शेवटी ब-याच दिवसानंतर ही लेखमाला पुर्ण झालेली आहे. रसिक दाद देतील ही अपेक्षा
–-------
पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कोणीच नव्हते. बाजूच्या झाडावर बसलेले पक्षी तेव्हढे किलबिलाटाने शांततेचा भंग करत होते. हा भाग माझ्या घराच्या शेजारचाच होता. मात्र घरी जाण्याचा आत्ता काहीच फायदा नव्हता कारण आता ते साखरझोपेत असणार होते. वेळ जावा म्हणून मी आजूबाजूला फिरत वेळ घालावला. फिरता फिरता आमच्या नेहमीचे सलूनचे दुकान लागले. तोही नुकताच आला होता. दुकान उघडून दुकानाच्या बाहेरची बाजू तो झाडून काढत होता. मी सहज आत गेलो आणि कॅलेंडर बघितले तर कॅलेंडरवर मागचा महिना दिसत होता. त्या सलूनवाल्याचा मोबाईलही तिथेच पडला होता. मी तो उघडून बघितला तर त्यावरची तारखी दिड महिना आधीची होती. म्हणजेच माझ्या खुनाच्या तारखेपासुन मी भूतकाळात दिड महिना आधी आलो होतो.
आणि एकदम मला बाबांचे आणि इन्पेक्टर सावंताचे संभाषण आठवले की दिड महिन्यापासुन मला डुअल पर्सनॅलिटीचा आजार आहे. या तारखेचा आणि त्या आजाराचा काही संबंध असेल का या विचारात मी पडलो.
एव्हाना बराच वेळ झाला होता. मी घराकडे जायचे ठरवले. मी आणि माझा भाऊ संदिप एकाच खोलीत रहात असू. मी त्या खोलीच्या खिडकीपाशी गेलो आणि आत डोकावून पाहिले. मी जवळ जाताच खोलितले माझे शरीर उठून बसले आणि अर्थहिन बडबड करु लागले. मी आश्चर्यचकीत होऊन हा प्रकार पहात होतो. एव्हाना संदिप जागा झाला होता. माझे अर्थहिन बोलणे काही त्याला काही समजले नाही. उगाच झोपेत बडबडू नको असे दटावून तो पुन्हा झोपला. मी आता भिंतीतून आत गेलो आणि माझ्या शरीराला गदागदा हलवले. बडबड अजूनच वाढली होती. मी आता काहिसा घाबरलो. आणि जरा लांब जावून बसलो. बडबड आता कमी झाली होती.
मग मला कळाले माझा आत्मा शरीराजवळ गेला की मेंदू उत्तेजित होत होता. नेमका कुणाकडून संदेश स्विकारावेत याबाबत शरीरातील मेंदूत गोंधळ होत होता. कदाचित यालाच घरचे ड्यूअल पर्सनॅलिटी डिसअॉर्डर म्हणत होते.
माझ्यासाठी माझ्या खुन्याचा शोध घेणे अधिक महत्वाचे होते. आणि त्यासाठी गरज लागेल तर घरात येणेही आवश्यक होते. मी त्या डिसअॉर्डरकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले.
हा सगळा गोंधळ बोधलेंच्या शोधामुळे झाला होता हे तर आता कळले होते आणि माझे बाबा आणि बोधलेंचा संबंध आलेला होता हेही मला माहिती होते. तेव्हा ते दोघे एकमेकांशी कधी संपर्क करतात हे मला पहायचे होते. आणि शेवटी ८ दिवसांनी बोधलेचा फोन बाबांना आला आणि त्याला ते भेटायला निघाले. मीही सोबत निघालो.
बाबा बोधलेंच्या घरी पोहचले. घरातल्या टेबलवर ब-याच फाईल पडलेल्या होता. एकूण बोंधलेचा अव्यवस्थितपणा दिसत होता. याच फाईली इन्पेक्टरने नंतर आमच्या घरी आणून बाबांच्या हवाली केल्या होत्या.
बोधले बोलू लागला ,' प्रोजेक्टला आता अंतिम रुप आला आहे सर. मी आणि माझ्या टिमने ब-यापैकी काम संपवले आहे. फाईकडे बघत बाबा रागाच्या स्वरात बोधलेला बोलले," या फाईली घरी कशा आणल्या तू ? तुला जागा दिली आहे ना काम करायला ? " सर या माझ्याच कामच्या फाईली आहेत. माझे स्वताचे नोटस आहेत. जसे सुचेल तसे लिहित जातो. मुख्य फाईली साईटवरच आहेत. तिथेही त्या लॉकरमद्दे आहेत आणि चावी केवळ माझ्याकडे आहे.
"फायनान्सच काय झाल? काही नवीन कंपन्या तयार झाल्या आहेत का ?" बाबा बोलले. फायनान्सचेही काम बोधलेकडे का असावे असा एक विचार माझ्या मनात डोकावला. पण जास्त विचार करायला वेळ नव्हता. " काही मोठ्या फार्मा कंपनी तयार आहेत यासाठी. माझ्या अोळखीवर बोलण्या झाल्या आहेत. अहो आमचे टायगर असोसिएशन कधी कामाला येणार ?" बोधले उत्तरला .
गाडीच्या कंपनीत फार्माची गूंतवणूक ? पैसे दिसले की विचार बंद पडतो असे म्हणतात ,बाबांनीहि जास्त खोलात न जाता हम्म असा एक उद्गार तेवढा काढला. नंतर ते त्यांच्या कामाचे बोलू लागले. मला आता तिथून अजून काही कळण्यासारखे नव्हते. मी परत निघालो. एकूणच आता बोधलेची कामे बघता त्याच्याकडेच लक्ष द्यावे असे ठरले. आत अजून काही दिवस गेले. पण फारसे हाती काही लागले नाही.
नंतर बाबांच्या बोलण्यातून एकादा कळाले की बोधलेच्या टिममधला कोण अॅंन्ड्यू लुईफर गायब झाला आहे. नंतर कळाले की हा गाडीच्या 'सेफ्टी इंचार्ज' म्हणून काम करत होता. बाबांनी बोधलेला घरी बोलवले. माझ्यासाठी ही एक संधी होती बोधलेच्या घरी जावून तपास करण्याची. घरी बरीच शोधाशोध केल्यावर एक चिठ्ठी कचरापेटीत मिळाली. त्यावर पुढचा मुजकुर होता," तपासणीत आपले शिल्ड सुरक्षित आढळले नाहीत. रॅडिएशनचे अंश आढळले आहेत. " एवढाच मजकूर होता.
ही चिठ्ठी त्या अॅंन्डूचीच असणार हे मी ताडले. आपले शिल्ड काम करत नाहीत हे कळाल्यावर बोधलेने त्याला गायब करण्याची पुरेपुर शक्यता होती. अॅंन्डू््यूचा त्याबाबतचा रिपोर्ट हाती लागणे आता आवश्यक बनले होते.
तेवढ्यात बोधले आत आला. मी जरा दचकलो आणि माझा धक्का लागून काही फाईली खाली पडल्या. बोधलेहि आपले सामान निरखुन बघू लागला. सामानाची हलवाहलवी झाली आहे हे त्याने अोळखले. त्याने पटकन मोहितला फोन लावला आणि घरी बोलावले. मोहित आला की बोधलेने त्याच्या कानशिलात लगावली. मोहित तर पुर्ण गोंधळून गेला होता
"तुझ्याकडच्या चावीने उघडले ना तु कुलुप ? तुला फक्त घर आवरायला चावी दिली होती. माझ्या सामानाला हात लावायला कोणी सांगितले? आधी ती चावी आण ! " मोहित अजूनही ततपप करत होता. थोड्यावेळाने त्याला धिर आला. " सर आज प्रवीणला तुम्ही तुमची गाडी द्यायला सांगितली होती. त्यालाच या घराची दुसरी चावीपण होती. ती त्याकडेच राहिली आहे. तुम्ही जाताना माझ्याकडची चावी घेऊन आलात." मोहित उत्तरला.
या वेळेपर्यंत माझी बोधले सरांशी अोळख झालेली होती. जो क्लासमद्दे कार्यक्रम झाला होता त्या कामासाठीच मी सरांची गाडी घेतली होती. पण बोधलेला आता माझ्यावर संशय आला होता.
बोधले डोक्याला हात लावुन बसला. तो बडबडला "देशमुखला माझा संशय आाला आहे. म्हणून पोराला पुढे करून माहिती काढतो काय ! मी ही कच्चा नाही हे कळेल आता. मोहित आजपासुन तू माझा माणूस
म्हणून त्या प्रवीण सोबत राहायचे. त्याला मी टायगर्स असोसिएशनचा अध्यक्ष बनवतो. कामाच्या नावाखाली तूला त्यासोबत राहता येईल. कोणाला खबर लागता कामा नये." मोहितने केवळ होकारार्थी मान वळवली. बोधलेने खिशात हात घातला आणि पैशाचे बंडल काढून मोहितकडे टाकले. मान खाली करून तो बोलला ," सर डॉक्टर म्हणत होते की आईला आता अॉपरेशनशिवाय उपाय नाही. थोडे जास्त मिळाले असते तर .." बोधले पुन्हा त्याच्या कानशिलात दिली आणि त्याला हाकलून लावले.
आज इतक्या दिवसानंतर मला मोहितच्या वागण्याचा अर्थ लागत होता .
आधीच माझी एक फेरी त्या साईटवर झाली होती जिथे हे गाडीचे काम चालू होते. मी रॅडीएशनचा रिपोर्ट मिळवण्यासाठी तिथे पोहोचलो. मी कोणाला दिसणे शक्य नसल्याने सरळ आत पोहोचलो.
काही शोधाशोध केली आणि एक तिजोरीसारख एक प्रकार तिथे दिसला. मी हात आत टाकला तर हाताला कागद जाणवले. मी हात जरी आत बाहेर काढू शकत असलो तरी कागद त्या तिजोरीतून बाहेर येणे अशक्य होते. निराश होवून मी घरी परतलो.
यात कोणाची तरी मदत घेणे आता गरजेचे बनले होते. सगळा प्रकार मी एका चिठ्ठीवर लिहिला. यात माझा खुनाचा प्रसंग गाळला होता. ती चिठ्ठी संदिपच्या बेडवर ठेवली. मी बाजुलाच उभा राहिलो. अपेक्षेप्रमाणे दुसरा 'मी' बडबड करु लागला.
संदिपने चिठ्ठी वाचली. आपल्या भावाचा आत्मा बाजुला आहे या विचाराने त्याला अक्षरक्षः घाम फूटला. त्याने घाबरत मला आवाज दिला. उत्तरादाखल मी टेबलावरचा पेपरवेट हलवला. संदिप घाबरत उठला, हळूहळू त्याचा विश्वास बसू लागला. मी त्याला साईटवर नेण्यासाठी अखेरीस राजी केले.
आम्ही बोधलेच्या घरातून एक विचित्र दिसणारी चावी मिळवली आणि नंतर साईटकडे निघालो. तिथले सुरक्षारक्षक पेंगत होते. वेळ साधून आम्ही आत घुसलो. संदिपने तिजोरीचा दरवाजा उघडला आणि आतली एकूणएक कागदपत्रे काढली. आम्ही तिथून निसटून जाण्यातही यशस्वी ठरलो.मी ती चावी पुन्हा जागच्या जागी ठेवून घरी परतलो.
मी आजची तारीख बघितली. उद्याच्याच तारखेला माझा खुन झाला असल्याचे मला आठवले. वेळ फार कमी होता. आम्ही कागदपत्रे शोधू लागलो. आणि जे मला पाहिजे होते ते शेवटी मिळाले. अॅंन्ड्यूच्या रिपोर्ट नुसार रॅडिएशनी तिव्रता अतीशय कमी होती मात्र एवढे रॅडिएशन सतत ५-६ वर्ष शरीरावर पडले तर कॅन्सरची शक्यता होती.
बोधले एवढा धुर्त होता की मुळात त्याला याबद्दल माहिती होती. भारतीय सरकार एवढ्या खोल जावून संशोधन न करता गाडी पास करतील असा त्याचा कसाय होता. जवळपास ब-याच सरकारी परवानग्या मिळवल्याही होत्या.मात्र त्याचवेळी अॅन्डयूचा रिपोर्ट वापरून तो फार्मा कंपनिकडे गेला आणि आपले गाडीचे ग्राहक हे तुमचे पुढचे कॅन्सरकचे ग्राहक असतील हे त्यांना पटवून दिले आणि तिथुनही पैसे कमवले.
हा सगळा प्रकार मी संदिपला लिहून समजावला. दुस-या दिवशी मी त्याला १ वाजता बाबांना घेऊन प्रशमेशच्या घरी यायला सांगितले. पण खरा धक्का नंतर बसला. संदिपने सांगितले की बाबा परगावी गेले आहेत. आता पुढे त्यानेच एकट्याने काय करायचे हे मी त्याला सांगितले.
सगळे कागद त्याला बाबांच्या खोलित ठेवायला सांगितले. दुस-या दिवशी बोधलेलाच मारायचे मी ठरवले. नंतर बोधलेकडच्या घरातील फाईली कशाही करुन मिळवण्याबद्दल मी बजावले जेणेकरून पुरावा काहिच राहणार नाही. नंतर ज्या अधिका-यांनी फारसे कष्ट न घेता गाडीला परवानग्या दिल्या त्यांच्यावर दबाव टाकणे आणि बोधलेचा अपघात दाखवून केस बंद करून टाकणे. संदिपने सगळे समजावून घेतले आणि बाबांना फोन केला. पण ब-याचवेळा लावूनही तो काही लागला नाही.शेवटी कंटाळून संदिप झोपी गेला.
संदिप झोपल्यावर मी पुन्हा बोधलेच्या घरी आलो. बोधले डोक्याला हात लावून बसला होता. मधल्या वेळेत बोधले साईटवर जावून आला होता. कागदपत्रे चोरीला गेली आहेत हे त्याला समजले होते.मोहितच यामागे आहे अशी त्याची ठाम समजून झाली होती.
एवढ्यात त्याला प्रशमेशचा फोन आला ," सर उद्या सकाळी मी , मोहित आणि प्रवीण माझ्या घरी मिटींग करत आहोत. काही पुढचे अपडेट दिले तर बरे होईल." नंतर बोधलेचे डोळे चमकले आणि त्याने लागणारी माहिती प्रथमेशला दिली.
दुस-या दिवशी सकाळपासूनच मी प्रशमेशच्या घरापाशी जावुन थांबलो. तिथे अपेक्षेप्रमाणे बोधले घरावर नजर ठेवून होता. मी जर बाहेर थाबलो असतो तर माझा खुन नेमका बोधले केला की कुणी दुस-याने केला हे मला कळालेच नसते म्हणून मी घरात दुस-या खोलीत जावून बसलो. वेळ जवळ येत चालली होती. अखेर प्रथमेश आणि मोहित दोघे बाहेर गेले.
लगेच बोधले सुरा घेऊन आत आला.मीही त्याच खोलीत आलो. दुसरा "मी" आता अर्थहीन बडबड करत होता. खरेतर बोधले मी आणि प्रथमेश बाहेर गेलो असा समज करुन घेऊन मोहितला मारायला आला होता. पण मला पाहून तो दचकला. त्यातही माझे ते रुप तो पुर्ण गोंधळून गेला. मला मारण्यासाठी हातात घेतलेला सुरा हातातच राहिला. बोधले मला मारणार नाही हे समजून मी काहीच हालचाल केली नाही. दुसरा "मी" काहीच हालचाल न करता केवळ बडबड करत होता.
दारातून संदिप आता आला होता. बोधले मला मारत आहे असा त्याचा समज झाला असावा. हातातला रॉड त्याने बोधलेला मारला. पण बोधले सावध होता. मागून कोणी तरी आल्याची जाणीव त्याला झाली असावी. तो मला ढकलून बाजूला सरकला, आणि तो रॉड माझ्याच डोक्याला लागला.
हा प्रसंग एवढ्याकमी वेळात घडला की मला काहीच करता आले नाही. एक कळ माझ्याही डोक्यात जाणवली आणि मीही खाली पडलो. बोधले सुरा तिथेच टाकून पळाला आणि इथे संदिप रागाने वेडापिसा झाला होता. डोक्यात रक्त उतरले होते तो पळत बोधलेच्या मागे गेला.
माझी शुद्ध हरपत चालली होती. माझे शरीर तर केव्हाच बेशुद्द पडले होते...
समाप्त.
भाग १
याद्या
5824
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे..
उत्तरे
In reply to छान आहे.. by आनन्दा
लय भारी....अज्जून लिहा
सासं ना विनंती.
आधी अपूर्ण लेखमाला आणि कथांचा
प्रतिसादासाठी धन्यवाद.