Skip to main content

कधितरी...

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 07/10/2017 16:11 या दिवशी प्रकाशित केले.

अमेरिकन कवी थॉमस एस. जोन्स यांची "sometimes" ही एक अल्पाक्षरी कविता.

बालपणी ध्यानी, मनी, स्वप्नी उराशी बाळगलेल्या व पुढे जगरहाटीच्या तडाख्यात नामशेष होऊन स्मरणमात्र उरलेल्या आपल्या महत्वाकांक्षांबद्दलचं हृदयस्पर्शी भाष्य म्हणजे ही कविता!

ही मूळ कविता व तिच्या भावानुवादाचा माझा प्रयत्नः

ACROSS the fields of yesterday
He sometimes comes to me,
A little lad just back from play—
The lad I used to be.

And yet he smiles so wistfully
Once he has crept within,
I wonder if he hopes to see
The man I might have been.
========================

कधितरी...
----------
भेदून पटल काळाचे
तो कधितरी भेटिस येतो
येताना अवघे माझे
तो शैशव लेऊनी येतो

का त्याच्या चेहेर्‍यावरचे
हसणे अवचित काजळते?
माझ्या हत आकांक्षांचे
का पिशाच्च त्याला दिसते?

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3283
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अहाहा!!
एकदम प्रत्ययकारी!
अत्तर एका कुपीतून दुसर्‍या कुपीत ओतावं तसं(श्रेयः श्री. मा. माटे)