मुंबई सायकल कट्टा आणि "फूड सायकल by प्रशांत ननावरे"
रामराम...
मिपावर तुमचे सायकल-पराक्रम वाचतो. माझ्या एका मित्राच्या सायकल उपक्रमांविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं.
माझा मित्र प्रशांत ननावरे हा लोकसत्तामध्ये काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आवृत्तीमध्ये दर शनिवारी 'खाऊखुशाल' हे खादाडीविषयी सदरही लिहितो. तसंच तो सायकलप्रेमीही आहे.
असा नूलकर काकांचा व्यनी आला. "आवडीनिवडी एक सारख्या आहेत तर एकदा भेटून गप्पा मारूया आणि खादाडी करूया.." असा प्लॅनही नूलकर काकांनी कळवला. सुरूवातीला ठरलेली तारीख मला जमणार नव्हती त्यामुळे मी इरसाल कार्टे आणि भटक्या खेडवालांचे नांव सुचवले व तुम्ही भेटा असे सुचवले, तर नूलकर काकांनी भेटण्याची तारीख पुढे ढकलूया असा तोडगा काढला.
..आणि मुंबई कट्ट्याची तयारी सुरू झाली. नूलकर काकांनी प्रशांतच्या यूट्यूब चॅनेलची लिंकही दिली होती त्यामुळे ते व्हिडीओ बघून झाले.
दादरला भेटणे आणि गप्पा खादाडी असा सरळ सोपा प्लॅन होता. बोका कुठेतरी मुंबईबाहेर आणि प्रासही बाहेर जाणार असल्याने दादरात जाऊन त्यांची भेट होणार नाही अशी चिन्हे होती. प्रशांत, नूलकर काका, भटक्या खेडवाला, इरसाल कार्टे आणि मी असा कोरम ठरला.
मी पुण्यातून डेक्कन क्वीनने निघालो. टीसी दिसल्या दिसल्या पँट्री कारचे लोकेशन विचारले तर त्याने खुशखबरी दिली की आज पँट्री कार नाही.
डेक्कन क्वीनची पँट्री कार + खंडाळ्याचे डोंगर + गरमागरम कॉफी - हे डेक्कन क्वीनचे नेहमीचे आकर्षण. आज नेमका या बेताला सुरूंग लागला कारण पँट्री कारच नव्हती.
मग निवांत पुस्तक वाचत दादर येईपर्यंत वेळ काढला. थोड्या थोड्या वेळाने नूलकर काका, भटक्या खेडवाला (भ.खे.) आणि इरसाल कार्टे तिघांचे मेसेजवर अपडेट येत होते.
दादर स्टेशनला उतरलो. लगेचच तिघेजण भेटले. मग आंम्ही पायीपायी एका इराण्याकडे कूच केले.
तेथे पोहोचतो न पोहोचतो तोच प्रशांतही आला. मग आंम्ही दाटीवाटीने भरलेल्या इराणी हाटेलात शिरून आणखी गर्दी वाढवली व एकाच टेबलाभोवती अॅडजस्ट झालो.
सुरूवात इराणी चहा आणि बन मस्का ब्रुन मस्का ने केली.
ब्रुन मस्का आणि बन मस्का मध्ये नक्की काय फरक असतो या विषयाने गप्पा सुरू झाल्या आणि नंतर चर्चेचे ट्रॅक झपाझप बदलू लागले. भ.खे आणि प्रशांत आधी भेटले होतेच. माझे आणि प्रशांतचेही अनेक सायकलवाले कॉमन मित्र निघाल्याने गप्पा आणखी रंगात आल्या.
चहा संपल्यानंतर आंम्ही एक मोकळे टेबल पटकावले आणि म्येन कोर्सची ऑर्डर दिली
.
खिमा पाव.
.
.
अंडा बुर्जी
.
.
ऑम्लेट
.
.
मी उगाचच कलात्मकता दाखवत एक फोटो काढला.
.
.
हे सगळे खाणे सुरू असताना गप्पा सुरू होत्याच.. एक दोन पावही मागवून झाले.
.
नंतर सुलेमानी चाय.
.
.
इथे प्रशांत फोटो काढत असताना मी त्याला सांगितले की फोटोमध्ये लिंबू पिळल्यानंतरचा थेंबही येऊदे.. ;)
.
.
मनसोक्त खादाडी झाल्यानंतर आंम्ही बाहेर पडलो. तेथे बाहेर पडताना मला एक पुस्तक दिसले. त्या पुस्तकामध्ये इराणी हॉटेल आणि त्यांचा पूर्ण इतिहास असावा असे वाटले. मी तेथील एकाला पुस्तकाबद्दल विचारले तर त्याने "चाबी नै है" असे सांगीतले. हे सगळे काऊंटरवरून मालक बघत होतेच.. आमचे संभाषण ऐकून ते स्वत: आले आणि पूर्वी कधीतरी लावलेले कुलूप काढण्याची खटपट करू लागले. तब्बल पांच मिनीटे खटपट बघितल्यानंतर "आता राहूदे" म्हणून मी निघालो तर त्यांनी थांबवूनच घेतले आणि यशस्वीपणे कुलूप काढले.
ते पुस्तक खास घ्यावे असे वाटले नाही.
"अरे आपण बिल तर दिले होते.. मग त्या मालकाने तुला का पकडून ठेवले होते..?" असे म्हणून भ.खे. काकांनी माझी खेचायला सुरू केली. :D
नंतर एक कोणतेतरी झाड बघायला आंम्ही चालत चालत बरेच दूरवर कुठेतरी गेलो.. त्या झाडाची माहिती नूलकर काका देतीलच.
त्या प्रचंड झाडाजवळ इरसाल कार्टं...
.
नंतर प्रशांतने आंम्हाला एका ठिकाणी नेले.
शेवपुरी सँडविच.
.
.
तेथून निघून परत आंम्ही मणीज जवळ पोहोचलो. त्या दरम्यान फोनाफोनी होऊन प्रास सायकलवर अवतरले...
मग पुन्हा नवीन विषय आणि नवीन गप्पा सुरू झाल्या...
मणीजची कॉफी..
डावीकडून प्रशांत ननावरे, प्रास, इरसाल कार्टं, सुधांशुनूलकर, भटक्या खेडवाला आणि मोदक
वेळ झाल्याने भ.खे.नी निरोप घेतला.. नंतर थोड्यावेळाने प्रशांतलाही निघायचे असल्याने त्यानेही आमचा निरोप घेतला. परतीची डेक्कन क्वीन दादरला थांबेल अशा आविर्भावात मी निवांत बसलो होतो... तोच नूलकर काकांनी अज्ञानात भर घातली आणि चला CST कडे असे फर्मावले. मग एका ठिकाणी बसची वाट बघून बस मिळाली नाही म्हणून आंम्ही टॅक्सीने फ्लोरा फाऊंटनला गेलो. तेथे पुस्तक खरेदी झाली आणि CST ला पोहोचलो.
झकास मजा आली. नूलकर काका आणि भ.खे.ना पहिल्यांदाच भेटलो... धो धो गप्पा झाल्या.. आता पुढचा कट्टा वाडा किंवा इंदापूर कुठेतरी करायचा असे याच कट्ट्याच्या वेळी ठरले.
**************************
प्रशांतच्या फूड सायकलचे २ एपिसोड -

वर्गीकरण
क्या बात है! फारच भारी झाला
अरे वा! मस्तच. मणिजचा
सायकल कट्टा म्हणून मी टाळले
शेवपुरी सँडविच.
In reply to शेवपुरी सँडविच. by सावत्या
हो.
इराणी होटॅल कोणते ?
In reply to इराणी होटॅल कोणते ? by जेदि
कॅफे कॉलनी
In reply to कॅफे कॉलनी by सुधांशुनूलकर
धन्यवाद
In reply to कॅफे कॉलनी by सुधांशुनूलकर
लाइट ओफ भारत ऐकलंच असेल.
सायकल कट्टा म्हणजे सायकली
झकास कट्टा झाला.
सायकलवेड्यांबरोबर एक दिवस
वदनी कवळ घेता..... अन्न हे पूर्णब्रह्म डावीकडून - भटक्याखेडवाला, मोदक, सुधांशुनूलकर, इरसाल कार्टं, प्रशांत ननावरे. प्रशांतने सायकलप्रेमाला वेगळे आयाम दिले आहेत. लोकसत्तामध्ये एक वर्षभर सायकलविषयक सदर लेखन केल्यावर आता त्या लेखांचं एक पुस्तक प्रकाशित होईल. तसंच, सायकलप्रेमाला खादाडीप्रेमाची जोड देऊन त्याने ‘फूड सायकल’ हा व्हिडिओ उपक्रमही सुरू केलाय, त्याचे दोन व्हिडिओ मोदकने वर दिलेच आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशांतने ‘दो पहिया’ हा सायकलवर आधारित लघुचित्रपटांचा महोत्सवही आयोजित केला होता. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खादाडीसाहित गप्पा झाल्यावर आम्ही चालत चालत माटुंग्याला महेश्वरी उद्यानाजवळ ‘अंदमान पॅडॉक’ हे अजस्र आवळेजावळे वृक्ष पाहायला गेलो. यांना फुलोरा आल्यावर आठ-दहा दिवसात पावसाला सुरुवात होते, असं निरीक्षण आहे. आपण तीन जणांनी हातात हात धरून रिंगण केल्याइतका या एका वृक्षाचा बुंधा मोठा आहे.

तिथून रुइया कॉलेजजवळ मणीजमध्ये कॉफी प्यायला आल्यावर प्रासना फोन केला, तेव्हा कळलं की ते मुंबईतच होते. लगेच सायकलवरून येऊन त्यांनी सायकल कट्टा सार्थ केला. मग गप्पांना प्रासरंग चढला. दोन वाजत आले होते, भटक्या खेडवालांना कामावर जायचं होतं, त्यांनी निरोप घेतला. प्रशांतलाही कुठे जायचं होतं, मग त्यानेही निरोप घेतला. तर असा झाला हा सायकलवेड्यांचा कट्टा. खूप मजा आली. आता वाड्याच्या कट्ट्यासाठी उत्सुक आहे. तो कट्टाही असाच मस्त होईल, याची खातरी आहे. फोटो – प्रशांत ननावरे.In reply to सायकलवेड्यांबरोबर एक दिवस by सुधांशुनूलकर
मस्त वृत्तांत. मिपाकर
In reply to मस्त वृत्तांत. मिपाकर by एस
वृक्षवल्ली - 'तो माझा चहाचा कप नाही'
खुप मस्तं.
कट्टा
In reply to कट्टा by भ ट क्या खे ड वा ला
प्रशांतची लेखमला
हा तर
ए हा सायकलवाल्यांचा फुड कट्टा
आवडला कट्टा ...