडूशमनार्थ... by ज्ञानोबाचे पैजार
चांगली शशक आहे.
कथा स्पर्धेतली असो कि स्पर्धे बाहेरची
+१
मस्त कथा
छान
+१
+१
+१