पुर्वप्रकाशित असल्यामुळे स्पर्धेसाठी देता येणार नाही. म्हणून इथेच टाकत आहे, बघा जमलीये का..
सूचनांचे स्वागत आहे :)
--------------------------------------------------------------------------------------------
छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे. फिक्या तरीही फ्रेश रंगाचे फॉर्मल शर्ट, शक्यतो काळ्या रंगाची ट्राऊजर, गळ्यात नाजुकशी चेन, छोटुकले खड्याचे कानातले, महागातलं मेटल घड्याळ, हाय पोनीमध्ये बांधलेले केस आणि बेली शूज अशा पेहरावात येणाऱ्या त्या स्वप्नसुंदरीची छबी डोळ्यात टिपण्यासाठी तो आतुर होत असे.
जुजबी ओळख असली तरी त्याला ती आवडली होती.
मनातले प्रेम व्यक्त करण्याची शक्ती दे म्हणून देवाला विनवण्याकरिता मंदिरात गेला असताना तीही तिकडेच येताना दिसली.
ती शूज काढत असताना त्याचे लक्ष तिच्या पायाच्या बोटांकडे गेले.
प्रेमभंग झालेला तो सवाष्ण मुलींनी सगळे सौभाग्यालंकार घातलेच पाहिजेत असे जिथे तिथे मत मांडत फिरू लागला.
----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------
याद्या
3722
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
=)) कडक!!
:)
नाय कल्ला
जोडवे दिसले त्याला तिच्या
In reply to नाय कल्ला by टवाळ कार्टा
जोडवे फक्त विवाहित मुलीच
In reply to जोडवे दिसले त्याला तिच्या by उगा काहितरीच
आयला....मलापण हेच वाटलेले पण
In reply to जोडवे दिसले त्याला तिच्या by उगा काहितरीच
सूचक आणि मस्तं !
+1
मस्त!. :)
+1
भारी
मस्त
+1
आभार