खिलजीचा माफीनामा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
खिलजी एक असे पात्र जे इतिहासात त्याच्या कुकर्मामुळे प्रसिद्ध झाले . प्रत्येक पटावर ते पात्र जन्माला येतच असते . नियतीचा अलिखित नियम आहे . मी देखील परत आलोय . पण माझ्या परतीचे कारण मात्र वेगळे आहे . मी परत आलोय ते फक्त माफी मागण्यासाठी. मी माफी मागणारही होतो पण त्यावेळेला मला संधीच मिळाली नाही . मी कैक धडका दिल्या , पण जेव्हा जेव्हा मी माझे नाव किंवा आडनाव टंकले त्या वेळेस माझ्या हाती अपयशच आले . असो ...
जिच्यासाठी उपवास व्रत वैकल्ये केली , ती माझी आई ६ जानेवारीला देवाघरी गेली. जाईपर्यंत चूल आणि मुलांची काळजी करणारी बाई, अशीच निघून गेली ... चितेवर पहुडली असताना , नातेवाईक तिच्या अंगावरचे दागिने काढत होते तेव्हा विरक्तीची पुसट कल्पना माझ्या मनाला शिवू लागली होती . ह्या मोहपाशात अडकून पडण्यापेक्षा , जे जे आधी घडलेले आहे , कुणी दुखावले गेले असेल कळत नकळत , त्यांची माफी मागणे क्रमप्राप्त आहे. म्हणून मी माझी पूर्वीची ओळख लपवून , या मंडळात पुन्हा प्रवेश केला .
शक्य झाल्यास मला माफ करा ..
आपला नम्र
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
प्रतिक्रिया
माफी नको.
RIP _/|\_
ओळख लपविल्यावर माफ कसे करणार
ओळख लपवलेली नाही आहे त्यांनी.
अहो पुर्वीची ओळख लपवली आहे ना
वाईट वाटले
+१
तुमच्या आईच्या आत्म्यास शांती
+ १
माफी नको.
तुमच्याबध्दल खरचं वाईट वाटते
दु:खद घटनेबद्दल खेद आहे.
+ १
+१११
मातृवियोगाचे दु:ख सोसायचे बळ
मातृवियोगाचे दु:ख सोसायचे बळ
..