Skip to main content

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग १ )

लेखक अनाहूत
शनिवार, 23/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
तिला न पाहता होणारी तगमग न समजणारी होती , काय होतंय आपल्याला ? नक्की काय होतंय ? आपण तिच्या प्रेमात , ... छे उगाच काहीतरीच काय ,.... पण मग असं का होतंय .. समोर असतो तेव्हा तिच्याशी पटत नाही आणि भांडण होतात आपली , असं वाटत कि ती नसलेली बरी, पण ती नसली कि असं का वाटतय ? कि काहीतरी चुकतंय .. नाही माहित पण असं वाटतय हे नक्की आहे ..... " ए हाय , कसा आहेस ? " " कुठं होतीस ? " " का आता काय आहे ? काय झालाय का ? हे बघ असं प्रत्येक गोष्टीसाठी मलाच जबाबदार धरू नकोस . मला तर माहितही नाही काही ....." " तू नव्हतीस तर ठीक वाटत नव्हत . " " हो तुला भांडायला कोणी नसेल तर बरं वाटणार नाही ना .." " तू असतेस तेव्हा भांडतो , पण आता तू नव्हती तर ठीक वाटत नव्हत . " " साहजिक आहे तुला सवय झालीय माझ्याशी भांडण्याची , त्यामुळे मी नसताना तुला ठीक वाटत नव्हत . सवय झालीय , पण ती तुझ्याशी भांडायची नाही तर तुझी . " " म्हणजे ... " " म्हणजे तू नव्हतीस तर जीव कासावीस झाला होता, कामात लक्ष लागत नव्हत माझं , का ते मला माहित नाही , वाटतंय तुझी सवय झालीय मला . " " काहीतरीच काय चल जाऊया का ? " " थांब ना थोडी बोलायचं होत तुझ्याशी . " " बोल ना " " कस सांगू आणि कस नाही ते नाही समजत आहे , पण एक सांगू तुझ्याबद्दल काहीतरी वाटतय एव्हढं नक्की . पण हे फक्त मलाच वाटतंय कि तुलाही ? " " अरे काय वाटतंय , काय बोलतोय ? ते समजत हि नाहीय मला . " " समजत नाहीय कि समजून घेत नाहीयेस . " " आपण जाऊया का ? आज तुझं काही खर नाहीय ? आपण नंतर बोलूया ना ....." " अग ऐक तरी " " please मला comfortable नाही वाटत आहे. आपण जाऊया please " " ठीक आहे चल " आता कोणीही काही बोलत नव्हत आणि कुणाला काय बोलावं आणि एकमेकांकडे पहावं हेही समजत नव्हत. जातानाही ती सहजता नव्हती दोघांच्यात . तिने कसतरी वर पाहिलं त्याच्याकडे आणि मुश्किलीने smile करून ती निघालीही . खूप अवघडलेपण वाटत होत काय विचार करावा ? खरच असाच विचार करतोय का तो ? कि मलाच वाटतय असं . काल खरंच काय सुचतही नव्हत , त्याचीच आठवण येत होती . समोर असला कि भांडत असतो नेहमी . पण नव्हता समोर तर काही सुचत नव्हत मला . कधी वाटलं नाही असं पण आता असं का वाटतंय . काय करू थांबवू असा विचार करायचा कि जस वाटतंय तस वाटू देऊ. नको मला असा विचार करून चालणार नाही किती फरक आहे आमच्यात आणि परत ... नकोच हा विचार नकोच " ए हाय कशी आहेस ? " " ठीक आहे " " काय ग काय झालं अशी का दिसतेयस ? " " कुठं काय काही नाही बर येते मी थोडं काम आहे माझं . " " असं का करतेयस ? काय झालाय सांगशील का ? " " काहीच नाही ... " " असं नाही करू देणार तुला मी , आज मला सांगितल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही मी . " " तुला कळत नाहीये का मला काम आहे ? आता वेळ नाही मला मला जाऊ दे . " " हे बघ " " please ... " " ठीक आहे जा तू , पण वेळ असेल तेव्हा नक्की सांग मला काय झालाय ते . " ........ क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2083
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया