Skip to main content
लेखक प्रणित यांनी शनिवार, 10/02/2018 11:56 या दिवशी प्रकाशित केले.

मध्यंतरी व्हाट्सएप वर खेळगाण्यांचा एक मेसेज वाचायला मिळाला आणि लहानपणी म्हटली जाणारी काही खेळगाणी मी माझ्या मुलीला शिकवली.

१. 'आपडी-थापडी.... गुळाची पापडी
धम्मक लाडू.... तेल पाडू
तेलंगीच्या.... तीन पुऱ्या
चाकवताचं.... एकच पान
धर गं बेबी.... हाच कान'

२.च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ
च्याऊ ची कोंबडी आपण खाऊ,
च्याऊ ला पैसे कुठून देऊ
हंडी फोडून खापऱ्या देऊ

३. 'बदका बदका नाच रे, तुझी पिल्लं पाच रे, एक पिल्लू मेलं, गाडीत घालून नेलं, गाडी गेली डोंगराला, आपण जाऊ बाजाराला, बाजारातून आणल्या पाट्या, साऱ्या मुलांना वाटल्या, एक मूलगा चुकला, छडी खाली लपला, छडी त्याला चावली विद्या देवी पावली'

४. च्याऊ म्याऊ
पितळीचं पाणी पिऊ
भुर्रकन उडून जाऊ'

कोणाला अजून गाणी आठवत असल्यास शेअर करा

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3931
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

कोण तू रे... टंपिटोला
खातो काय रे... भाजीपाला
निजतो कुठे... चटई वरती
बायको कुठे... पलंगावरती
तू नाही झोपत... चिमटे काढते
मारत का नाही............ माया येते


In reply to by दीपक११७७

कोरा कागद निळी शाई
अाम्ही कुणाला भित नाही
पडलं तर रडायचं नाही
अाईबाबाना सांगायचं नाही
वर बघून सांग दगड की माती


दोन उंदीर विणायला बसले...
हळूच मांजराने डोकावले.
अरे उंदरांनो काय करता? अरे उंदरांनो काय करता?
लोकांसाठी कपडे विणतो.....लोकांसाठी कपडे विणतो.
आम्ही येऊ का मदत करायला..आम्ही येऊ का मदत करायला..
नको रे बाबा नको नको....नको रे बाबा नको नको.
कारण तुम्ही लुच्चे लबाड मनी माऊ आहात... (वरच्या बडबड गीतात ही लास्ट लाईन मी टाकली ....)


कापुस कोंड्याची गोष्ट सांगु
सांग
सांग काय म्हणतीस तुल कापुस कोंड्याची गोष्ट सांगु
सांगना
सांगना काय म्हणतीस तुल कापुस कोंड्याची गोष्ट सांगु

and so on............


सातार्‍याचा म्हातारा, शेकोटीला गेला,
सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको शेकोटीला गेले,
सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा शेकोटीला गेले,
सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची मांजर शेकोटीला गेले,
सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची मांजर, मांजराची शेपटी शेकोटीला गेले,
सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची मांजर, मांजराची शेपटी, शेपटी वरचे केस शेकोटीला गेले,
सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची मांजर, मांजराची शेपटी, शेपटी वरचे केस, केसावरची माशी शेकोटीला गेले,
सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची मांजर, मांजराची शेपटी, शेपटी वरचे केस, केसावरची माशी, माशीचे पंख शेकोटीला गेले,