Skip to main content

करामत - एक लघुकथा

लेखक अनिंद्य यांनी सोमवार, 13/08/2018 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
* * * दंग्यात लुटल्या गेलेला माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी छापे मारायला सुरवात केली. लोक घाबरले, लुटीचा माल रात्रीच्या अंधारात घराबाहेर फेकू लागले. काहींनी तर स्वतःचाच माल फेकून दिला, उगाच पोलिसांचे झेंगट नको म्हणून. * * * एका माणसाची मात्र पुरती गोची झाली. त्याच्याकडे साखरेच्या दोन गोण्या होत्या, किराणा मालाचे दुकान लुटताना त्याचा हाती तेव्हढेच लागले. रात्रीच्या अंधारात एक गोणी त्याने शेजारच्या विहिरीत कशीबशी ढकलली, पण दुसरी ढकलतांना तोल गेला आणि तोही विहिरीत ! आवाज ऐकून लोक गोळा झाले. दोरखंड टाकून दोन उत्साही वीर विहिरीत उतरले, त्याला बाहेर काढले. पण थोड्याच वेळात शेवटचे आचके देत तो देवाघरी गेला. * * * दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी विहिरीतून पाणी शेंदले तर ते चवीला अगदी गोड ! * * * रात्री बघतो तर काय - त्या माणसाच्या कबरीवर दिव्यांची आरास ! * * * ज्यांनी इथवर वाचलंय त्यांच्यासाठी :- ‘सआदत हसन मंटो’ ह्या अत्यंत प्रिय लेखकाच्या 'करामात' ह्या लघुकथेचा मराठीत अनुवाद करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न. मोजके चार शब्द पदरचे लिहिण्याची आगळीक केली आहे, पण ती मराठीत वाचण्याच्या सुगमतेसाठी. * * *
लेखनविषय:

वाचने 11816
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

तुमचा प्रयत्न. छान. येऊद्यात अजून.

* * * कमी असरे तर उत्तम झाले असते.

प्रयत्न चांगलाच जमलाय. कमीत कमी शब्दात आणि वाक्यात मनाला चटका लावणाऱ्या लघुकथा लिहिण्याची मंटो साहेबांची होतोटी विलक्षण होती. या आधी मिपावर जयंत कुलकर्णी साहेबांनी अनुवादित केलेल्या काही कथा वाचल्या होत्या. हि कथा आधी नव्हती वाचली ती अनुवादित केल्याबद्दल आभार.

In reply to by टर्मीनेटर

आभारी आहे. कुलकर्णी साहेबांनी केलेले अनुवादही वाचून बघतो. मला आवडलेल्या काही कथांचा पुढे अनुवाद केलाच तर इथे रिपीट होणार नाही.

म्हणलं का विषयच संपला, कमीतकमी शब्दात समर्पक अर्थ!

In reply to by सस्नेह

आभार ! मंटोंची मूळ कथाच तशी आहे, आटोपशीर - एक एक शब्द ताशीव, भारदस्त.

एक चांगला प्रयत्न. नाखु कोंडके

In reply to by नाखु

@ नाखु, आभार ! बरेच दिवसांपासून तुम्हाला एक सांगायचे होते - तुमची ती 'वाचकांची पत्रे वाला नाखु' अशी सही मला आवडते :-)

आणि अशा सुंदर कथेचा आटोपशीर अनुवाद

In reply to by मित्रहो

@ मित्रहो मला मंटोंच्या लघुकथा फार आवडतात. किमान शब्द आणि कमाल आशय. प्रतिक्रियेबद्दल आभार ! अनिंद्य

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, आपल्यासारखे मराठी भाषेचे प्राध्यापक म्हणताहेत तर जमला असावा प्रयत्न. आभार !

आज साहित्यप्रेमी मंटोंचा वाढदिवस साजरा करताहेत. त्या कारणे मंटोंचे बावनकशी लेखन पुन्हा एकदा पुढ्यात आले. _/\_

जबरदस्त कथा ! मंटोंचं फारकाही वाचण्यात आलेलं नाही ! मंटोंच्या आणखी कथा वाचायला आवडतील !

@ चौथा कोनाडा @ शेखरमोघे @ बिपीन सुरेश सांगळे आभार. मिपा/माबो वर काही मंटोकथा मराठीत आहेत.